चटपटीत भेळ
माझी मिपावरची पहिली वहिली पाक्रु (गणपा, निवेदिता तै, स्वाती तै आदी प्रभूतींनी सांभाळून घ्यावे ;) )
थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही
चटपटीत भेळ (४ माणसांसाठी)
साहित्य :
कुरमुरे - ८ वाट्या
फरसाण - २ वाट्या
बारीक शेव - १ वाटी
कोथिंबीर , पुदिना - २ वाट्या
लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या - ५,६
टोमाटो, उकडवलेले बटाटे, २ कांदे (बारीक चिरलेले)
खजूर - १ वाटी
चिंचेचा कोळ - अर्धी वाटी
गुळ - १ चमचा
जिरं, मीठ , चाट मसाला चवीपुरता
कृती :-
गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी
मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार
तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .
आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा
आता या भेळेला चाट गाडीवरच्या , कुठे कुठे हात लावून खाजवलेल्या भैयाच्या हाताची चव येणार नाही, पण अशी चव येईल कि तुम्ही परत गाडीवर जाणार नाही हे नक्की
;)

वाचन
22135
प्रतिक्रिया
0