Skip to main content

एक जुना मित्र भेटला ..

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज एक जुना मित्र भेटला .. गर्क स्वत:शी... पहात हसत राहिला जुने जुने.. सुने काही.. धुळी मधे गिरवत राहीला .. बरेच बोललो बसून दोघे .. बोललो दोघे स्वत:शी ... वाट पुढे धावणारी पुन्हा जुन्या वळणाशी .. हळवे शांत डोळे त्याचे .. वेडेपणाची झाक जराशी ... धुळी मधले नाव पाहून... मीही हसलो स्वत:शी... मीही हसलो स्वत:शी...

गे कविते

लेखक सागरलहरी यांनी सोमवार, 05/07/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये , मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १ बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी , चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २ कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या, वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३ -- सागर लहरी २२.२.२०१०

बसरा ते बावला

लेखक रामदास यांनी सोमवार, 05/07/2010 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीनंतर हिर्‍याचे महत्व वाढत गेले. त्या आधी हिर्‍याचे मोल कमी होते असे नाही पण दागीन्यामध्ये मोत्यांचा वापर खास करून बसर्‍याचा वापर होत असे. मोती म्हणजे बसरा.चोखा मोती .त्यात जीवन आणि पातळ जीवन असे दोन प्रकार . त्यानंतर बदला मोती .थोडेसे खडबडीत कमी गोल असे. काळे मोती कागाबाशी तर बाकी सगळे गावशाही . कधी कधी लांबोळक्या नूर मोत्याचा वापरही केला जायचा. फिकट रंगाच्या वेगवेगळ्या छटा असलेल्या मोत्यांना पण वेगळीशी नावे होती. हुर्मुजी म्हणजे गुलाबी.लालसर म्हणजे गुळधानी .थोडी फिकट पांढरी छटा पण काळी नव्हे असे शुक्री मोती .

थँक्स मा

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 04/07/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात बर्‍याच महत्वाच्या गोष्टी आपल्या नजरेतुन निसटतात, तसेच काही उत्कृष्ट चित्रपटसुद्धा पहायचे राहुन जातात, किंबहुना ते कधी आले कधी गेले हे सुद्धा माहित नसतं आपल्याला. कमी भांडवलाचे, छोटे कलाकार असलेले आणी मार्केटींग न करु शकलेले हे चित्रपट असेच कुठेतरी हरवुन जातात. गेल्या वीकांतला एका मित्राने आग्रह केला म्हणुन पाहिलेला, मन हेलावुन टाकणारा, डोळ्यात पाणी आणणारा आणी खोल विचार करायला लावणारा हा एक चित्रपट - "थँक्स मा".

भारत बंद

लेखक कशिद यांनी रविवार, 04/07/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या भारत बंद आहे.. तर मग उद्या ची काय तयारी... महाराष्ट्रात शिव सेना अणि मनसे ने महाराष्ट्र बंद च आवाहन केला आहे तुम्हाला काय वाटे याचा फायदा होइल का..अणि जर नाही तर मग काय केला पाहिजे सरकार वर दबाव टाकायला? उद्या दुकाने बंद करायला जाणारा (अक्षय)

शॄंगार

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 04/07/2010 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेले चिंबुन केस चुंबून सखे मोहरतो ओलेती झालिस तू, अन् न्हाऊन मनी मी निघतो डोळ्यातिल काजळ रेखा काळजात मी गिरवीतो शृंगार तुझा होतो अन् रंगून आत मी निघतो मलमली ओढणी मधला गंधार मनी घुमघुमतो नक्षीत बिलोरि तिच्या मी माझेच बिंब पाहातो काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो
काव्यरस