पाचवी खोली
गिरगावातल्या चाळीत वाढलेल्या आमच्यासारख्या लोकांचं घराबद्दलचं एक स्वप्न असतं. स्वप्न सुरू - घरात एक प्रशस्त, हवेशीर संडास असावा - स्वप्न समाप्त. जास्त अपेक्षा नाहीत. मजल्यावरच्या ४ बिर्हाडात मिळून एक असलेल्या सार्वजनीक संडासाला आम्ही प्रेमाने पाचवी खोली म्हणत असू. काही लोक त्याला 'मालकाची खोली' असंही म्हणत. संडासाला 'मालकाची खोली' म्हणण्यामागे चाळ मालकाला नावं ठेवणं इतकाच हेतू नसून त्या बोलण्याला 'फक्त खोलीचं भाडं देऊन संडास फुकट वापरता' असं मालकाने ऐकवल्याची पार्श्वभूमी असे. चाळीतला संडास हा क्लिओपात्राच्या बाथ-टब सारखा लेख लिहायच्या लायकीचा जिन्नस नाही.
मिसळपाव
जिनिव्हा मधे येऊन आठवडा होत आला होता तरी माझ्या कॅमेर्यामधे एक सुध्दा फोटो नव्हता. ऑफिसच्या कामामुळे स्टुडीओबाहेर पडायला पण वेळ मिळत नव्हता. शुक्रवारी सकाळी मी आणि माझ्याच बरोबर युनायटेड नेशन्स साठी काम करणारा कोल्हापूरचा प्रशांत सुर्यवंशी आम्ही दोघांनी शनिवारी झर्मितला जाण्याचा बेत आखला.
