Skip to main content

चकलीची एक जग्गात भारी आठवण... वाचाच!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 03/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
...चकलीच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आलं. इथे आल्यावर चकली खायची इच्छा झाली ,म्हणतात ना विनाशकाले विपरित बुद्धि. इथल्या एका दुकानामध्ये मूरक्कू नावाचा चकलीचा दक्षिण भारतिय चुलतभाऊ दिसला. हौस आणि हव्यासापोटी घरी घेऊन आले. घरी येऊन मस्त चहा बनवला आणि बसले ते मुरक्कू घेऊन. बोटांनी तुकडा मोडायचा प्रयत्न केला तर काही तुटेना.. मग आणखी पुढचा गाxव पणा केला आणि सरळ तोंडात टाकली. तरिही तो मुरक्कू दाद देइना तर सोडुन द्यावा ना विषय,पण नाही. हावरटपणा! त्यापुढचा गाxवपणा+ कुडुम कुडुम खायला सुरुवात केली. एक दोन सेकंद चर्वण केले.आणि पहिल्याच तुकड्यात खडा आला.

संगणकाबद्दल मदत हवी आहे.

लेखक शैलेन्द्र यांनी मंगळवार, 03/08/2010 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लॅप्टॉपवर, एक फोल्डर आहे(त्यात काय आहे ते विचारु नका, महत्वाचे आहे), मी नवीन अ‍ॅन्टी व्हायरस(इ स्कॅन) टाकल्यापासुन हे फोल्डर मला उघडता येते पण त्यातल्या फाईल उघडत नाही. तसेच सीस्टीम रीस्टोअरपण करता येत नाही. फोल्डर कॉपी कींवा कट करता येत नाही. त्याच फोल्डरमध्ये नव्याने साठवलेल्या फाइल मात्र नीट चालतात, एरर चेक वगैरे करुन पाहीले पण ऊपयोग होत नाही... काय करता येइल? मिपावरील जाणकार मदत करतील का?

नावड (लोकल गोष्टी )

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 03/08/2010 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नावड ============================= . . काही गोष्टी इतक्यांदा सांगितल्या ऐकल्या जातात की मग त्या आपल्या नसल्या तरी आपल्याशा होऊन जातात. त्या सांगणारी व्यक्ती जर नेहमी दिसणारी किंवा जवळच्या परिचयातली असली तर ती व्यक्ती समोर येताच त्या व्यक्तीने सांगितलेली त्या व्यक्ती संदर्भात घडलेली ती घटना जरा जास्तच लक्षात राहते.. ही सुद्धा तशीच एक मी न पाहिलेली घटना.. डब्यामध्ये निलगिरी तेलाचा वास भरून राहिला होता.. मी केव्हाची अस्वस्थ होते, तशी आता या वासाची सवय झाली आहे.. निलगिरी तेल सर्दी झाली असता वापरले जाते हे ही माहिती झालंय..

अदला बदली

लेखक अमोल मेंढे यांनी मंगळवार, 03/08/2010 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
" ए भाई किसीको तो पुछ लो" शेवटी माझा वैतागलेला मेंदु बोलला. रात्री १०.३० ची वेळ. शंभू, नरेश, राजु व मी मित्राच्या लग्नाला गेलो होतो. घरुनच निघायला उशीर झाल्यामुळे उशीरा पोहचणं स्वाभाविकच होतं. मुख्य रस्ता सोडुन गाडी कच्च्या रस्त्याला लागली आणि आमचे हाल व्हायला सुरुवात झाली. त्यात आमचा ड्रायव्हर त्याच्या बाजुची काच उघडी ठेवुन गाडी चालवत होता. ( काय तर म्हणे थंडीत गाडीच्या सगळ्या काचा बंद केल्या तर काचेवर धुकं जमा होऊन काहीच दिसत नाही. ) त्यामुळे आम्ही थंडी + धक्के असा दुहेरी मारा झेलत होतो. आठ वाजायला आले तेव्हा धुकं एवढं पडायला लागलं की काहीच दिसत नव्हतं.

विरासत

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 03/08/2010 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी आज माझी लिहायची पहिलीच वेळ आहे .तरी चू.भू.द्या.घ्या.मी इथे स्पिक मैके(Society for Promotion of Indian Classical Music and Culture Amongst Youth) बद्दल लिहितो आहे.स्पिक मैके हि भारतीय कला लोकां पर्यन्त पोहोचवण्या साठी काम करणारी (non pofit)संस्था आहे .या उपक्रमा अंतर्गत आम्ही शास्त्रीय संगीताच्या मैफिली;आणि काही orientation workshop(e.g.

कंट्रोल झेड

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 03/08/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीतल्या नवरा बायकोंचं एकमेकाशी पटेनासं झालं काउन्सिलिंगला कपल शेवटी आमच्यापाशीच आलं (मी विचारलं, हं सांग रे लग्न कसं ठरलं? तो म्हणाला..) माझं सर्फींग चाललं होतं, ही विंडोत उभी दिसली सहज पिंग केलं तशी सांगतो काय गोड हसली आयडिया केली, आयडी शोधला, चॅटींगला इन्व्हाईट केलं डेटाफाईल डाउनलोड केली, सांगा काय वाईट केलं? फेसबुक, ऑर्कुट, हायफाय भेटी, मेसेज, मेल रोजच्या रोज कॉन्फिग्रेशन जुळतंय वाटलं, मॅरेजसाठी केलं प्रपोज (नंतर आमचं लग्न झालं...
काव्यरस

फ्रेंडशिप Band (`बंद'!)

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 03/08/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?'' शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती. "नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला. ""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं. ""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला. ""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं. आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले.

संपादकांचे अभिनंदन

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 03/08/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही.