भारत बंद
In reply to बंदचा निषेध by क्लिंटन
In reply to बंदचे by नितिन थत्ते
In reply to प र फे क्ट by टारझन
In reply to प र फे क्ट by टारझन
In reply to बंदचे by नितिन थत्ते
बंद च्या निमित्ताने होणारी हिंसा, दगडफेक मालमत्तेचे नुकसान आणि सामान्यांना होणारा त्रास या गोष्टी होऊ नयेत हे मान्य. पण लोकशाहीत आवाज उठवण्यालाच तात्त्विक बंदी असता कामा नये.स्वयंस्फुर्तीने बंद पाळला गेला आहे का? दगडफेक हिंसा झाल्याशिवाय बंदला ग्लॅमर नाही. नाही तर तो मिळमिळीत बंद वा अयशस्वी बंद मानला जातो. आपले विधान तात्त्विक दृष्ट्या योग्य असले तरी व्यावहारिक परिणामाला थोपवणारे नाही. निषेध व्यक्त करायचा अन्य सनसनाटी मार्ग कुठला हा प्रश्न उरतोच आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to बंदचे by नितिन थत्ते
In reply to +१ by विकास
सरकार नमते घेते असे मला वाटत नाही. बर्याचदा त्यातून दोन्ही बाजूचा राजकारणी आणि पक्ष काहीतरी हित साधू शकतो.याचे कारण म्हणजे उद्या आपल्यावरही विरोधी पक्षात बसायची वेळ आली तर आपणही रचनात्मक विरोध करायचे सोडून अशीच तोडफोड करणार आहोत अशी सत्ताधारी पक्षालाही खात्री असते. म्हणूनच ’तेरीभी चुप मेरीभी चूप’ असे म्हणत सत्ताधारी पक्ष अशा गुंडगिरीवर काही कडक कारवाई करताना दिसत नाही. हीच तर दुर्दैवाची गोष्ट आहे.
अगदी वर्षभरात वेगवेगळ्या वेळेस आणि स्थ़ळास/कारणास धरून महीनाभर बंद झाला तरी ११ महीने कामे करणारे करू शकत असतात. त्यांना वर्क कल्चर सांभाळण्यापासून कोणी आडवत नसते.आय.आय.एम मध्ये आल्यापासून पूर्वीपेक्षा काम करायची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे त्यामुळे मी work culture च्या मुद्द्याविषयी जास्त आपुलकीनी बोलू शकतो.असा फुकट घालवलेला एक दिवस म्हणजे कामाचा गेलेला एक दिवस नव्हे तर २४ पैकी १७ तास असेच आम्ही समजतो. मिपा आणि इतर गोष्टींसाठी (झोप, खाणे, आंघोळ धरून) दररोज सरासरी ७ तास असे गणित असते.त्यामुळे जर माझ्या कामाचे १७ तास कोणी माझ्यावर सक्ती करून फुकट घालवू पाहात असेल तर मात्र त्याचा संताप आल्याशिवाय राहणार नाही.
जिथे तुरूंगात गेलेले, खटला चालू असलेले निवडून येऊ शकतात आणि निवडणूक आयोग काही करू शकत नाहीज्या व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी न्यायालयाने दोन वर्षे किंवा अधिक शिक्षा केली आहे त्या व्यक्तीला निवडणुक लढवता येत नाही. जयललितांना २००१ ची विधानसभा निवडणुक याच कारणासाठी लढवता आली नव्हती. आपल्या न्यायव्यवस्थेत खटले संपून शिक्षा व्हायला इतका वेळ लागतो की अनेकदा संबंधित व्यक्ती परलोकवासी झालेली असते. तेव्हा तांत्रिकदृष्ट्या दोषी सिध्द होऊन शिक्षा ठोठावली न गेल्यामुळे निवडणुक आयोगाला याविषयी काही करता येत नाही. इथे तर उघडउघड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली खुलेआम होत आहे. खरे तर न्यायालयानेच या गोष्टीची स्वत:हून दखल घेतली तर ते चांगले होईल.तेव्हा निवडणुक आयोगाला या बाबतीत अगदी काहीच करता येणार नाही असे वाटत नाही.
