मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२- सूचित

साहित्य संपादक · · स्पर्धा
वडाच्या झाडाखाली एका टपरीवर, तू छान सिगरेट ओढत असतेस खोकत खोकत का होईना, धुराचे लोळ हवेत सोडत असतेस तुझा तो बॉयफ्रेंड, तुझी पर्स पकडून उभा असतो तुझ्यासाठी आता तो, दुसरी शिलगावून देणार असतो त्या काळोखातून बाहेर, कोणीतरी येताना तुला दिसतो त्या आकृतीकडे बघून, तुला मोठा धक्का बसतो!! “मग पुढे काय होतं?” “मला काय माहित?” “म्हणजे? तू ही कविता केली नाहीस?” “नाही ना, तुमच्या ऑफिसच्या बॅगमध्ये हा कवितेचा कागद सापडलाय” असं म्हणत आमच्या हिने गॅस पेटवला. “पण मग अशी कविता कोणी केली? आणि कशाला? स्ट्रेंज…” तेवढ्यात मला मोबाईलवर कॉल येतो, मी कॉल घेतो. “हॅलो पप्पा, आपली चिनू ताई परत सिगरेट ओढतेय”

वाचने 4769 वाचनखूण प्रतिक्रिया 8

श्वेता व्यास 09/05/2022 - 12:33
+१

चांदणे संदीप 10/05/2022 - 09:39
+१ सं - दी - प

संजय पाटिल 10/05/2022 - 16:36
+१

प्राची अश्विनी 16/05/2022 - 05:34
+1