मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मातेचे ऋण

शुचि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
A builder builded a temple he wrought it with grace & skill pillars & groins & arches all fashioned to work his will men said as the saw it's beauty, "it shall never know decay great is thy skill o builder! thy fame shall endure for aye!" A mother builded a temple with loving & infinite care planning each arch with patience lying each stone with prayer None praised her unceasing efforts none knew of her wonderous plan for the temple the mother builded was unseen by the eyes of man Gone is the builder's temple crumpled into the dust low lies each stately pillar food for consuming rust but the temple the mother builded will last while the ages roll for that beautiful unseen temple was a child's immortal soul वरील कवितेवर आधारीत माझी कविता - कलाकार घडवे सुघड मूर्ती ओतुनी आपुले कौशल्य पणास लावे कसब सारे कणकणात डोलवे चैतन्य||१|| रंगरंगोटी जरी करीतसे करीतसे कलेची कुसर जरी परंतु कालांतराने तरी माती होतसे मूर्ती तरीही||२|| जननी घडवे घडा सुबकसा राऊळातील जणू कलश असे कठोर संयम, त्याग, शिस्त अन अथक परीश्रम त्यात वसे||३|| अनंत काळापर्यंत उजळे अलौकीक तेजाने तो घडा देई स्फूर्ती, चैतन्य, आदर्श जगास अपुल्या आचरणा||४|| कलाकार दिसतसे जगासी माता जरी ती दिसत नसे जगतावरचे बहुमोलाचे मातेचे ऋण फिटत नसे||५||

वाचने 1858 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पारुबाई 30/07/2010 - 23:15
फारच सुरेख जमला आहे अनुवाद. मस्त .. अप्रतिम

कळस.. 31/07/2010 - 20:27
but the temple the mother builded will last while the ages roll for that beautiful unseen temple was a child's immortal soul जाम भारी.....

असुर 01/08/2010 - 17:07
शुचीतै, फार फार सुंदर कविता! 'आई' या विषयावर लिहायला सिद्धहस्त लेखणीच हवी, आणि आपणाला हे जमलंय! बाय द वे, मला ही कविता 'फक्त अनुवाद' आहे असं वाटत नाही. एका कवितेवरून स्फुरलेली दुसरी कविता आहे असं वाटतंय! त्यामुळे 'अनुवाद' हा शब्द कुठेतरी खटकला. --असुर