मनाच्या खोल गाभार्यात
मनाच्या खोल गाभार्यात
गर्भरेशमी भरजरी वातींच्या
सुवर्णदिपांची एक माळ जळतेय
.
त्या चांद्ररुपेरी प्रकाशाची धग देहाच्या
सर्व गात्रातून गरगरतेय
.
काही तुझ्यातील माझ्या स्मरणांच्या अन् काही
माझ्यातील तुझ्या स्मरणांच्या या वाती
.
.
या धगधगणार्या वातींवर
निळ्या सुरमयी वार्याचा सणसणता आघात
.
विद्ध मनाच्या दग्ध उंबरठ्यावर
एक अवघडलेला पाऊस उरलाय
.
सरता सरता ह्या पावसाने
फक्त दोन वाती जळत्या ठेवल्यात
.
.
जळता जळता जाळणा-या
जाळता जाळता जळणा-या
.
मनाच्या खोल गाभा-यात
खोल खोल खूप आत
दिपांची तमा न बाळगता
तमाशी झगडणार्या
ओंजळभर तेलाची लाज राखण्यास
.
मनाच्या खोल गाभा-यात
गर्भरेशमी भरजरी या वाती
|- मिसळ
काव्यरस
अंधार
खूपशा अंधार्या रात्री आणि दिवस सरत चालले आहेत. जीवघेणा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधार.
हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो दाराखिडक्यांवर. एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतेच गडद काळं ठिगळ घेऊन. फटीला खिळा मारला की मग तगमग कमी होते. मग मी अशीच ठिगळं लावत फिरते घरभर, उजेडाची प्रत्येक शक्यता बंद करत.
अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग मनातला सैतान छद्मीपणे हसत राहतो माझ्या धडपडीवर.
एक किस्सा नरकातला
या जगात भरपुर पापे वाढली,आणी ........................
लोक मेल्यावर यम आपल्या रेडयावर येवुन सगळयाना चित्रगुप्ताकड नेत होता.चित्रगुप्त आत्माला एकेक करुन बोलवायचा पापाची बेरीज करुन हिशोब करुन, मग त्याप्रमाणॅ स्वर्ग अथवा नरकात पाठवायचा.या जगात भरपुर पापे वाढली,आणी स्वर्ग ओस पडू लागला आणी नरकात खुप गर्दी झाली.स्वर्गात अप्सरा,बागा,मदीरा आणी भरपुर मजा होत्या,तर नरकात होते चाबकाचे फटके,उकळलेले तेल.स्वर्ग आणी या मधे होती एक भिन्त,पापी आत्मे खुप बदमाश.त्याना स्वर्गात काय चालले आहे हे पाहायचे होते, त्या सर्वानी भिन्तीला छीद्र पाडायला सुरवात केली.त्याना स्वर्ग खुप आवडायला लागला ,पण तीकड जाणार कसे?
कास........
नमस्कार,
जरा हाही स्लाइडशो बघा !
जयंत कुलकर्णी
नमस्कार मंडळी.
नमस्कार मंडळी,
मिसळपावच्या समस्त सदस्यांना माझा नमस्कार,
ए़क विनोद
संताने कर्ज काढून गाडी घेतली. हप्ते न भरल्याने त्याची गाडी जप्त झाली. उदास संता बंताला म्हणाला, यार... आधी माहिती असतं, तर लग्न पण कर्ज काढून केलं
मिसळपाव वर माझा हा पहिले लिखाण आहे. तेव्हा चुक भुल देणे घेणे!
सोना
नाण्याची दुसरी बाजू अर्थात Behind Every Crime There Is An Injustice
http://beftiac.blogspot.com/2010/12/behind-every-crime-there-is-injusti…
काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे येणार्या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते. एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने उत्तेजित झाला. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे.
कप आणी बशी
कप आणी बशी ही जगत विख्यात जोडी आहे..एका लेखकाने संसाराला कप बशीच्या स्टॅंडची उपमा देत पुरुष म्हणजे कप लटकत असतात तर बश्या आरामात वर पहुडलेल्या असतात..असे वाचाल्याचे स्मरते..
आमच्या लहान पणी समाजात बशीने चहा पिण्याच्या प्रघात होता ..पण फुर्र आवाज करायचा नाहि असा दंडक होता कारण तसे करणे मागासलेपणाचे समजायचे..
पढे जसा काळ सरकत गेला तसे लोक घरात बशीने पण बाहेर मात्र कपाने चा पिवु लागले..चार चौघात बशिने चहा पिणे असभ्य/कमी पणाचे वाटु लागले..
आज तर जवळ जवळ बशीचा चहा पिण्या साठी वापर ना घरात वा बाहेर कुणी करताना दिसतो...
एका मित्राने पुर्वि एक टिप दिली होति..हॉटेल मधे चहा पिताना नेहमी डाव्या हातात क
मिसळपाव