तुझ्याशिवाय काय गवसले
सांग सखे तुजला
हजार वेळा जरी चाचपले
ह्रदय माझे शिंपला
शिंपल्यातील मोती माझा
वसे तुझ्या नयनांतुनी
गुलमोहर बहरतो माझा
तव रक्तवर्णी ओठांतुनी
गुलमोहराचा बहर सारा
हास्यातुन तुझिया ऊधळे
मंद गंधासह फिरे वारा
मंतरल्या श्वासात ऊसळे
श्वासात श्वास, आरक्त नजर
चेहर्यावर ही संध्यालाली
मिटलेले ओठ, अंतरी गजर
तव प्राण दाटले कर्णफुली
कोवळ्या प्रितीचे गुज ऐकुनी
उष्मावली तव कर्णपाळी
ओठी उतावळा 'हो'कार दाबुनी
सुंदर हसली गालावर खळी
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२६/०२/२०११)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4881
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह. सुंदरच रचना आहे. आवडली.
सुंदर कविता.. आवडली. पराभौंनी
झकास!
प्रिटी झिंटा आठवली आणि डॉण्या
खूप छान आहे कविता.
मस्त जमलिय!
कवितेच्या प्रत्येक कडव्याची
सर्व
कोवळ्या प्रितीचे गुज