पुन्हा एकदा वर्जेश सोळंकी
फार मागे वर्जेश सोळंकी या कवितेची थोडी ओळख करून द्यावी म्हणून एक धागा काढला होता : दुवा धाग्यात बर्याच टपला मिळाल्या. निर्व्याज विडंबनांपासून सव्याज उपहासापर्यंत सर्व दक्षिणा प्राप्त झाल्या. भरून पावलो :-)
परवा याच कवीचा नवा संग्रह वाचायला मिळाला. त्याही कविता अतिशय आवडल्या. नव्या कवितांची इथल्या वाचकाना ओळख व्हावी (आणि विरोधकाना उपहासाचे नवे रान मिळावे ;-) ) या सद्हेतूने या दोन कविता देत आहे. आपल्या भल्याबुर्या प्रतिक्रिया जमल्यास द्याव्या.
मिसळपाव