मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंडा भुर्जी आणि चपाती

कुंदन · · पाककृती
सकाळ पासुन लाईट नव्हते ( नाही अर्थ अवर नव्हता) , म्हटले आता लाईट्या आल्यात तर काही तरी खायला बनवावे... साहित्य : २ मध्यम कांदे २ अंडी ( कोंबडीची ) ३-४ हिरव्या मिरच्या १ टी स्पुन हळद. मिठ चवीनुसार. लाल तिखट झेपेल तेव्हढे. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . Bhurji Chapati क्रमाश:

वाचने 9959 वाचनखूण प्रतिक्रिया 25

कच्ची कैरी 28/03/2011 - 17:54
हे काय पाकृ कुठेये?अस मी विचारणार नाही कारण खाली क्रमशः लिहिले आहेच पर ये बात कुच हजम नही हुई -)हाजमोला घ्यायला सांगु नका ,नका नका सांगु नका ;)

सुहास.. 28/03/2011 - 18:21
मेव्या , लेका 'क्रामशः' नाय रे क्रमाश ...आता कुठ-कुठले मास..आय मीन...माश दाखवतो हा काय माहीत पुढे ;) अवांतर : मॅच बघायला येतो आहेस ना बे ? असो कुंद्या, लेका चपात्या. पण या यला लागल्या व्हय तुला आता . पुन्यांदा बाप झाल्यावर सुधारलास लेका ;)

पैसा 28/03/2011 - 19:24
पुढच्या पाकृच्या प्रतीक्षेत... >>२ अंडी ( कोंबडीची ) =)) =)) (चपात्या छान झालेल्या दिसतायत हो! कोणी केल्यात तेवढं सांग.)

In reply to by सविता

टारझन 29/03/2011 - 20:32
जाउ द्या , प्रतिक्रीयेतले सिख कबाब प्रतिक्रीया उडवणार्‍याला फार आवडले , आणि त्याने ते खाऊन टाकले असावेत :) सो , हॅपी फॉर उडवणारे ! अवांतर : आत्ताच कुंद्याला जी-टॉक वर प्रतिक्रीयेबद्दल काही अक्षेप असल्याचे विचारले . त्याला त्यात काही एक वाटलं नव्हतं :)

In reply to by अभिज्ञ

कुंदन 28/03/2011 - 21:06
>>ही पाकृ अंडे न वापरता कशी करता येईल? तुम्ही अंड्या ऐवजी पनीर वापरु शकता. मात्र पनीर भुर्जी ची पा कृ मी देणार नाही. ;-)

गणपा 28/03/2011 - 19:57
व्हेजकडुन अंड्याकडे, आणि अंड्याकडुन चिकनकडे उत्तरोत्तर प्रगती होणार असे दिसतेय. बाकी मला आधी वाटलं की लंबुच्या पाउलांवर पाउल टाकत कुंद्याने याचं विडंबन टाकलय की काय?

५० फक्त 29/03/2011 - 07:34
+१ टु इरसाल, मला पण पोहेच वाटले, म्हणजे काय अजुनही वाटत आहेत. जो पर्यंत कढई किंवा तव्याच्या काठावर अंडे फोडुन ते परतलेल्या कांद्यावर टाकल्याचा फोटो येत नाही, तो पर्यंत ही अंडा भुर्जी वाटणार नाही. दादर पुर्वेला नितिनची गाडी आणि पुण्यात कर्वे रोडवर हर्षल हॉलजवळ अप्पाची गाडी या ठिकाणि अंडा भुर्जी हा पदार्थ अक्षरक्ष: हाव-यासारखा खाल्लेला आहे.

sneharani 29/03/2011 - 10:39
लेख क्रमशः येतात पण चक्क पाककृती क्रमाश:? क्रमाशः ठेवलीये म्हंटल्यावर..... पाककृतीत अंडी कशी फोडायची पासून कणीक कशी मळायची याची डिटेल कृती येणार आहे की काय? ;)

स्मिता. 29/03/2011 - 13:50
२ अंड्यांसाठी ३-४ हिरव्या मिरच्या + झेपेल तेव्हढे लाल तिखट, २ कांदे, १ टी स्पून हळद!! ये प्रमाण कुछ हजम नही हुवा... क्रमाशः म्हटलेले असल्याने अपेक्षा करते की पुढच्या भागात आणखी अंडी असतील ;)

In reply to by स्मिता.

नगरीनिरंजन 29/03/2011 - 13:57
:-D अंड्यांच्या मानाने तिखट आणि मिरच्या जास्त झाल्याने कदाचित पाकृ क्रमश: ठेवून पाचवी खोली गाठावी लागली असावी असा आमचा कयास आहे. ;-) कुंदनभौ, ह.घ्या.

सहज 29/03/2011 - 14:06
कुंदनसेठ तुम्ही शाकाहारी आहात ना? पहिला फोटो पाहून तरी ती अजिबात अंडाभुर्जी वाटत नाही आहे. लाल तिखटाचा रंग गेला आहे. का आता लाल तिखट झेपत नाही हो कुंदनसेठ? खालच्या फोटोतील पोळीची, फोडणीची पोळी (पोळीचा चिवडा का भाजी अजुन काय म्हणत असतील ते.) केली आहे असे वाटते आहे.