Skip to main content

तरी का ?

लेखक उगा काहितरीच यांनी बुधवार, 20/04/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी ! वरीष्ठ मिपाकरांची आज्ञा /ईच्छा मानुन बर्‍याच दिवसानंतर येतोय . आशा करतो कि विसरले नसनार ( तशी मराठी मानसाची स्मरणशक्ती दांडगी हो!:) ) मागच्या काही दिवसापासुन आमच्याकडे माझी आजी आलेली आहे. आणि तिला टि.व्ही. वरच्या सगळ्या मालिका जाम प्रिय (star plus च्या हो !) तिच्यामुळे मलाही IPL च्या ब्रेकमध्ये का होईना पण पाहाव्या लागतात :( मला कळत नाही की लोकांना या प्रकारच्या मालिका पाहवतात तरी कशा ?

पावसात भिजतांना

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 20/04/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
बरसणार्‍या मेघधारांना वार्‍यावर पेटतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना सरीवर सर कोसळून हे कृष्ण मेघ गडगडतांना पहायचेय तप्त धरेसह माझ्या मनास निवतांना रुसलेल्या गुलाबाच्या कळीला हलकेच उमलतांना पहायचेय क्षितिजावरील इंद्रधनुष्यातील सप्तरंगांना ग्रीष्माचा दिवस सारून श्रावणसांज अवतरतांना पहायचेय जाईवेलास फिरुनी तरुण होतांना ओलेत्याने तिला माझी कविता गुणगुणतांना पहायचेय मोहरून तो कोकीळकंठ पालवतांना पहायचेय तिला एकदा या पावसात भिजतांना पहायचेय तिने मला एकदा, मी तिला चिंबून पाहतांना |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२०/०४/२०११)
काव्यरस

[पेग घ्यायची ओढ लागली]

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/04/2011 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेदाची क्षमा मागून एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे. [पेग घ्यायची ओढ लागली] नकोच आता दुर सुराही पेग घ्यायची ओढ लागली ||१|| पत्ते वाटा बसू गच्चीवर नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२|| ओळखीच्यांना उधार दिली माज करत ती सांडवत नेली ||३|| वायू परिचीत नाकास लागला टुरटुर आवाज देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर मारून फेकले लाटणे तोवर ||५|| पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली जुन्या उधारीची आठवण आली ||६|| गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||
काव्यरस

सावकारी ही अशी की...

लेखक बन्या बापु यांनी बुधवार, 20/04/2011 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
सावकारी ही अशी की, कुणी कुणाचा नाही, हसलो जरी मी, ते हसू मात्र माझे नाही. खिडकी माझी रिती आज, चांदणे मात्र नाही, चंद्र आहे नभात तो, झेंड्यात माझ्या नाही.. तोच म्हणतो कि मी, सूर्य आहे उद्याचा.. जाणीव अस्तिवाची, काजव्यास उरली नाही .. तू आलास तर परत जाशील, रित्या हाताने आज इथे, बड्व्याच्या गर्दीमध्ये विठ्ठल माझा तु नाही.. इथे आहेत सगळे शहाणे, वेडा मात्र कोणी नाही, आहेत हिंदू मुस्लीम सगळे, माणूस मात्र कोणी नाही .. राहुन वाटते हे, का जगलो असा मी ? आयुश्यात मला, सावकारी जमलीच नाही. घेऊन जा आता, मज तुझ्या संगे म्रुत्यु , ज्यांना म्हंटले आपले, ते सगे ( कोणी ) माझे नाही.
काव्यरस