In reply to बंदचे by नितिन थत्ते
In reply to आक्षेपाचे कारण by क्लिंटन
In reply to बंद पाळणे, शांततापूर्वक विरोध वगैरे by नितिन थत्ते
असा स्वतःपुरता बंद पाळणे म्हणजे काय हे कळत नाही. मी निषेध म्हणून एकटाच कामावर गेलो नाही तर ती संघटित कृती होणार नाही आणि मग ती बहुसंख्यांची कृती ठरत नाही. त्याची दखल घेण्याची गरज सरकारला वाटत नाही. संघटितपणे बंद पाळण्यासाठी कुणीतरी तशी कल्पना मांडावी लागते आणि ते कल्पना मांडण्याचे काम राजकीय पक्ष करीत असतातमी आधीच स्पष्ट केले आहे की आक्षेप स्वत:ची बाजू मांडण्यावर नाही तर बंदमध्ये सहभागी व्हायची सक्ती केल्यावर आहे. वर दिलेले उदाहरण अधिक तपशीलात देतो. रॉलेट कायद्याविरूध्द ३० मार्च १९१९ रोजी हरताळ पाळावा असे आवाहन गांधीजींनी केले. त्याकाळी संदेशवहनाची साधने आजच्याइतकी प्रगत नसल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात हे आवाहन वेळेत पोहोचणार नाही हे लक्षात घेऊन हरताळाची तारीख ६ एप्रिल करण्यात आली. तरीही दिल्ली आणि उत्तर भारताच्या बऱ्याच भागात हरताळ ३० मार्चलाच पाळण्यात आला. दिल्लीतील ३० मार्चचा हरताळ हा कडकडित होता. कोणावरही कसलीही सक्ती न करता जनतेने उत्स्फुर्तपणे हा हरताळ पाळला. या हरताळामुळे ब्रिटिश सरकार खवळले आणि १३ एप्रिलच्या जालियॉवाला बाग हत्याकांडाला ही पार्श्वभूमी होती. समजा नितीन गडकरी आणि इतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी जनतेने असा उत्स्फुर्त हरताळ पाळावा असे आवाहन केले आणि कोणत्याही प्रकारची सक्ती न होता तुमच्यासारखे बहुसंख्य लोक त्यात सामील झाले तर त्या गोष्टीचाही सरकारवर दबाव पडणार नाही असे म्हणायचे आहे का? भारतातल्या कोट्यावधी लोकांनी इतरांवर सक्ती न करता असा सरकारचा वैयक्तिक पातळीवर निषेध केला तर मला वाटते ते अधिक प्रभावी ठरेल.
तुम्ही बंदची हाक दिली (नुकसान कोणी केले याच्याशी घेणेदेणे नाही) म्हणून दंड हे योग्य नाही.आपले म्हणणे मान्य करायचे तर त्यातही एक खोच आहे. अनेकदा अशी सक्ती केल्यामुळे समाजाचे झालेले नुकसान किती याची मोजदाद करता येणे अशक्य असते. उदाहरणार्थ अशा बंदच्या सक्तीमुळे ट्रक बंद राहिल्यामुळे अनेक टन भाज्या मुंबईत वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे खराब झाल्या तर ते झालेले नुकसान किती किंवा लोक कामावर जाऊ न शकल्यामुळे अनेक व्यवहार लांबणीवर पडल्यामुळे झालेले नुकसान किती याची मोजदाद कशी करणार? फारफार तर १० बसगाड्या जाळल्या तर त्यामुळे झालेल्या नुकसानीची गणती करता येईल आणि त्यासाठी नुकसान भरपाई घेता येईल. त्यातही अशी जाळपोळ करणारे लोक आमचे नव्हतेच अशी हाकाटी करायला राजकिय पक्ष मोकळे राहतील हा भाग वेगळा. तेव्हा याची जबाबदारी नक्की कोणाची? ही सगळी परिस्थिती बंदची हाक दिल्यामुळे उद्भवली म्हणून या गोष्टीची जबाबदारी त्याच राजकिय पक्षाची असे म्हटले तर काय बिघडले? अवांतर: आपण लावता त्याच न्यायाने बाबरी पाडल्याची जबाबदारी भाजप झटकू पाहात असेल तर ते पण योग्यच म्हणायला हवे.
