आसूड
नाही भय लाज
सारे सत्तातूर
देशाचा विचार
कवडीमोल
लोभालोभ सारा
सत्तेचिये पायी
आपापल्या सोयी
लाघव भावे
आज वाटे त्यांसी
ब्रम्हांड ठेंगणे
टेकीता ढुंगणे
खुर्चीवरी
सुखाचिया राशी
त्यांच्यांच पायाशी
मग जनतेशी
काय पुसावे?
मतीमंद झाला
आज बुद्धीवंत
नाही बलवंत
कोणीच येथे
उठ माझ्या लेका
आता नको चुका
नाहीतर भिका
मागशील
हातामध्ये घेरे
सत्तेचा आसुड
भडव्यांच्या ओढ
पाठीवरी
हिच माझी इच्छा
पुरी कर बाबा
देशाचा या ताबा
तुझे हाती ..!!!
मिसळपाव
आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त.
मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु.