Skip to main content

क्रांतीकवी कुसुमाग्रज

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 27/02/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज २७ फेब्रुवारी, महान साहित्यिक कै. कुसुमाग्रज यांची जयंती. आज त्यांचा ९९ वा जन्मदिन, आजपासून त्यांच्या जन्मशताब्दिवर्षाला प्रारंभ होत आहे. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणार्‍या आणि आपला ठसा उमटविणार्‍या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तिचे परखड बोलही त्यांचेच.
विशेष

नक्षलवाद्यांच्या मागण्या आणि सरकारी मान्यता

लेखक विकास यांनी रविवार, 27/02/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. विनील कृष्णा आणि श्री. माझी यांची सुखरूप सुटका झाली. तरी देखील त्या संदर्भातील बातम्या वाचत असताना, एक प्रश्न सतत पडला होता की नक्की काय मागण्या होत्या आणि नक्की काय मान्य केले गेले आहे. मात्र याचे उत्तर कुठेच नीटसे मिळत नव्हते. वास्तवीक सरकारने देखील हे अशा वेळेस जाहीर करायला पाहीजे. त्यामुळे फुकाची गोपनीयता राहील्याने जर काही अफवा पसरणार असतील तर थांबू शकतात. शेवटी तेहलका मधे त्यांनी म्हणल्याप्रमाणे शोधपत्रकारीतेचा वापर करत मिळवलेल्या प्रतीतील मजकूर मिळाला ज्यात हे स्पष्ट दिलेले आहे.

गीर - सिंहांच्या देशात

लेखक Manish Mohile यांनी शनिवार, 26/02/2011 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात पर्यटन विभागाची रेडीयो मिर्ची वरील अमिताभ बच्चन च्या धीर गंभीर आवाजातील गीर ची जाहीरात ऐकून माझ्या पुण्याच्या मेव्हण्याने कल्पना पुढे मांडली - गीरला जाण्याची. ताबडतोब फोनाफोनी झाली आणि संक्रांतीला जोडून आलेल्या रविवार आणि सोमवारी जाण्याचे नक्की झाले. नेटवर हॉटेल बुकिंग झालं, लायन सफारी बुकिंग झालं. गीर पासून जवळ ४० कि,मी. वर आहे सोमनाथ - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ६० कि. मी वर आहे दीऊ. आम्ही दीऊला आधी जाऊन आलो होतो म्हणून या वेळी फक्त गीरला जायचं ठरलं.

चिकन पॉट पाय

लेखक स्वाती२ यांनी शनिवार, 26/02/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वी ड्राइववे जवळ्च्या वाफयातून डॅफोडिल्सचे कोवळे कोंब डोकावताना दिसले. 'चला थंडी लवकरच पळणार तर' अस म्हणत मी उत्साहाने बियाणांचे कॅट्लॉग उघडले. पण मिडवेस्टची थंडी अशी सुखसुखी थोडीच जाणार? काल पुन्हा एकदा रेन, स्लीट, स्नोचे नाटक झाले. दोन तास उशीरा भरणार्‍या शाळेनेही 'विंटर वेदर वॉच' वर शिक्कामोर्तब केले. 'मॉम, वुई नीड सम कंफर्ट फूड.' लेकाची भूणभूण. कंफर्ट फूड म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो गरम गरम मऊ भात, साजूक तूप, मेतकुट, पोह्याचा भाजलेला पापड. पण लेक पक्का हुझिअर. त्यामुळे फर्माइश झाली चिकन पॉट पायची. जोडीला मदतीचे आश्वासनही होते.

सुंदर हसली गालावर खळी

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 26/02/2011 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्याशिवाय काय गवसले सांग सखे तुजला हजार वेळा जरी चाचपले ह्रदय माझे शिंपला शिंपल्यातील मोती माझा वसे तुझ्या नयनांतुनी गुलमोहर बहरतो माझा तव रक्तवर्णी ओठांतुनी गुलमोहराचा बहर सारा हास्यातुन तुझिया ऊधळे मंद गंधासह फिरे वारा मंतरल्या श्वासात ऊसळे श्वासात श्वास, आरक्त नजर चेहर्‍यावर ही संध्यालाली मिटलेले ओठ, अंतरी गजर तव प्राण दाटले कर्णफुली कोवळ्या प्रितीचे गुज ऐकुनी उष्मावली तव कर्णपाळी ओठी उतावळा 'हो'कार दाबुनी सुंदर हसली गालावर खळी |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२६/०२/२०११)
काव्यरस

मुंब्रा देवी आणि परिसर

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 26/02/2011 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
मुंब्रा देवी मंदिर पायर्‍या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला.

उल्का

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शनिवार, 26/02/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
अंधाराच्या निसरड्या कातळावरून निसटून अवकाशाच्या खोल दरीत असहाय कोसळताना निर्वाणीची मदत मागणारे त्याचे दोन हात तुला दिसले नसणारच… त्याच काळ्या कभिन्न पोकळीत होरपळत अदृश्य झालेल्या त्याचं पुढे काय झालं असेल ही काळजी अस्फुटशी सुद्धा तुला शिवली नसेल याचीही खात्री आहेच पाहिलं मी तुला त्या रात्री स्वप्नांची झापड ओढलेल्या अनिमिष नेत्रांनी निखळणा-या ता-याकडे स्वतःसाठी अजून एक मागण मागताना