साहेब बीवी और गँगस्टर
बर्याच दिवसांपासून एखादा चांगला चित्रपट बघावा असे वाटत होते. मागील काही दिवसात टॉकीजला जाऊन पाहिलेले बहुतेक सगळेच चित्रपट वाईट किंवा बरे या कॅटेगरीतले होते. 'दिल्ली बेली' किंवा 'सिंघम' बरे होते पण एखादा चांगला चित्रपट बघण्याचा जो खरा आनंद असतो तो या चित्रपटांनी दिला नव्हता हे खरे. मनोरंजन म्हणून हे चित्रपट बरे होते. 'दिल्ली बेली' तसा थोडा (त्यातील आक्षेपार्ह बीभत्सता वगळता) उजवा वाटला होता. पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही आघाड्यांवर 'दिल्ली बेली' बरा होता. 'सिंघम' चणे-फुटाणे चघळत बघण्यासारखा चित्रपट होता.
शनिवार-रविवारच्या सुटीत एखादा चांगला चित्रपट बघावा असे ठरले.
मिसळपाव