[खिंड]
|| विनायक प्रभू प्रसन्न ||
हॉल क्रमांक पाच.
वरीष्ठ महाविद्यालयाचा परीक्षा
पेपर इंग्रजीचा.
मास्तरानं प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका वाटल्या.
पहिला तास सहज निघून जातो.
सो-सो, विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या हालचाली.
मास्तर कॉप्या काढून घेतात.
वर्गात थोडीशी हालचाल.
पुन्हा नियमितपणे प्रोसेस सुरु.
शेवटची पाच मिनिटे.
एका पोरानं चौथ्यांदा कागदं काढली.
मास्तरानं पुन्हा त्या चिठ्ठ्या जमा केल्या.
आणि आता उत्तरपत्रिकाही घेतली.
सर, उत्तरपत्रिका द्या ना !
सर, उत्तरपत्रिका द्या ना !
''तुझ्या कितीदा नकला घ्यायच्या''
''सर, सर्वच पोरं नकला करतात.
मिसळपाव
बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.
'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो.