Skip to main content

(मलाही आवडलेली काही वाक्ये)

लेखक सन्जोप राव यांनी मंगळवार, 15/11/2011 05:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम तो रस्त्यावर तो फिरत होता, त्याचे कपडे फाटके होते. कोट उसवलेला होता आणि त्याला ठिगळे होती. त्याच्या उसवलेल्या बुटातून पाणी ठिबकत होते, तो म्हणाला, 'होतो.' मी विचारले,'प्रेमात?' 'नाही'. तो म्हणाला. 'आयटीत'. अडाणी. तुम्ही जर चांगली पुस्तके वाचत नसाल, तर अभिनंदन. तुम्ही बहुमतात आहात. तुम्ही जर वाचतच नसाल, तर, वेल, मला तुमचा हेवा वाटतो. दिशाहीन कुठे जायचे हे ठरले नसेल तर प्रत्येक रस्ता हा आपलाच आहे शेवटी प्रत्येक रस्यावर कुठे ना कुठे बार असतोच. श्रीमंत निसर्ग आणि स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर तुम्हाला जगता येणे अवघड आहे.

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 15/11/2011 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो शब्दांचे वार झेलूनी शब्दांचेच प्रहार करतो शब्द कधी गळ्यात पडती हार होवूनी खोटे सुखवती स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती नफा नुकसान व्यवहार जेव्हा नजरेसमोर जाणवतो केव्हा शब्द गिळतो शब्द फिरवीतो शब्द जोडतो शब्द पेरतो रूजवूनी त्यांना कागदावर शब्दांचीच शेती करतो शब्दांचा आधार बोलण्याला शब्दच साह्य करी भावनांना शब्द नसता बोलतो निशब्दांना - पाषाणभेद १४/११/२०११
काव्यरस

दवबिंदु १ - पानांवरचे

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 14/11/2011 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! गेल्या आठवड्यात आमच्या विभागाच्या वार्षिक परिषदेनिमित्त कर्नाळा येथे जायचा योग आला. तेथे दोन दिवस दोन रात्री मुक्काम होता. दुसर्‍या दिवशी सकाळी समोरच्या हिरवळीवर नजर गेली आणि त्या लुसलुशीत हिरवळीवर अनवाणी चालायचा मोह अनावर झाला. पावलांचे मनसोक्त लाड होत असताना नजर गवतावर चमचमणार्‍या दवबिंदुंवर गेली. ताबडतोब खोलीवर येउन कॅमेरा उचलला आणि मग एक तास कसा गेला ते समजलेच नाही. गवताच्या पात्यावरचे टपोरे थेंब, पानावरचे नाजुक थेंब, मोठ्या पानांवरचे स्तब्ध थेंब, इवल्याश्या दुरंगी गवत पातीवर हीर्‍यासारखे लखलखणारे थेंब... किती चित्रे टिपली तरी कमीच होती. त्यात मला बरी वाटलेली ही चित्रे.

मला आवडलेली काही वाक्ये.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 14/11/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मर्कटलीलामृत या धाग्यावर श्री. जगमोहन प्यारे यांनी मी ते पुस्तक लिहायला सुरवात केली त्या तारखेची आठवण करून दिली.... दोन वर्षे झाली मी वेळ मिळेल तसे लिहितोय लिहितोय..... नंतर हार्ड डिस्क चाळता चाळता अजून एक जूने पान सापडले...तारीख १८-८-२००८.... त्या पानावर मी मला आवडलेल्या काही वाक्यांचा अनूवाद करून ठेवला होता.

पारंबी : नवीन मराठी चित्रपट

लेखक योगेश पितळे यांनी सोमवार, 14/11/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
पारंबी हा नवीन मराठी चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शीत होतोय. मराठीत सध्या फार कमी आशयघन चित्रपटांची निर्मीती होतेय. म्हणूनच सध्या प्रदर्शीत झालेल्या "देऊळ" नंतर "पारंबी" या चित्रपटाला देखील विशेष महत्व आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे होत असलेली प्रगती आणि पर्यायाने दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग असं चित्र आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा भारतीय सुशिक्षित भारतीय तरूणांचा सहभाग खूप मोलाची कामगिरी बजावतोय. पण हे झालं भारताचा चेहरा असणा-या शहरी विभागाचं चित्र!

स्वर्ग आणि नरक; खरा फरक

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी सोमवार, 14/11/2011 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक माणुस देवाजवळ स्वर्ग आणि नरकाविषयी बोलत होता. देव म्हणाला , "चल दाखवतो तुला , आधी तुला नरक दाखवतो. देवाने त्या माणसाला एका मोठ्या खोलीच्या दारापाशी नेले. आत एका मोठ्या कढईसारख्या भांड्याभोवती बरीच मंडळी बसली होती. त्या मोठ्या भांड्यात चुलीवर काहीतरी शिजत होते. भोवतालची मंडळी उपासमारीने, भुकेने ग्रासलेली होती. सगळ्यांच्या हातात चमचे होते पण त्या चमच्यांचे दांडे खुप लांब होते , हातापेक्ष पण खुप लांब,. ओघानेच त्या भांड्यातले अन्न त्या चमच्यांने त्यांना घेता येत नव्हते.तोंडात घालता येत नव्हत. फार हालाची परिस्थिती होती. देव नंतर म्हणाला "चल तुला आता स्वर्ग दाखवतो ".

कासचे पठार आणि आमचं हे वरातीमागुन आलेलं घोडं

लेखक झकासराव यांनी सोमवार, 14/11/2011 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! आज बरेच दिवसानी की महिन्यानी इकडे फोटू टाकतोय. तसं पहायला गेलं तर कासला जाउन आलो त्यालाच २ महिने उलटुन गेले. पण फोटो शेअर करणं होतच नव्हतं म्हणून हे आमच वरातीमागुन आलेलं घोडं ... कासच पठार अफाट आहे.

मन्वंतर: एक दृष्यकथा

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 14/11/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तीची दृष्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातीव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टीस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात.

आपली तर काय.....

लेखक वपाडाव यांनी सोमवार, 14/11/2011 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपली तर काय लायकीच नाय तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय ! आपली तर काय..... .................तू McD चा pizza .................आपण मैद्याचा पाव पण नाय ! .................आपली तर काय... तू विशालकाय वडाचं झाड़ आपण लाजाळुचे पान पण नाय ! आपली तर काय.... .................तू Rehman चे "जय हो" .................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय
काव्यरस