Skip to main content

आग्रहाचे निमंत्रण..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 13/07/2010 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मिसळपावच्या सर्व रसिक वाचक, लेखक्, कवी, सुगरणी आणि बल्लवाचार्य मित्र्-मैत्रीणींना सांगताना मला खूप आनंद होतोय, की, माझ्या कविता 'फुलांची आर्जवे' च्या रूपाने रसिकांसमोर आल्यानंतर, त्यातल्या काही कविता आता गीत रूपाने अल्बम मधून तुमच्या समोर येत आहेत. माझ्या कवितांना, उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी. एक स्वप्नं , जे उरी बाळगलं होतं.. ते आता प्रत्यक्षात येताना बघणे म्हणजे एक सोहळाच आहे. एक अपेक्षापूर्तीचा क्षण... एक खूप मोठा दिवस.. एक खूप मोठा प्रसंग..

बेळगावी मराठी बांधवांवर हल्ला: सीमावासीयांनो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 13/07/2010 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल दि. १२ जुलै २०१० रोजी बेळगाव शहरात सीमावासीयांनी मराठीचा झेंडा फडकावत बेळगावात उत्स्फूर्तपणे काढलेल्या मोर्चावर कर्नाटक सरकारने अमानुष लाठीमार केला. शांततेने चालणार्‍या मोर्चावर अचानक लाठीमार करून सीमावासीयांच्या भावना कर्नाटकी सरकारने पायदळी तुडवल्या. म्हातार्‍या कोतार्‍या माणसांनाही पोलीसांनी सोडले नाही. केंद्रसरकारला अजून किती वेळा लाठीमार व सीमावासीयांचे बळी हवेत? न्याय्य मागण्यांना न्याय मिळेल की नाही? सीमाबांधवांनो, तुम्ही एकटे समजू नका.

मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 13/07/2010 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी मी एक कोडं ऐकलं होतं, 'पोळी का जळली? घोडा का अडला? विड्याचं पान का सडलं? या तीनही प्रश्नांचं एकच उत्तर सांगा.' तसाच अनेक प्रश्नांचं एकच उत्तर देणारा अनुभव आज मला आला. 'मराठी माणूस धंद्यात मागे का पडतो? पुस्तकांचा खप कमी का होतो? पुणेरी दुकानदाराची प्रतिमा वाईट का आहे?' हे ते प्रश्न. अनुभव अगदी ताजा आहे. काही तासांपूर्वीचा. अमेरिकेला परत जायचे वेध लागले की पुस्तकांच्या खरेदीसाठी काही फेऱ्या होतातच. आज वैजूमावशीबरोबर पुण्यात अप्पा बळवंत चौकात गेलो. पुस्तकांची भरपूर दुकानं, पण बहुतेक सगळी टेक्स्टबुकं, अमुक कसे करावे वगैरेची, ज्योतिष, पाककृतींसारखी गृहोपयोगी दुकानं.

आणिबाणी

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 12/07/2010 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाचा उद्देश स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाविषयी माहिती देणे हा आहे. त्यानिमित्ताने लोकशाहीला असलेले धोके आणि धोक्यांची लक्षणे आणि त्यांपासून बचाव करण्याची गरज यांवर चर्चा करण्याचा आहे. १९७१ च्या मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीत "गरीबी हटाओ" या घोषणेच्या जोरावर काँग्रेस पक्षाने मोठे यश मिळवले. निवडणुकीनंतर थोड्याच काळात पूर्व पाकिस्तानचा प्रश्न निर्माण झाला. डिसेंबरात पाकिस्तानबरोबर युद्ध होऊन बांगला देशाची मुक्तता होऊन हा प्रश्न निकालात निघाला. युद्धातल्या यशामुळे इंदिरा गांधींची लोकप्रियता शिगेला पोचली.

आरं आरं आबा आता वर्डप्रेस डॉट कॉमवर

लेखक बाबुराव यांनी सोमवार, 12/07/2010 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
सामान्य जनतेपर्यंत पोचायचा मार्ग महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी निवडला हाये. जनतेशी संवाद साधता यावा म्हून त्यायनी आबा पाटील्स ब्लॉग या नावाने ते वर्डप्रेस डॉट कॉमवर हजर झाले हायेत. ही एक चांगली सुरुवात झाली हाय असे वाट्टे. आबा म्हणत्यात ''जनतेपर्यंत पोचण्याचा सोपा आणि कोणतेही हितसंबंध नसलेला, आणि गटबाजीला वाव नसलेला मार्ग म्हणून मी हे आधुनिक तंत्रज्ञान आता निवडले आहे. याच भावनेतून आज हा ब्लॉग मी तुमच्यासमोर आणतो आहे.'' मिपाकरांना आबाच्या नव्या धोरणाबद्दल काय वाट्टे ?

काही राहीलेले

लेखक पंचम यांनी सोमवार, 12/07/2010 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
काही राहीलेले....span> ते सर्व राहीले मागे जे काट्यात उमलले होते... फक्त पाकळ्या हातात गंध श्वासात राहीले होते... मी शोधल्यात ज्या मातीत काही ओळखीच्या पाऊलखुणा त्या मातीत जणू आता आभास राहीले होते..... मी सावरू न शकलो तू निघून गेल्यावर... त्या सावलीच्या मागे काही आघात राहीले होते...... बरेच काही सांगायचे होते तुला निघुन जाण्याआधी कविता पुर्ण झाली. तरी शब्द राहिले होते ;">-पंचम

गाणी

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 12/07/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक जागी झाली कधीतरी निजलेली गाणी सांजवात होऊन तेवली मनातली विझलेली गाणी || दबले, बुजले, घुसमटलेले सूर विजेसम लख्ख चमकले, घन बरसावे तशी बरसली कंठातच थिजलेली गाणी || भुरभुरता पाऊस कोवळा संध्यारंगातून झिरपला, किरणांच्या छायेत उतरली थेंबांवर सजलेली गाणी || नवथर मातीच्या ओलेत्या देहाच्या परिमलात घुमली, दरवळली अन तिच्या कुशीतुन कोंबांसह रुजलेली गाणी || निळेसावळे ओले अंगण, तुझ्या नि माझ्या मनात श्रावण, रानोरानी, पानोपानी भिरभिरती भिजलेली गाणी || असाच अवखळ पाउस होता, अन उडणारी एकच छत्री, आठवली का हळूच माझ्या कानी कुजबुजलेली गाणी?
काव्यरस