Skip to main content

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

रोज कौतुकात दंग बायको जरी ,

लेखक विदेश यांनी शनिवार, 19/03/2011 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल: आज गोकुळात रंग खेळतो हरी - ) रोज कौतुकात दंग बायको जरी , लाटणे जरा जपून आज बघ करी |धृ | तोच मित्र रोज सिगारेट ओढतो थेट खिशातून तुझ्या नोट काढतो , गुंतवुनी बोलण्यात चहा उकळतो - सावध केले मी तुला कितीदा तरी |१| सांग मित्रमंडळास काय जाहले ? कुणी गंडविल्याविना कुणा न सोडले ! ज्यास त्यास लुटण्याचे चंग बांधले - एकटाच वाचशील काय तू तरी |२| तू कधीच रंगढंग नाही उधळला ! मित्रमंडळात तरी कसा गुंगला ? तो पहा - चंडिकेस पत्ता लागला ... हाय, धावली धरून लाटणे करी |३|
काव्यरस

रंगताना रंगामध्ये

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 18/03/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
रंगताना रंगामध्ये यमुनेच्या तिरावर, आवळीच्या झाडावरी दडुनिया बसला गं, नटवर गिरिधारी पाहुनिया राधिकेला, गुपचिप कान्हा आला घेऊनिया पिचकारी, नेम धरितो मुरारी सोडीयेली धार कशी? सररररर रंगताना राधा बोले अररररर बावरता राधा पळे, असे कान्हुला तो छळे तरी चुकेचिना लळे, सावळ्याच्या चाळ्यामुळे मग राधा करुणेने, बोलू पाहे केविलवाणे रंगलेले रूप म्हणे, आहे मला घरी जाणे आतातरी थांब ना रे.....! कान्हा, आतातरी थांब ना रे.....! अरे थांब गिरिधारी नको मारू पिचकारी, रंगामध्ये भिजविशी किती रे मुरारी ...IIधृ०II माळ तुटली कशी?

सल्ला हवा आहे

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 18/03/2011 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, तसे जगातले सर्व ज्ञान असणारे काही थोडी लोकं मिपावर आहेत त्यात आमचा, नानाचा वगैरे नंबर लागतोच. मात्र काही काही गोष्टी ह्या चार जणांच्या सल्ल्यानीच कराव्यात असे जुने-जाणते, अनुभवी वडिलधारी सांगुन गेले आहेत. तेंव्हा एका महत्वाच्या गोष्टीत तुमचा सल्ला हवा आहे. मी व आमचा परम मैतर नाना बरेचशे धंदे भागिदारीत करत असतो. त्यातले काही ऑनलाईन असतात तर काही ऑफलाईन. मात्र सर्व सहसा संगणकाशी संबंधीतच असतात. चार पैसे सुटले, रात्री दोन पेग सुटले की झाले असे आपले आमचे सोपे गणित असते.

चित्त रमले हरिपायी ....

लेखक विश्वेश यांनी शुक्रवार, 18/03/2011 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
चालीवर लिहिण्याचा पहिला प्रयत्न ... सोडली जुनी वहाणे .... चाललो पंढरीचे ठायी .... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... आला न्यानियाचा गाव .... जमले सारे रंक नि राव .... हरिनामाच्या घोषात ... उभा आसमंत न्हाही चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... रूप पाहता लोचनी .... तृप्त जाहलो ध्यानीमनी .... पाहून सावळा मनोहर .... भान हरपून जाई .... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी .... विसरुनी रोजचा रहाट .... झाली नवीन पहाट झालो कधी मोकळा .... माझे मलाच कळले नाही ... चित्त रमले हरिपायी .... चित्त रमले हरि पायी ....