फिताधारी कुत्री
फिताधारी कुत्री
एका शेतकऱ्याकडे बरीच कुत्री होती. ती घर, बैल, शेती वगैरे मालमत्तेची राखण करीत असत. रोज तेच ते काम करून ती कुत्री कंटाळून जात. काहींना आपल्या कामात स्वारस्य वाटत नसे. काहींना वाटे, कसले मामुले काम आहे आपले! अशा वातावरणात ती कुत्री काम व्यवस्थीत करीत नसत. त्यांना कामामधे रस यावा, आणि अभिमान वाटावा म्हणून शेतकऱ्याने एक युक्ती केली. त्यातल्या त्यात चांगल्या कुत्र्यांना कामाचे कौतूक म्हणून गळ्यात बांधायला रंगीत फ़िता दिल्या. त्या फ़ितांना छान छान किणकिण आवाज करणाऱ्या घंटा देखील होत्या. फ़िताधारी कुत्री मोठ्या दिमाखात आपापल्या फ़ितांचे प्रदर्शन करीत सगळी कडे फ़िरायची.
अधोरेखीत
"तुमच्या कार्यक्रमातुन स्फुर्ती,प्रेरणा घेउन आम्ही एक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम चालु केला आहे. पण त्यात काही इंग्लिश माध्यमाच्या शिक्षकांचा अभिव्यक्तीचा अहं अधोरेखीत झाल्यामुळे सुसुत्र संचालनाला बाधा येत आहे".
अहो, लेले जरा मराठीत बोला.चुपके चुपके मराठीतुन काढला तर स्क्रीप्ट रायटींग तुम्हीच करा.
"इगो मॅनेफेस्टेशन."
थोडक्यात थेम्स नदीच्या काठी जन्माला आलेले तुमच्या कार्यक्रमात राडे घालतायत. मी उद्या येतो. सगळ्यांना एकत्र बसवा.
'मिश्किली' - ई-बुक प्रकाशित
प्रस्तावना...
भावनिक प्रस्ताव मांडला की तिची प्रस्तावना होत असते. शब्दांना छेडायचं, शब्दांनाच वेढायचं अन् निकालातही काढायचं एकंदर असाच काहिसा हा मामला. मामला रंगात आला की कामला होत असते. म्हणून काही श्यामलेचे महत्व कमी होत नाही. श्यामलतेतच श्याम व लता वेलीँचा संकर घडून येत असतो...
अशा प्रकारच्या शाब्दिक कोट्यांची कोट्यावधी उड्डाणे घेण्याचा मोह आंतरजालावर कळा दाबतांना होत आलाय. कळा दिल्या तरच पुढे कुणाला तरी लळा लावता येत असतो. म्हणून जास्त कुथत किँवा थुंकत न बसता मी मूळ मुद्द्यावरच येतो...
पडद्यावर लिहिणे ही एक कलाच. ते वाचून प्रतिसाद देणे ही तर महाकला.
स्पेन जिंकले
१-०
- नाटक्या
विशेष
कांदा,मुळा,भाजी...
पूर्वी लहान असताना परीक्षा आणि अभ्यास या मुळे नको वाटणार्या मार्चची मी इथे आल्यापासून आतुरतेने वाट बघते. मार्च उजाडला की गार्डन सेंटर च्या फेर्या सुरू होतात. टॉप सॉईल, कंपोस्ट, बियाणं सगळ्याची खरेदी होते. छोटी-मोठी अवजार बाहेर येतात. भरपूर ऊन येणार्या खिडक्यांसमोर सीड स्टार्टर चे ट्रे मांडले जातात. हळू हळू त्यात छोटी रोपं तयार होतात. काही जगतात, काही कोमेजून जातात. बाहेर जमीनीची मशागत केली जाते. तिथेही बी पेरले जाते. तयार केलेली रोप जमिनीत लावली जातात. हळू हळू माझा वेजी पॅच आकाराला येतो. मुख्य म्हणजे या सगळ्यात नवरा उत्साहाने सामिल होतो.
सद्गुरू माउली
अजपाचे संगती | एकारली वृत्ती |
ठाके सीता-पती | सन्निधानी ||
स्व-स्थ राहोनी | राम नाम ध्यानी |
लाभे पुण्य खाणी | आत्म वृत्ती ||
आत्मवृत्तीची कळा | प्रेमे पाही सकळा |
दिसे सर्वत्र सावळा | चरा- चरी ||
नाम जप गोडी | जरी लाभे थोडी |
साधने तोकडी | बाकी होती ||
याजन याजन | दान तीर्थाटन |
सद्गुरुवाचोन | शून्य होय ||
सद्गुरू माउली | देई नाम साउली |
तेणे लोभावली | जिव्हा माझी ||
सागर लहरी - ११.७.२०१०
मिसळपाव