हायब्रिड जमाना
साऱ्या दुनियेचं हायब्रिडिंग झालंय. नवनव्या संकरित बियाण्यांपासून उपजलेली निसत्व पिके खाऊन शरीर पोकळ बनलेय. धान्यांच्या बिजापासून ते स्त्री-पुरुष बिजापर्यँत सर्वच ठिकाणी संकरित जग विस्तारलंय.
पूर्वीची माणसं ऐटीत जगायची, हसता हसता गचकायची, कळायचंसुद्धा नाही. आता मरणाचंही हायब्रिडिंग होत असतं! आजकाल सहज, सुखनैव मृत्यु येतच नाही. किमान दोन दिवस तरी कृत्रिम श्वासावर मेलेल्या म्हाताऱ्यांना ताटकळत ठेवतात. (पुरेसं बिल वसूल झाले की मगच डेथ डिक्लिअर करतात!)
जगणेसुद्धा संकरितच म्हणायचे. कारण गर्भ रहावा म्हणून गोळ्या, तो टिकावा म्हणून इंजेक्शने, सुखरूप प्रसूतिसाठी अनेक उपचार सुरू असतात.
मिसळपाव