कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?

पाषाणभेद जे न देखे रवी...
अरे आमच्या कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही? आवडते म्हणूनी लोणी मागतो माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो उगाच माझी खोडी काढूनी तुम्ही लोणी मज देत नाही कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? दही दुध शिंक्यात टांगले हाती माझ्या न लागे असे ठेवले संवंगड्यासवे काढाया जाता म्हणता दही मी चोरून खाई कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता उगाचच तुमची वस्त्रे विसरता न जाणोनी कोठे शोधीता आळ मजवर मग का घेई? कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई? - पाषाणभेद (दगडफोड्या) ३०/०७/२०१०
वर्गीकरण
काव्यरस

1 टिप्पण्या 1,338 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

सुभाष् अक्कावार नवीन

कविता खुप छान जमली आहे.