Skip to main content

निषेध त्या न्याय व्यवस्थेचा अन त्या अन्यायी व्यवस्थेचे समर्थन करणारांचा....

लेखक आम्हाघरीधन यांनी बुधवार, 21/07/2010 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
या चर्चेतील मुद्दे वाचले मुलतः कोणत्याही थोर व्यक्तीच्या बद्दल कुणाही सोम्यागोम्याने काहीही माहीती द्यावी कुणाही लंपट लेखकाने काहीही लिहावे अन शासनाने अशा लिखानावर बंदी आणली असता कुणाही येरागबाळ्याने न्यायालयात याचिका दाखल करावी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे? हे कितपत योग्य आहे? आपल्या पैकी कितीतरी जण न्याय व्यवस्थेच्या या अन्यायी निर्णयाचे समर्थन करतांना दिसतात तेंव्हा न्यायाची चाड आपणाला आहे काय? हा प्रश्न निर्माण होतो.

हातातला खजिना (लोकल गोष्टी-३)

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 21/07/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
हातातला खजिना ============================================ रोज सकाळी राजसला शाळेत सोडल्यावर मी ऑफिससाठी स्टेशन गाठायचे.. राजसची शाळा पावणेनऊला सुरू व्हायची त्यानंतर अगदी चालत निघाले तरी नऊ सव्वा नऊ पर्यंत मी पार्ले स्टेशनवर पोहचायचेच. माझ्या कडे तसा बराच वेळ असायचा.. दोन नंबर प्लॅटफॉर्म वर चेंगरा-चेंगरीत घुसून लोकल पकडावी लागायची नाही. सहा नंबर प्लॅटफॉर्म वर नऊ अठरा चर्चगेट लोकल लागलेली असायची. त्या लोकलने मी आरामात जाऊ शकायचे.. आणि जरी काही कारणांनी ही लोकल चुकली तरी पुढच्या लोकलनी मी वेळेत ऑफिसला पोहचायचे. त्यामुळे तसा बराच निवांतपणा होता. आणि मन निवांत असलं की त्याला आजूबाजूच दिसतं..

<अवलियाचे रूप>

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 21/07/2010 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तितैची सुरेख रचना 'अरूपाचे रूप' "अवलिया" रूप। अवांतर खूप पाहताही पाध्ये। धाव घेई जंताचीयासाठी। या हाटेलाकाठी उभा अवलिया। टणत्कारी अवांत्राचा कैवारी। पर्‍याही फरारी संकटात टाकी। केसु-रंगा बाण तेथे देव। नांदतो सदैव कैवल्याची ठेव। मार्ल्बोरोत मायबाप, भ्राता। तूच सखा, त्राता अनुष्काच्या कांता। दे दर्शन
काव्यरस

पाऊस गाणी

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 21/07/2010 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस गाणी =========== झर झर झडी त्यात कागद होडी खट्याळ थोडी ति लोभस दडी.. खळ खळ घळी पाहता गाली खळी भज्याची थाळी नि विजेची टाळी.. रंग रंग दारी त्यात फुलली दरी सण उत्सव घरी नि दंगली सारी.. चिंब चिंब गाणी गाती पाऊस ठाणी खोटीच नाणी नि पाणीच पाणी.. सर सर हट्टी तिची पोरांशी गट्टी शाळेला सुट्टी नि डोक्यावर पट्टी.. गर्द गर्द झाडी त्यात संतत झडी भिजली गढी नि पुराची कडी.. टीप टीप बरी की झडच खरी असो काही जरी झरो रिमझीम सरी.. =========== स्वाती फडणीस १८-०६-२०१०

घनगड. काही छायाचित्रे

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 21/07/2010 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात घनगडला गेलो होतो . तिथे घेतलेली काही छायाचित्रे इथे देत आहे. मन नाजुकशी मोतीमाळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात ताम्हिनी लोनावळा रस्ता - घनगडचा एक अवघड पॅच ..

अरूपाचे रूप

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 21/07/2010 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप पाहता तद्रूप | जीव होई भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी उभा जगजेठी | पंढरीत दीनांचा कैवारी | सावळा मुरारी संकटात तारी | पांडुरंग भाव तेथे देव | नांदतो सदैव कैवल्याची ठेव | अंतरात मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन
काव्यरस

लपंडाव

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी बुधवार, 21/07/2010 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
कायम सुरु असतो आठवणींचा लपंडाव भावनांचा, शब्दांचा, अन नात्यांचा लपंडाव कधी नाती माझ्यापासून लपतात तर कधी मी त्यांच्यापासून ... कधी शब्द माझ्यापासून लपतात तर कधी मी त्यांच्यापासून ... इच्छांचेही तेच , नात्यांचेही तेच प्रेमाचेही तेच अन आप्तांचेही तेच ... माझे मन, अन माझ्या सावल्या माझे विचार, अन माझे प्रतिबिंब ह्यांनी मांडलेला लपाछपिचा डाव आयुष्य माझे म्हणजे एक लपंडाव binarybandya™

आषाढी एकादशी काही कथा

लेखक बज्जु यांनी बुधवार, 21/07/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढी एकादशी:- म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली.

उपास

लेखक अवलिया यांनी बुधवार, 21/07/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आषाढी एकादशी.. !! विठठल विठठल जै हरी विठ्ठल... मी फक्त साबुदाणा खिचडी, वेफर्स, केळी खाल्ली... थोडं दुध पिलो/प्यालो तुम्ही उपासाचे काय काय पदार्थ खाल्ले ? किंवा खाणार ? * आम्ही कालिदास असलो तरी धोरणात बसत नसल्यास धागा उडवला तरी चालेल पण जो संपादक उडवेल त्याला विठ्ठल शिक्षा करेल, धन्यवाद.

मासे ९) मोदकं (भिळजे)

लेखक जागु यांनी बुधवार, 21/07/2010 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे मासे १ इंचाच्या आसपास असतात. दिसायला अगदी मोत्यासारखे चकचकीत असतात. पण ह्यांना खवल असतात. ही खवले काठायची व डोके आणि शेपुट काढायचे. निवडायचा थोडा त्रास असतो. हे मासे छोटे असतात पण खुप चविष्ट असतात.