सरकारी कचेरीचे जाहिर आभार.....
जानेवारी २०१० मध्ये मी माझी आधीची कंपनी सोडून सद्य कंपनीत आलो. येताना भविष्य निर्वाह निधीचे (प्रॉव्हिडंट फंडचे) पैसे माझ्या बँक अकाउंट मध्ये जमा करायचा अर्ज(application) आधीच्या कंपनीत निघायच्या दिवशी भरले.
सुमारे पाचेक महिन्यांनी संपूर्ण रक्कम व्यवस्थित माझ्या खात्यात जमा झाली.(online e-banking transfer झालेले होते.)
त्यासाठी मला कुठलाही follow up घ्यावा लागला नाही.खरे तर घेण्याइतका वेळही काही कारणाने नव्हता म्हणा.
जमा झालेली रक्कम माझ्या सारख्या निम्न मध्यमवर्गीय माणसासाठी बर्यापैकी मोठी होती.रक्कम मिळाल्यावर हायसे वाटले.
मिसळपाव