Skip to main content

घुबड होणार?

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 09/11/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता काऊ आणि एक होती चिऊ. त्याचं चाललं होत मजेत; नेहमीचीच भांडण, रोजचेच हेवेदावे, धडे शिकवण, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आणि एक होता पोपट, एक साळुंकी सुद्धा. दिवसभर त्याची पोपटपंची आणि तीच कर्णकर्कश किंचाळण. त्या पलीकडे पोचाव अशी इच्चा नाही आणि खंतही नाही. पिंजा-यात नसून पिंजा-यातच जगणारे काहीसे. मग एक कबुतर का नसाव? तेही होत. उबेजलेल्या वळचणीला बसून दिवसभर घुमायच, आणि घोग-या आवाजात कसलीशी भुणभुण करत रहायची. कोणाला दिसत नसली तरी जिच्या नजरेतून कोणीही सुटत नसे अशी एक घार सुद्धा होती; उंच आभाळात. पण त्याचा उपयोग एक तर स्वतः च्या पिल्लांपुरता किंवा एखाद सावज हेरायला.

जिन्याची विहीर (फोटोसकट)

लेखक जागु यांनी बुधवार, 09/11/2011 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
नाती म्हटलं की डोळ्यासमोर येतात रक्ताची, मैत्रीची नाती. पण आपल्या आसपासच्या ज्या वास्तू असतात त्यांच्यासोबतही आपले जिव्हाळ्याचे, भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशीच एक माझ्या लहानपणापासूनची माझ्या माहेरची वास्तू म्हणजे जिन्याची विहीर. बालपणी आजी, वडील, आई, माझा मोठा भाऊ व मी असे आमचे कुटुंब.

आपण

लेखक यश पालकर यांनी बुधवार, 09/11/2011 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपण
एकमेकांचा निरोप घेताना लपवले ते भाव आपण दूर जाताना पुन्हा एकदा जवळ आलो तेच आपण दाटले मनी जरी गालांवर ना ओघळले आसवांमध्ये भिजून झालो चिंब ते आपण आठवणीना दूर लोटुनी पाहतोय भविष्याची स्वप्न तरीही भूतकाळामध्ये रेगांळूनी अडकलो ते आपण उष्ण श्वासांनी भरलेले कुठे गेले सारे ते क्षण गुंतलेल्या श्वासांमधुनी वेगळे झालो ते आपण वेगळ्या वाटांनी जरी आज चालतोय हे जीवन हरवलं ते नात शोधतोय तेच ते आपण
यशवंत

अरवीचे चिप्स!

लेखक उदय के'सागर यांनी बुधवार, 09/11/2011 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
"चवीने खाणार त्याला देव देणार" हे जेवढं खरं तेवढ्च मला असंही म्हणावं वाटेल "आवडीनं बनवणार त्याला देव सांगणार". मला ह्याची प्रचीती आली. परवाच भाजी बाजारात गेलो होतो, भली मोठी मंडईच ती. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात, मला जाम अवडतं तिथे :)... अश्याच नेहमी प्रमाणे भाज्या बघत असतांना एक नवीन प्रकार दिसला, कधि न पाहिलेला. उत्सुकता म्हणुन गेलो त्या भाजीवाल्या मावशींकडे, विचारु कि नको त्या भाजी बद्द्ल असं चालु होतं (घाबरत होतो म्हणुन नाहि, पण उगिच मागे लागतील घेण्यासाठी वा अपल्याला कहिच माहित नाही म्हणुन कहितरी अव्वाच्या सव्वा भाव सांगतिल म्हणून मी "confuse").

मदत हवी आहे

लेखक धनुअमिता यांनी बुधवार, 09/11/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या कुणाला माहिती आहे का मराठी जुनी व नविन गाणी कुठल्या वेबसाइटवर मिळतील. कृपया कोणी सांगेल का ?

!! मोरया !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/11/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.

मैत्री……

लेखक विनीता देशपांडे यांनी बुधवार, 09/11/2011 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
कधी गुंतलेले,कधी गुंफलेले मनामधे खोल रुतलेले अधे मधे न उमगणारे.......मैत्रीचे नाते कधी अव्यक्त्,कधी अवास्तव तरीही शाश्वत अन विश्वस्त अधे मधे निशब्द...........मैत्रीचे नाते कधी बेभान्,कधी बेधुंद निसटलेला तोल सावरणारे अधे मधे अलिप्त..............मैत्रीचे नाते कधी पाण्यात, कधी आरश्यात प्रतिबिंबासारखे अधर दुधसागरासारखे शुभ्र........मैत्रीचे नाते ( विनीता देशपांडे)

शब्द ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 09/11/2011 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये कधीही ,केव्हाही अचानक ....! तेव्हाच त्यांना बंदिस्त करावे लागते नाहीतर ते उडून जातात पाखरासारखे त्याना बघावे मनात पसरताना हलके हलके फुलताना शब्दाना अनेक अर्थ फुटत जातात तेव्हा ते काळीज कोरून जातात काळजात ते जपून ठेवावे लागतात नाहीतर ते हरवून जातात .... कसे रुमझुमत येतात शब्द ..... जेव्हा मन असते फक्त निशब्द शब्द शब्द झेलून घ्यावा जेव्हा वाटतो शब्द नवा तेव्हाच शब्दांच्या सरीत भिजून जावे जमले तर गाणे गावे गाता गाता एक होईल एखादी कविता गिरकी घेऊन गाणे गाईल .....!!
काव्यरस