Skip to main content

एंंड ऑफ द वर्ल्ड

लेखक भागो यांनी रविवार, 30/01/2022 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
एंड ऑफ द वर्ल्ड आवाज झाला. लोखंडी अवजड सामान जमिनीवर पडल्याचा ठण्ण् असा आवाज झाला. मधूची झोपमोड झाली. अवेळी झोपमोड होण्याची पहिलीच वेळ असावी. मधू साधारणपणे रात्री अकरा –साडे अकरा वाजता झोपतो. झोपता झोपता पुस्तक वाचण्याची वाईट सवय त्याला लागली होती. तुम्ही असेही म्हणू शकता. पुस्तक वाचता वाचता झोपण्याची सवय.....एकदा झोपला की तो सकाळी सातलाच उठत असे. ही अशी मधेच झोपमोड कधीच झाली नव्हती. साधारणपणे रात्रीचे दोन वाजले असावेत. स्वप्न पडल्यामुळे जाग आली का तहान लागल्यामुळे? कळायला मार्ग नव्हता. ही परिस्थिती कशी हाताळायची? त्याचे ज्ञान त्याला नव्हते. काही लोकांना निद्रानाशाचा विकार असतो.

गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर

लेखक nemake_va_mojake यांनी शनिवार, 29/01/2022 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर पारा-पारा हुआ पैराहन-ए-जाँ फिर मुझे छड़ गये चारागराँ कोई आहट, न इशारा, न सराब कैसा वीराँ है ये दश्त-ए-इम्काँ चारसू ख़ाक़ उड़ाती है हवा, अज़कराँ ताबाकराँ रेग-ए-रवाँ वक़्त के सोग में लम्हों का जुलूस जैसे इक क़ाफ़िला-ए-नौहागरां *- सय्यद रजी तिरमिजी* ****** भाषांतर ******* हे देहवस्त्र आता पुरते विरून गेले मग सोयरेसखेही मागे सरून गेले चाहूल ना कुणाची आशा न मृगजळाची हे मेघ संभवाचे मग ओसरून गेले उडते चहूदिशांना ही धूळ कोरडीशी हे वाळवंट सारे भवती भरून गेले या दुःखभार वेळी दाटी अशी क्षणांची जणु शोकमग्न यात्री दुःखी, झुरून गेले *- अनुवादक
काव्यरस

ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट

लेखक nemake_va_mojake यांनी शनिवार, 29/01/2022 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट* शब्दब्रह्म हा बऱ्यापैकी वापरातला शब्द आहे. या शब्दाला प्राचीन परंपराही आहे. पण अर्थात तो बऱ्याच सैलपणेही वापरला जातो. सध्याच्या काळात माझ्यासारखा बोटांचा चाळा म्हणून काहीही खरडणाराही शब्दब्रह्माचा उपासक आणि भर्तृहरिसारखा साक्षात्कारी सखोल तत्त्वचिंतकही शब्दब्रह्माचा उपासक. फरक असतो तो उपासनेच्या दर्जाचा. भर्तृहरिसारखा थोर चिंतक स्फोट-सिद्धांतातून आदिम नादतत्त्व ते शब्दाचं प्रकट रूप किंवा स्फुट ध्वनिरूप (पश्यंति ते वैखरी) या प्रवासाची उपपत्ती मांडतो. आणि मी माझी फुटकळ, शब्दबंबाळ यमकं जुळवताना जेरीला येतो. पण म्हणून काय झालं? "शब्दब्रह्माचा उपासक"च!

युरोप सहल मार्गदर्शन

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शनिवार, 29/01/2022 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक हो ! सध्या करोना आणि ओमिक्रोनचा धोका असुनही सगळे जग पुन्हा आपापले नित्याचे व्यवहार सुरु करण्याच्या मार्गी लागले आहेत. या एप्रिल मे मध्ये सहकुटुंब युरोप सहल करण्याचा मानस आहे तेव्हा काय करावे यासाठी हा धागा. ही वेळ (season) तिथे फिरण्यासाठी चांगली की सप्टें ते डिसेंबर हा काळ अधिक चांगला असतो? खरं तर हा प्रश्न विचारला की कोणती स्थळे तिकडे कोणत्या ऋतुत बघता येतात / बंद असतात ते कळावे म्हणुन. सर्व प्रथम विमान प्रवास चालु आहे की नाही हे नक्की कसे कुठे पाहायचे आणि तिकीटाचे दर कसे ठरवयाचे, कोठे उतरायचे, हे सर्व कसं पार पडेल याची काळजी लागुन राहली आहे.

ध्रांगध्रा - २१ ( अंतीम )

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 29/01/2022 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या मानेवर कसलासा थंड पणा जाणवतो. कसलासा थंड ओला स्पर्ष.माझ्या डावी कडे आणि उजवीकडे दोन मांजरे येऊन बसली आहेत. रानमांजरापेक्षा मोठी आहेत. त्यांचे तोंड मात्र माकडासारखे आहे. पाठीच्या कण्यातून बर्फाची लादी फिरवावी तशी शिरशिरी जाते. .... मर्कट व्याळ........ कथापुराणातून ऐकलेला , कधी शिल्पात पाहिलेले प्राणी माझ्या आजूबाजूला जिवंत बसलेत. महेश म्हणत होता ते खोटं नव्हतं.. माझ्या बाजूला बसल्यावर त्यांचं गुरगुरणं थांबलंय. खिरलापखिरला माझ्याकडे थंड नजरेने पहातोय.

Absurdle (शतशब्दकथा)

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 28/01/2022 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्लिशचा गंध नाही त्यात आजारी. त्यामुळे सतत चिडचीड करत असते आजी माझ्या शब्दकोड्यात डोकं खुपसून बसण्यावरून. मीही थोडा जास्तच नादावलोय म्हणा हल्ली. दोन मोबाईल वर एकदम कोडं सोडवतो आपण. पण आॅफिसला जाताना आईनं आजीकडे लक्ष ठेव सांगितलंय म्हणजे आज no escape! हे काय? आजी सोफ्यावर धाड्कन बसली वाटतं? COUCH किती असह्य खोकते ही? COUGH पाडलाच ग्लास हिनं थरथरत्या हातानं! ही डायरेक्ट बाटलीतून का पीत नै पाणी? WATER आता पंखा फुल फास्ट करायचा तर मला हाक मारायची नं? ही इतकी घामेजलीय की काय? SWEAT दहा मिनिटं झाली, काहीच आवाज नाही हिचा? आजी, u ok? DEATH? वाटलंच! हा attempt बरोबर असणारच!

मुर्द्राक्षास...

लेखक nemake_va_mojake यांनी गुरुवार, 27/01/2022 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मुर्द्राक्षास... मुरवि मनोहर द्राक्षालागी सुधा मधुर अन् गंध केशरी मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी अशी चालली मधुरा-मधुरी द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम् पाकामधले केशर मधुरम् द्राक्षरसासह मधुमद मधुरम् द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम् - कौस्तुभ आजगांवकर *मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा
काव्यरस

डॉ. ननवरे एक मॅॅड सायंंटिस्ट्

लेखक भागो यांनी गुरुवार, 27/01/2022 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
जो माणूस झोपलेला असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या कुशीत झोपलेले असते. जो माणूस आळस झटकून उभा राहतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान उभे रहाते. जो माणूस चालत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या बरोबर चालत रहाते. जो माणूस पळत असतो त्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याच्या पाठोपाठ पळत असते. -------- इति प्रसिद्ध जपानी तत्वज्ञ मी (१५२४-१५९७) डॉक्टर ननवरे एक जगप्रसिद्ध मॅड सायंटिस्ट होते. आता त्यांच्या वेडेपणाला मॅड हाच शब्द यथायोग्य होता. ह्या मॅड शब्दाला मराठीत योग्य पर्यायी शब्द नाही.

ध्रांगध्रा - २०

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 26/01/2022 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी चुकतंय.इथेच तर होत ते दार..... इथूनच तर महेश खाली गेला. ....... मला त्या बाजूला कुठलंच दार दिसत नाही..... दार जाऊ दे एखादा कोनाडा चौकट असे काहीच दिसत नाही. अरे हे काय झालं? इथली दगडी चौकट कुठे गेली? अर्धवट उजेडात नीट दिसलं नसेल म्हणून मी पुन्हा एकदा नीट पहातो... भिंत हाताने चाचपून बघतो. हाताने थापट्या मारून बघतो. पण तिथे दार चौकट असं काही असल्याची खूणही नाहिय्ये.
मागील दुवा ध्रांगध्रा - १९ http://misalpav.com/node/49827 अखंड दगडी भिंत आहे त्यावर कोरीव काम केलंय. आपण कदाचित चुकीची बाजू बघतोय.