Skip to main content

कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर

लेखक निनाद यांनी सोमवार, 09/05/2022 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
कॉमेंट्सचे वार्षिक कॅलेंडर सादर करत आहे. १५ एप्रिल ते १५ मे - काय हा भयानक उन्हाळा आहे, असा उन्हाळा आधी कधीच नव्हता! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जून च्या आसपास - पहिला पाऊस झाला आणि नंतर गुल झाला पाऊस! सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० जुलै - फार जास्त पाऊस झाला हो, थांबायचे नाव नाही. ३० जुलै - खांदेश-मराठवाडा-विदर्भ - पाऊस न्हयी शे औंदा! येक्दाच पल्डा मंग पाऊस गेला. आता टँकरच बोलवा लागते. सगळेच ऋतू बदलत चालले आहेत! ३० सप्टेंबर - पाऊस जास्तीच झाला थांबायचे नाव नाही!

योग म्हणजे नक्की काय ?

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 09/05/2022 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
योग म्हणजे नक्की काय ? प्रस्तावना . योग म्हणजे नक्की काय आहे ? हा प्रश्न मला बरेच दिवस भेडसावत होता . (खरा शब्द हा योग किंवा संस्कृत मधे योगः असाच आहे. योगा असा जो वापर होतो तो चुकीचा आहे .) या शब्दाच्या अर्थाचा शोध घेण्याचा प्रयत्न मी सुरु केला तेव्हा या विषयाचा आवाका बघून मनावर खूप दडपण आले. तथापि प्रयत्न सुरूच ठेवले. एका जिज्ञासूच्या भूमिकेतून मी या प्रश्नाचा शोध घेतला आहे ,तो तुमच्यासमोर मांडला आहे. आंतरजालावर असलेली माहिती आणि काही उपलब्ध पुस्तके यांच्या आधारे मी हा शोध घेतला आहे.

शशक'२०२२ - मलम

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
गावातील पट्टीच्या पोहनार्याने मृतदेह ओढून आणला. पोलिस गाडी नी पाठोपाठ ऐंब्युलन्स निघाली. कोवळा मृतदेह पाहून डाॅक्टरना वाईट वाटले. “पोहता येत नाही तर खोल तलावात गेलाच का?” पांढरे शर्ट नी काळी पॅंट घालून जमलेल्यात सरांचं जोरदार आगमन झालं.

शशक'२०२२ - चोरी

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी इन्स्पेक्टर अजय. अनेक चोरांना पकडणारा. माझ्या कपाळावर एक व्रण आहे. लहानपणी काकांनी मला मी त्यांचे पैसे चोरले म्हणून मारलं होतं. तेव्हापासून माझ्या कपाळावर आहे. आईलाही काकू खूप छळायची. त्याच रात्री माझ्या विधवा आईनं माझ्यासकट घर सोडलं. पुढं आम्ही एका महिलाश्रमात राहिलो. मला आईनं शाळेत घातलं. तीही प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली. मी शिकलो. पोलीसदलात गेलो. आज आम्ही सन्मानानं जगतोय. माझ्या कपाळावरचा व्रण चाचपला की मी न केलेल्या चोरीबद्दलचा मार आठवतो. त्या दिवशीची चोरी कुणी केली ते मला माहीत आहे. माझ्या आईनं! होय आईनं. पण मी समजून घेतलंय तिला.

शशक'२०२२ - तेच तेच पुन्हा पुन्हा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
किती छान झोप लागली होती. लोक झोपू पण देत नाहीत. डोळे उघडले तर लख्ख प्रकाश! एलइडी लॅंप हं. मागच्या खेपेला कंदिल होता. अरे बापरे! म्हणजे पुन्हा सगळं नशिबी आलं. गमभन, पाढे, व्हफा, मॅट्रिक, नोकरी, लग्न, मुलंबाळं, हगेरीमुतेरी, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं, त्यांची लग्नं, त्यांची मुलंबाळं... ओ, शिट! रडू आवरेना. “काय पण वेडं विद्रूप टकलू माकड.” “अगं, अस का बोलतेस...” “अहो असच बोलायचं असतं. नाहीतर आपलीच दृष्ट ..

शशक'२०२२ - बुडबुडा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या चिंतांनो, त्राग्यांनो, तणावांनो, भित्यांनो.. रोज थोडंथोडं नका छळू. तुमची युनिटी करा आडरानात गाठून मुंडी मुरगाळा विषय संपवा सुटकेची एकही आशा ठेवू नका इकडे पहा मी इथे ह्या बुडबुड्यात आहे या आणि पहा जिवंतपणाची कसलीही सळसळ तुम्हाला दिसणार नाही. हा बुडबुडा आपोआप फुटायची वाट बघत मी पडून आहे.. मी स्वतःहून तो फोडणार नाही तेवढी ऊर्जाही माझ्यात नाही आणि ज्या रस्त्याचा शेवट माहित नाही, त्या रस्त्याने कधी गेलो नाही.. म्हणून तुम्ही सगळे मिळून या मला उचलून उघड्या जगात फेका दोन दिवसांच्यावर मी टिकणार नाही शब्द देतो..! बाकी कसाही असलो तरी, मी शब्दाला जागणारा माणूसाय..! कारण शब्दांशिवाय दुसरं काही आ

शशक'२०२२- सूचित

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
वडाच्या झाडाखाली एका टपरीवर, तू छान सिगरेट ओढत असतेस खोकत खोकत का होईना, धुराचे लोळ हवेत सोडत असतेस तुझा तो बॉयफ्रेंड, तुझी पर्स पकडून उभा असतो तुझ्यासाठी आता तो, दुसरी शिलगावून देणार असतो त्या काळोखातून बाहेर, कोणीतरी येताना तुला दिसतो त्या आकृतीकडे बघून, तुला मोठा धक्का बसतो!! “मग पुढे काय होतं?” “मला काय माहित?” “म्हणजे? तू ही कविता केली नाहीस?” “नाही ना, तुमच्या ऑफिसच्या बॅगमध्ये हा कवितेचा कागद सापडलाय” असं म्हणत आमच्या हिने गॅस पेटवला. “पण मग अशी कविता कोणी केली? आणि कशाला? स्ट्रेंज…” तेवढ्यात मला मोबाईलवर कॉल येतो, मी कॉल घेतो. “हॅलो पप्पा, आपली चिनू ताई परत सिगरेट ओढतेय”

शशक'२०२२ - योगायोग

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 09/05/2022 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले. "काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?" "सॉरी चुकले. घरुन फोन आलेला की त्वरित घरी ये…" "इथं लगोपाठ ट्रेन असतात. दुसरी मिळाली नसती का?" ती ओशाळली, आतमध्ये सरकली. तो सांताक्रुझला उतरला आणि खिसे चाचपडु लागला. मागोमाग ती. "काय झालं?" "शट! मगाचच्या गडबडीत आईने मुलीकडच्यांचा एक पत्ता दिलेला तो कागदच उडुन गेला. मी सांताक्रुझचीच, पत्ता सांगाल?. "साफल्यनगर" "समोरचीच कॉलनी, मी तिथेच राहते.

हंपी, हंपी आणि पुन्हा हंपी! भाग ४ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 08/05/2022 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
१० ऑगस्ट
केएसटीडीसी मयुरा भुवनेश्वरीमधल्या एकूण व्यवस्थेवर आम्ही समाधानी असलो तरी काल दिलेला नाश्ता मात्र अजिबातच चांगला नव्हता. रविवारी इडली-सांबार आणि उडीदवडे होते. मात्र हे पदार्थ फक्त शनिवार-रविवारच बनवले जातात असं सांगून हॉटेलवाल्यांनी काल फक्त पोहे आणि उपीट यावर आमची बोळवण केली होती. साहजिकच आम्ही तक्रार केली; तेव्हा आज जरा चांगला नाश्ता मिळाला.

शशक'२०२२ - फरियाद

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 08/05/2022 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेन स्टेशनमधुन निघाली . त्या दोघांनी धावतपळत आपला डबा गाठला . " हे दागिने ." तिने आपल्या बॅगमधला डबा काढुन त्याला दिला . "आईबाबांना न सांगता मी त्यांचे दागिने घेतले . आपण सेटल झाल्यावर त्यांना नक्की परत करु ." ती रडु आवरत म्हणाली . "जरुर . गावाकडे चाचुचा बडा कारोभार आहे . आपण त्यांच्याकडेच राहुया ." "आई बाबांनाही आपल्याकडेच बोलवुन घेउ ." ती म्हणाली . त्याने तिला हलकेच थोपटले . तिला गाढ झोप लागली . त्याने उठुन टॉयलेटमधे जाउन फोन लावला . "आज और एक शिकार फस गयी ." " शाबास .