राजकीय पक्षांऐवजी बंद पाळण्याचे आवाहन समजा अण्णा हजारे (फक्त उदाहरण) यांनी केले तर मग ते स्वीकारार्ह आहे का?अण्णा हजारे तर गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करतात आणि गांधीजींचे म्हणणे होते की सत्यावर निष्ठा असलेल्या एका माणसातही अपरंपार सामर्थ्य असते (संदर्भ: रॉबर्ट पेन यांनी लिहिलेले गांधीजींचे चरित्र). गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी विनोबा भाव्यांची निवड केली होती. तेव्हा या गोष्टीत विरोधाभास वाटतो. समजा तो भाग बाजूला ठेवला तरी जनतेवर विलक्षण पकड असलेल्या नेत्याने सरकारविरूध्द हरताळ पाळायचे आवाहन केले तरी अनेक लोक त्यात उत्स्फुर्तपणे सामील होतील यात शंका नाही. अलिकडच्या काळात अटलबिहारी वाजपेयींची जनमतावर अशी पकड काही प्रमाणावर होती.आज त्या तोडीचा एकही नेता विरोधी पक्षांकडे नाही. उद्या नितीन गडकरींनी असे हरताळ पाळायचे आवाहन केले आणि त्यांचा पोपट झाला तर पुरतीच शोभा व्हायची. ती नामुष्की नको म्हणून अशी सक्ती करायची वेळ बहुदा येत असावी.
महागाईला कारणीभूत असलेली इतर कारणे (ग्रोथच्या नावाखाली सोडलेली बाजारातील अतिरिक्त तरलता, टंचाई, कमोडिटी मार्केट म्हणून केली जाणारी सट्टेबाजी) यांवरही उपाय करणे भाग आहे.अगदी असेच.विरोधी पक्षांनी या कारणांचा अभ्यास करून जनतेत जरूर जाऊन आपली बाजू मांडावी आणि सरकारविरूध्द वातावरण बनवावे. त्यांना कोणी अडविले आहे? पूर्ण कमोडिटी मार्केटमध्ये नाही तरी निदान अन्नधान्ये आणि डाळी यासारख्या वस्तूंसाठी तरी स्पेक्युलेशनसाठी (हेजिंगसाठी नव्हे) केलेल्या डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टवर बंदी असावी असे माझे मत आहे. तसेच मत विरोधी पक्षांचे असेल तर त्यांनी जरूर जनतेत जाऊन ते मांडावे. पण असे अभ्यासपूर्ण विश्लेषण करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडायचे कष्ट घेणार कोण? म्हणून करा बंदची सक्ती असा प्रकार दिसतो तो समर्थनीय नाही.
In reply to माझे मत by क्लिंटन
In reply to अवांतर + by विकास
In reply to आक्षेपाचे कारण by क्लिंटन
In reply to थोडक्यात by Manoj Katwe
आणि ज्याच्याकडे बक्कल पैसा आहे त्यांनी मात्र बंदला चुकीचे ठरवा.मी बंदला चुकीचे ठरवत आहे म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडे बक्कळ पैसा आहे असा होतो का? ही माहिती आपल्याला कुणी दिली?
