Skip to main content

मातेचे ऋण

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 30/07/2010 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
A builder builded a temple he wrought it with grace & skill pillars & groins & arches all fashioned to work his will men said as the saw it's beauty, "it shall never know decay great is thy skill o builder! thy fame shall endure for aye!" A mother builded a temple with loving & infinite care planning each arch with patience lying each stone with prayer None praised her unceasing efforts none knew of her wonderous plan for the temple the mother builded was unseen by the eyes of man Gone is the builder's temple crumpled into the dust low lies each stately pillar food for consum
काव्यरस

कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 30/07/2010 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
अरे आमच्या कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही? आवडते म्हणूनी लोणी मागतो माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो उगाच माझी खोडी काढूनी तुम्ही लोणी मज देत नाही कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? दही दुध शिंक्यात टांगले हाती माझ्या न लागे असे ठेवले संवंगड्यासवे काढाया जाता म्हणता दही मी चोरून खाई कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता उगाचच तुमची वस्त्रे विसरता न जाणोनी कोठे शोधीता आळ मजवर मग का घेई? कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०७/२०१०
काव्यरस

व्यसनेषु सख्यम!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 30/07/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो. अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही.

रक्त आटते, मन सुक्ते

लेखक रणजित चितळे यांनी शुक्रवार, 30/07/2010 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची।

मासे १२) जवळा

लेखक जागु यांनी शुक्रवार, 30/07/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: जवळा एक किंवा दोन वाटे, बेसन १ ते दिड वाटी १ कांदा बारीक चिरुन आल लसुण, पेस्ट २-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे मसाला थोडी कोथिंबीर चिरुन हिंग, हळद चविपुरते मिठ थोडा लिंबाचा रस तळण्यासाठी तेल पाककृती: जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे बारीक मासे, छोट्या चिंबोर्‍या असु शकतात ते काढायचे. तेल वगळून वरील सगळे जिन्नस एकत्र करावे. पाणि घालु नये.

कलादालनाला जागा द्या

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 30/07/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
सरपंच साहेब, कलादालन विभाग हा त्यावरील नविन पाच लेखांसह मुख्य पानावर आणावा. तसेच त्या व इतरही विभागांच्या मथळ्यांना(उदा. जनातलं- मनातलं, कौल इ.) लिंका द्याव्या म्हणजे परत वरती स्क्रोल करत बसावे लागणार नाही व तिथूनच आत प्रवेश करता येइल. ही सूचना व विनंती. म्हणजे आमच्यासारख्या कलाप्रेमींनाही त्याचा सहजतेने आस्वाद घेता येइल.

मरणघाई (लोकल गोष्टी)

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 30/07/2010 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
मरणघाई ============================================= मी राजसला शाळेत सोडून पार्ला स्टेशनवर ट्रेनमध्ये चढायचे तेव्हाची गोष्ट आहे. स्टेशनवर एक जिंगल सतत वाजत असायची.. आणि शेवटच्या एका ओळी व्यतिरिक्त काहीच मला समजायचं नाही. बरं तिच्याकडे दुर्लक्ष करावं.. तर ती इतक्यांदा वाजत राहायची की एखादा तरी शब्द डोक्यात घुसायचाच. मी पाच ते दहा मिनिटं तरी स्टेशन वर असायचे त्या तेवढ्या वेळेत किमान सात-आठ वेळा तरी ती जिंगल मला ऐकावी लागायची. मग एकदा कधीतरी मी ती जिंगल नीट लक्ष देऊन ऐकायचं ठरवलं. आणि ट्रेन येत असल्याच्या, विलंब होत असल्याच्या, स्वच्छतेच्या..