Skip to main content

चेंडू मारियेला

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 08/12/2010 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
चेंडू मारियेला यशोदे तुझा कृष्ण निराला राधेश्याम! चेंडू मारियेला कशी जावू यमुने तीराला राधेश्याम! चेंडू मारियेला .... ॥धृ०॥ रंगी श्रीरंग, नरनारी संग मारी पिचकारी, भिजवितो अंग दिसरात हर जागियेला .... ॥१॥ रगडी गुलाल, गळा,मान,गाली राधा लाल लाल, शरमिली झाली चराचर सुर लाजियेला ....॥२॥ माधवाचा घोष, जाहला जल्लोष बेधुंद नाचताती, मुरलीचा जोष अरविंद क्षण पाहियेला .... ॥३॥ गंगाधर मुटे .................................................. (१९८०-८५ चे सुमारास लिहिलेली गौळण)

नदीवर धुणे धुणार्या बायका !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 08/12/2010 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला बादल्या भरून भरून यायच्या गप्पा मारीत धूत बसायच्या तो काळच तसा होता सासुरवाशिणीचा अड्डा जमायला तेवढाच निव्वळ क्षण होता ...! घरच्या सुख दुखाचे रडगाणे गायला नदीकाठ किती मस्त होता तो नदीकाठ सुंदर सुरेख होता अगदी बहरून जायचा ह्या सुंदर फुलांनी कशी बांधीव नदी होती छान पायर्या पायार्या होत्या पायर्यावर कपडे आपटत बसायच्या ह्या सासुरवाशिणी ...!! डबल बी साबणाचा मस्त फेस वाहत राहायचा बघायला बरे नि बरे वाटायचे त्याचा गंध आसमंतात फिरायचा एखादे लवथवते तारुण्य डोळे खेचून घ्यायचे नागासारखा साबणाचा फेस नदीवर तरंगताना किती छान वाटायचे ...!! डोळे त्या पा
काव्यरस

(२६/११ चा मुहूर्त टळून गेल्यावर) वाराणसीत झालेला स्फोट.........

लेखक गांधीवादी यांनी बुधवार, 08/12/2010 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवाद्यांनी नेहमीप्रमाणे संवेदनशील भागांना लक्ष्य करून आपले काम साधले(?). आता पुन्हा एकदा निषेध, मेणबत्त्या, संरक्षण, हे सर्व शब्द पुढची पंधरा दिवस ऐकायला मिळेल. नेहमीप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान चिंता व्यक्त करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील. दहशतवादी काही पकडले जाणार नाहीत आणि (आपलेच काही हिरे गमावून) पकडले गेलेच तरी २०/२५ वर्षे आरामात तुरुंगात खातपीत आयुष्य काढतील. नेहमीप्रमाणे लवकरच जनता सगळे विसरून पुढच्या स्फोटाची वाट बघण्यास सज्ज होईल. तो स्फोट लोकल मध्ये, रेल्वे स्टेशनावर, बागेत, उपहारगृहात, गर्दीत, शाळेत, कि एखाद्या धार्मिक स्थळावर होईल ते सांगता येत नाही.

खसखशीच्या दाण्यावर गणपती

लेखक शुचि यांनी बुधवार, 08/12/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता गणपती बद्दल लेख चाळत होते, एका अफाट बातमीने लक्ष वेधले- खसखशीच्या दाण्यावर बोरिवली येथे राहणारे जगदीश पटवर्धन हे थ्रीडी इफेक्ट असलेले गणपती काढतात. एका हातात भिंग व दुसर्‍या हातात झिरो नंबरच्या सुईच्या साहय्याने ते खसखस, तीळ, तुळशीची बी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींवर श्रीगणेश साकारत आहेत. एक-दोनच नाही तर चक्क अष्टविनायकाचेही दर्शन ते इवल्याशा वस्तूंवर घडवत आहेत. ही कला म्हणायची की जादू? http://173.83.203.182/2010/September/07/Link/indradhanu1.htm

मेथीचे पौष्टिक लाडु.

लेखक जिवाणू यांनी मंगळवार, 07/12/2010 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: मेथीचे पिठ – ५०० ग्रॅम तेल-१किलो गुळ-१किलो अहळीव-१००ग्रॅम सुक खोबरे (किसलेले)-२५०ग्रॅम खारिक-२५०ग्रॅम काजू-१००ग्रॅम बदाम-१००ग्रॅम डिंक-१००ग्रॅम कृति: १) प्रथम पातेल्यात तेल घेऊन डिंक तळुन घेणे. २)गुळ बारीक करुन गरम तेलात टाकने.गुळ तेलात पूर्ण विरघळुन घेणे. ३) सर्व सुका मेवा मिक्सरंमधे जाडसर दळुन घेणे. मोठया भांडयात सुका मेवा, खारिक,सुक खोबरे,अहळीव,डिंक,मेथिचे पिठ हे सर्व जिन्नस एकत्र करावे. त्यात गरम तेलात विरघळलेला गुळ टाकने. ४)सर्व मिश्रण एकजीव करावे.

कुणाला मरायचं आहे का?

लेखक रन्गराव यांनी मंगळवार, 07/12/2010 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्महत्या करू का नको अशा संभ्रमात जे असतील त्यांना झट की पट निर्णय घेण्यासाठी ह्या चित्रफीतीची मदत होईल! http://www.youtube.com/watch?v=_Ile3aundFI&feature=player_embedded#!

आपण सारे शिर्डीला जावूया

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 07/12/2010 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सारे शिर्डीला जावूया या संसारातूनी....या या संसारातूनी थोडा वेळ काढूया....हो हो थोडातरी वेळ काढूया... चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||धृ|| शिर्डीला लागले साईबाबांचे पाय हो.... साईनाथांचे पाय हो शिर्डीवाचूनी मग दुसरा स्वर्ग असेल काय हो? एकदातरी... एकदातरी आपण तो स्वर्ग पाहूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||१|| साईबाबांनी कितीतरी चमत्कार हो केले.... हो हो चमत्कार हो केले गोरगरीबांचे कष्ट पळवून नेले बाबांच्या दर्शनाने... बाबांच्या दर्शनाने आपले दु:ख दुर करूया चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया शिर्डीला जावूया ||२|| बाबांच्या ध
काव्यरस

मदत हवी आहे - १) रिटायरमेंट प्लान्स २) चाइल्ड future प्लान्स

लेखक Pearl यांनी मंगळवार, 07/12/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बरेच जण आय-टी वाले आहेत. त्यांना जीवनाच्या सन्ध्याकाळी पेन्शन नसणार आहे. आणि बर्‍याच इतर jobs मध्येही पेन्शन योजना बंद झाल्या आहेत :-( परिस्थिती वाईट आहे. अशा वेळी आपल्यासारख्या तरूण पिढीवर ३ प्रकारच्या जबाबदार्‍या आहेत. १) आपल्या आई-वडिलांची जबाबदारी (कारण बर्‍याच महाराष्ट्र राज्य कर्मचार्‍यांना पेन्शन मिळत नाही. म्हणून बर्‍याच जणांच्या आई-वडिलांना पेन्शन मिळत नाही.) २) आपली स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची आताची आणि रिटायरमेंट नंतरची तजवीज, आजचे खर्च, विमे, emergency fund ३) आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षण-आरोग्य-भविष्य इ.