कुठे गेली आहे संवेदनशीलता ?अहो असे संवेदनाशील लोकच बंदचे समर्थन करून अनेकदा हातावर पोट असलेल्यांसाठी अडचणी निर्माण करतात. आज एक दिवस बाजार बंद असला म्हणून मी काही उपाशी राहणार नाही.पण रस्त्यावर वडापावच्या गाड्या असलेले लोक किंवा तत्सम उद्योग असलेल्या लोकांसाठी बंदची सक्ती म्हणजे मोठी अडचण असते हे आपण नाकारू शकता का? मग उद्या ’हीच का तुमची संवेदनाशीलता’ असा उलटा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर? माझा बंदला विरोध असायचे कारण म्हणजे संवेदनाशीलतेचा अभाव हे नसून हा मार्ग चुकीचा आहे असे मला वाटते हे आहे. विरोधकांनी एका ठरविलेल्या दिवशी देशातील प्रत्येक तालुका पातळीवर सभा घेऊन सरकारचा निषेध जरूर करावा. मला वाटते अशा हजारो सभा एकाच वेळी देशात एकाच कारणासाठी झाल्या तर त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल.
In reply to कसे काय? by क्लिंटन
In reply to आक्षेपाचे कारण by क्लिंटन

In reply to बंदचे by नितिन थत्ते
In reply to असहमत by फारएन्ड
In reply to बंदचे by नितिन थत्ते
In reply to बंदचे by नितिन थत्ते
In reply to बंदचा निषेध by क्लिंटन
In reply to महागाई by अप्पा जोगळेकर
In reply to महागाई by अप्पा जोगळेकर
In reply to टारझन लवकर by कशिद
In reply to पण सामान्य by शानबा५१२
In reply to मग महागाई by Manoj Katwe
जर कोणाकडेच उत्तर नसेल तर ते जे करतायेत निदान त्यात तरी सामील होऊयातअच्छा म्हणजे ह्याने काय होइल ते मीहीती नाही तरी खटाटोप करायचा?? सामिल व्हायच नसल तरी व्हावच लागत ती गोष्ट वेगळी. निदान पानपट्टी व चहाची दुकान उघडी असावीत असा प्रस्ताव का नाही मांडला जात?? _________________________________________________ ''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!! see what Google thinks about me! इथे
In reply to मी ऑफिसात by llपुण्याचे पेशवेll
इकडे कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.म्हणून मुख्यमंत्र्यापासुन सगळेच गोंधळले होते. पण उद्या इकडे पण बंद आहे.>> व्हय व्हय, बरंचसं बंगलूरू झोपलंय आज! सकालधरनं काय बी आवाज न्हाय आम्च्या इथं (यशवंतपुरात).. हापिसाला कुलूप हाय आम्च्या.. ====================== कोकणी फणस आम्ही पन ब्लॉगतो बर्र का! http://ashishsurve.blogspot.com/
In reply to सरकार हे ठार बधीर झालेले आहे. by Manoj Katwe
In reply to नक्की कोण? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सरकार हे ठार बधीर झालेले आहे. by Manoj Katwe
In reply to The spirit of resistance to by अवलिया
In reply to छान by विकास
In reply to सामान्यांचा दुटप्पीपणा की दुर्बलता? by अरुंधती
In reply to ?? by नितिन थत्ते
In reply to ?? by नितिन थत्ते
In reply to सामान्यांचा दुटप्पीपणा की दुर्बलता? by अरुंधती
In reply to -१ >> by II विकास II
In reply to सहमत. by Manoj Katwe
In reply to काही प्रश्न by क्लिंटन
In reply to हा विषय by Manoj Katwe
बंद यशस्वी व्हावा म्हणून मी / आम्ही निदान थोडे फार प्रयत्न तरी केले आहेत, आपण किती सभा घेतल्या अथवा घेणार आहात ?बरोबर आहे बसवर दगडफेक करणे किंवा बळजबरीने दुकाने बंद पाडायला लावणे या गोष्टी मला अजिबात झेपणार नाहीत. त्याचप्रमाणे जाहिर सभा घेणे हा लोकशाही पध्दतीत एक मार्ग आहे. जाहिर सभा घेण्याचा उद्देश एवढाच असतो की एखाद्या विषयाचा अभ्यास करावा आणि आपले विचार एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत पोहोचवावेत. ती गोष्ट करायला लागणारा लोकसंग्रह माझ्याकडे नाही त्यामुळे मी ती गोष्ट या क्षणी करू शकत नाही. मग यासाठी मी काय करणार/करत आहे? वेळ मिळेल त्याप्रमाणे मी मिपावर आणि माझ्या परिचयातील लोकांपुढे मी माझा मुद्दा मांडत असतो. तुम्ही बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत म्हणजे बसच्या काचा फोडल्या नाहीत/ जाळपोळ केली नसावेत अशी अपेक्षा आहे. पण या गोष्टी करणे चुकीचे आहे आणि लोकशाहीत जनमताची ताकद दाखवायचे इतर अधिक योग्य आणि वैध मार्ग उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा आणि त्यात सगळ्यांचेच हित आहे हा माझा मुद्दा मी मांडायचे अजिबात सोडणार नाही. हा मुद्दा वाचून त्यातून पुढच्या बंदच्या वेळी एकतरी दगड कमी मारला गेला किंवा सार्वजनिक मालमत्तेचे एक रुपयाने का होईना नुकसान कमी झाले तर ते माझे पूर्ण यश असेल असेच मी मानेन. मिपा या व्यासपीठावर मांडलेले मुद्दे किती लोकांपर्यंत पोहोचतात किंवा त्याची उपयुक्तता किती याची कल्पना नाही.सध्या मी भारतातील एका नामवंत शिक्षणसंस्थेत शिक्षण घेत आहे आणि अर्थशास्त्रातील आणि इतर गोष्टींमधील बारकावे अजून खोलात जाऊन कळावेत याचा प्रयत्न करत आहे. भविष्यकाळात माझ्या प्रयत्नांना यश आले तर मी नक्कीच अजून मोठ्या व्यासपीठावरून माझे मुद्दे मांडू शकेन. पेट्रोलियम पदार्थांचे दर बाजारात ठरवले जायला सरकारने मान्यता दिली याविषयी हा प्रतिसाद मी मिपावर लिहिला आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया काय हे जाणून घ्यायला आवडेल. बाकी मनमोहन सिंहांच्या चेहऱ्यावरची सुरकुती हालत नाही ही गोष्ट खरी आहे. ती गेल्या ६ वर्षांमध्ये कधीच हालली नव्हती हे पण तितकेच सत्य आहे. पण तरीही लोकांनी गेल्या वर्षी त्यांनाच निवडून दिले ना? लोकशाही पध्दतीत आपले म्हणणे जनतेपर्यंत पोहोचवायचा सगळ्यांना अधिकार आहे. लोकांनी परत कॉंग्रेसलाच निवडून दिले याचा अर्थ एक तर विरोधी पक्ष आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत किंवा त्यांना आपला मुद्दा जनतेपर्यंत नीट पोहोचविण्यात अपयश आले आहे. तुम्हाला मनमोहन सिंह आवडत नसतील पण त्यांना जनतेचा जनादेश प्राप्त झाला आहे हे कसे नाकारता येईल? आणि पुढच्या वेळी जनादेश आपल्या बाजूने लागावा म्हणून राजकिय पक्षांनी प्रयत्न करावेत हाच लोकशाही संकेत आहे. म्हणजे मला लोकांनी निवडून दिलेले सरकार आवडत नाही म्हणून मी करणार दगडफेक-जाळपोळ या गोष्टीला लोकशाहीत अजिबात स्थान नाही. याच गोष्टीचा पुढचा भाग म्हणजे ’तुला माझे पटत नाही काय? मग घालतो गोळी’ असा कशावरून होणार नाही? आणि तसे झाले तर भारताचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. याच कारणामुळे मला तुमची सशस्त्र क्रांतीवरील टिपण्णी अत्यंत बेजबाबदार वाटते. लोकशाहीत जनमताचा दबाव सरकारवर आणून निवडणुकीत बदल घडवता येतात याची किती उदाहरणे सांगू? १. १९७१ मध्ये बांगलादेश युध्दानंतर इंदिरा गांधींचा पराभव होईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नसेल. तरी त्यांचा पराभव १९७७ मध्ये झालाच ना? २. तीच गोष्ट राजीव गांधींची. १९८४ मध्ये ४००+ जागा जिंकणाऱ्या राजीव गांधींच्या पक्षाचाही १९८९ मध्ये पराभव झालाच ना? ३. चंद्रबाबू नायडूंच्या सरकारविरूध्द राजशेखर रेड्डींनी आंध्र प्रदेशात पदयात्रा काढली होती. अनेक हजार किलोमीटर ते पायी फिरले होते, लोकांमध्ये जाऊन त्यांनी लोकांना स्वत:ची बाजू समजावून सांगितली. २००४ आणि २००९ मध्ये काय झाले हे परत सांगायलाच हवे का? ४. तीच गोष्ट बाळासाहेब ठाकऱ्यांची. त्यांनी आणि गोपीनाथ मुड्यांनी असेच शरद पवार सरकारविरोधी रान उठविले आणि बदल घडवून आणला. तेव्हा असा मतपेटीच्या मार्गाने होणारा बदल आपल्याला अनुकूल लागला नाही तर मी चाललो दगडफेक करायला असे म्हटले तर सगळीकडे कोणीनाकोणी दगड मारणारे निघेलच. हा असा बदल घडवून आणायला निवडणुकांची वाट बघायला लागते असेही नाही. १९६२ च्या युध्दानंतर संरक्षणमंत्री कृष्णमेनन जनतेत लोकप्रिय नाहीत याची कल्पना आल्यानंतर नेहरूंना त्यांना हकलावेच लागले ना? १९९१ मध्ये आर्थिक संकटाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती वेंकटरामन परदेश दौऱ्यावर निघाले होते. अशा वेळी त्यांनी दौऱ्यावर जाऊन करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करू नये म्हणून लोकसत्ताचे संपादक माधव गडकरींनी राष्ट्रपती भवनावर तारांचा पाऊस पाडावा असे आवाहन वाचकांना केले आणि असा खरोखरच तारांचा पाऊस राष्ट्रपती भवनावर पडला होता आणि त्यातून राष्ट्रपतींना त्यांचा दौरा रद्द करणे भाग पडले होते.त्यावेळी कोणत्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या? सनदशीर मार्गांचे हे सामर्थ्य आहे. तरीही तसे करायला न जाता विरोधक बंद का पुकारतात? त्याचे कारण मागे लिहिलेच आहे की त्यांना महागाईविषयी काडीचीही काळजी नाही.त्यांना स्वत:ची पोळी भाजून घ्यायला महागाई जास्त असलेली कधीही चांगली. आणि नाहीतर दुसरे कारण म्हणजे एवढे कष्ट कोण घेणार? पेट्रोलियम पदार्थांमुळे महागाई वाढते पण १००% वाटा त्याचा नसतो ही गोष्ट मान्य.पण म्हणून विरोधकांनी त्यांना शक्य तेवढे करून त्यांच्या परिने महागाई कमी करायचा प्रयत्न का करू नये? उलट या गोष्टीचा केंद्रावर दबाव वाढेल. शेती या महत्वाच्या विषयापेक्षा क्रिकेटला प्राधान्य देणारे शरद पवार हे कृषीमंत्री आहेत त्यांच्या कारभाराचे वाभाडे संसदेत आणि बाहेर पाहिजे तितक्या प्रमाणावर निघत नाहीत.कृष्णमेननचे जे झाले तेच पवारांचे करण्यासाठी विरोधक का प्रयत्न करत नाहीत? तेव्हा बंदच्या दरम्यान दगडफेक करणे, दुकाने जबरदस्तीने बंद पाडणे आणि रूग्णांचे शिव्याशाप घेऊन पापाचे धनी होण्यापेक्षा महागाईच्या प्रश्नाचा नीट अभ्यास करा. नक्की कारण काय आणि त्याला जबाबदार केंद्र सरकार कसे हे ओळखीच्या प्रत्येकाला सांगा आणि त्यांना इतरांना सांगायला उद्युक्त करा यातूनच कोणावरही दगड न मारता चांगला बदल घडून येईल.
In reply to उत्तर by क्लिंटन
In reply to मुद्यासाठी मुद्दा by मैत्र
In reply to मुद्यासाठी मुद्दा by मैत्र
हो रे , काय