Skip to main content

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 15/11/2011 03:50 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द
शब्द ऐकतो शब्द बोलतो शब्दांचे वार झेलूनी शब्दांचेच प्रहार करतो शब्द कधी गळ्यात पडती हार होवूनी खोटे सुखवती स्मॄतीमध्ये राहूनी हॄदयी वसती नफा नुकसान व्यवहार जेव्हा नजरेसमोर जाणवतो केव्हा शब्द गिळतो शब्द फिरवीतो शब्द जोडतो शब्द पेरतो रूजवूनी त्यांना कागदावर शब्दांचीच शेती करतो शब्दांचा आधार बोलण्याला शब्दच साह्य करी भावनांना शब्द नसता बोलतो निशब्दांना - पाषाणभेद १४/११/२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 928
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

फार सुंदर आहे कविता. पण का कोण जाणे अर्धवट सोडल्यासारखी वाटली. ती पुर्ण करण्यासाठी शेवटचे कडवे सुचवतो आहे.... शब्द बोलती हृदय भावना शब्द कधी मनास आवरेना शब्द नसता मीही नसतो उगी असाच नि:शब्द असतो (हा आगाऊपणा माफ असावा)