मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सृष्टीविज्ञान मासिक. ८५ वर्षे पूर्ण. हा १००० वा अंक

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
मित्रहो, हे आवाहन जर कोणाला इ-मेल ने आले असेल किंवा मिपाच्या धोरणात बसत नसेल तर उडवायला माझी अजिबात हरकत नाही. खाली दिलेल्या मासिकाला आज ८५ वर्षे पूर्ण झाली आहेत यासाठी ते अभिनंदनास पात्र आहे. आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन आणि आभारही मानूयात. या मासिकाचे संस्थापक श्री. गो.रा. परांजपे आपल्याला माहीत असतीलच. त्यांनी आकाशातल्या ग्रह तार्‍यांबद्दल जे पूस्तक लिहीले आहे तेच हे थोर गृहस्त. मराठीत एवढी वर्षे विज्ञानाला वाहिलेले मासिक चालवायचे सोपे नसावे. आपण सर्वांनी याची वर्गणी ( वा्र्षिक रु. २००/- फक्त) भरून या कार्यास हातभार लावावा अशी विनंती. वर्गणीचा अर्ज साठी येथे क्लिक करा : "अर्ज" जयंत कुलकर्णी.

वाचने 6100 वाचनखूण प्रतिक्रिया 12

रणजित चितळे 23/07/2011 - 20:23
मी वाचायचो मला आठवते वासंती काळे त्याच्या संपादक होत्या काही दिवस (वर्ष) नाव वासंतीच होते का आता आठवत नाही पण आडनाव काळे होते.

योगप्रभू 23/07/2011 - 21:11
जयंतराव, अर्जाच्या लिंकवर क्लिक करताच आमचा संगणक 'वॉर्निंग' द्यायला लागलाय. त्यापेक्षा वर्गणी भरण्यासाठीचा पोस्टल अ‍ॅड्रेस नमूद करता का? आजीवन वर्गणीदार होण्याची योजना आहे का?

In reply to by योगप्रभू

मला विशेष कल्पना नाही. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला या मासिकाविषयी आजच कळाले. अर्थात श्री. परांजपे यांची सर्व पुस्तके माझ्याकडे असल्यामुळे हाही उपक्रम चांगला असणार असे वाटून आजच पैसे भरले.

In reply to by योगप्रभू

सागर 13/10/2011 - 12:53
महाराष्ट्रातून संपर्क करण्यासाठी वा वर्गणी भरुन अंक घरपोच मिळवण्यासाठी पत्ता असा लिहावा महाराष्ट्रात वर्गणी २०० रुपये सृष्टीज्ञान मासिक, महात्मा फुले वस्तुसंग्रहालय, १२०३, शिवाजी नगर, घोले रस्ता, पुणे - ४११ ००४. संपर्क : ०२०-२५५३२७५० महाराष्ट्राबाहेरुन संपर्क करुन सृष्टीज्ञान घरपोच (अथवा ऑफिसपोच) मिळवण्यासाठी पत्ता इंग्रजीतूनच लिहावा महाराष्ट्राबाहेर वर्गणी २००+२५ जास्तीचे पोस्टेज - एकूण २२५ रुपये चेक अथवा डिमांड ड्राफ्ट ने पाठवावेत. इंग्रजी पत्ता: Srushtidnyan Masik, Mahatma Phule Vastusangrahalay 1203, Shivaji Nagar, Ghole road, Pune - 411 004. Contact: 020 – 25532750

निनाद 25/07/2011 - 07:17
इतके महत्त्वाचे विज्ञान संबंधित प्रकाशन असूनही त्याची एक साधी वेबसाईट नसावी? जयंत साहेब संचालकांशी बोलाल का जरा? मी पुढाकार घ्यायला किंवा मदतीला तयार आहे.

In reply to by निनाद

निनाद, मी त्यांच्याशी बोलतो. लोकविज्ञन, तारांगण आणि सृष्टीज्ञान ही तिन्ही एकत्रच वाटचाल करतात असा अंदाज आहे. काय स्वरुपाची मदत आपण करू शकता व इच्छिता हे कळाल्यास, त्यातील योग्य माणसाची आपली गाठ घालून देता येईल. धन्यवाद !

Nile 25/07/2011 - 09:13
इतकी वर्षे अखंडीत सूरू असलेल्या विज्ञानाच्या मराठी मासिकाबद्दल ऐकून फार बरे वाटले. मासिकाला मनापासून शूभेच्छा!

In reply to by Nile

सहज 25/07/2011 - 09:24
हेच म्हणतो. मनःपूर्वक शुभेच्छा! शिवाय वर्गणी देखील इतकी कमी आहे की वर्गणी भरुन हे अंक काही शाळांना भेट देता येतील! माहीतीबद्दल धन्यवाद.

In reply to by आत्मशून्य

मदनबाण 17/10/2011 - 13:29
वरील दोघांशी सहमत. :) लहानपणी भाभा संशोधन केंद्राचे एक छोटेसे वैज्ञानिक माहितीचे पुस्तक वाचायचो ते या निमित्त्याने आठवले,बहुतेक कुतुहल नाव होत त्या पुस्तकाच.