मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर

nemake_va_mojake · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
गझल अनुवाद मालिका - कौस्तुभ आजगांवकर पारा-पारा हुआ पैराहन-ए-जाँ फिर मुझे छड़ गये चारागराँ कोई आहट, न इशारा, न सराब कैसा वीराँ है ये दश्त-ए-इम्काँ चारसू ख़ाक़ उड़ाती है हवा, अज़कराँ ताबाकराँ रेग-ए-रवाँ वक़्त के सोग में लम्हों का जुलूस जैसे इक क़ाफ़िला-ए-नौहागरां *- सय्यद रजी तिरमिजी* ****** भाषांतर ******* हे देहवस्त्र आता पुरते विरून गेले मग सोयरेसखेही मागे सरून गेले चाहूल ना कुणाची आशा न मृगजळाची हे मेघ संभवाचे मग ओसरून गेले उडते चहूदिशांना ही धूळ कोरडीशी हे वाळवंट सारे भवती भरून गेले या दुःखभार वेळी दाटी अशी क्षणांची जणु शोकमग्न यात्री दुःखी, झुरून गेले *- अनुवादक : कौस्तुभ आजगांवकर*

वाचन 1576 प्रतिक्रिया 0