ज्योतिष - दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजीची अत्यंत घाणेरडी पौर्णिमा -१
३१ जुलैच्या शुभ अमावस्येने अमेरिकेला आर्थिक पेचातून तारले आता पुढे काय आहे ते बघायला हवे.
सहसा मी पौर्णिमेविषयी लिहीत नाही अशी बर्याचजणाची तक्रार आहे, पण या खेपेस लिहायचे ठरवले आहे. कारण आगामी पौर्णिमा ज्या ग्रहयोगांमध्ये सापडली आहे ते बघता लोकाना सावध न केल्यास तो एक प्रकारचा ज्योतिषाशी अप्रामाणिकपणा ठरण्याची शक्यता आहे.
दिनांक १३ ऑगस्ट २०११ रोजी सायन सिंह-कुंभ राशीत २० अंश ३६ मि.वर होणारी पौर्णिमा अत्यंत घाणेरडी असून ती बर्याच जणाना त्रास देण्याची शक्यता आहे. जनक्षोभ, घातपात किंवा मोठे अपघात दर्शवणारी ही पौर्णिमा अनेकाना मन:स्ताप, शारीरिक इजा किंवा हानी निर्माण करणारी ठरेल.
मिसळपाव
