स्वर्ग आणि नरक; खरा फरक
एक माणुस देवाजवळ स्वर्ग आणि नरकाविषयी बोलत होता. देव म्हणाला , "चल दाखवतो तुला , आधी तुला नरक दाखवतो.
देवाने त्या माणसाला एका मोठ्या खोलीच्या दारापाशी नेले. आत एका मोठ्या कढईसारख्या भांड्याभोवती बरीच मंडळी बसली होती. त्या मोठ्या भांड्यात चुलीवर काहीतरी शिजत होते. भोवतालची मंडळी उपासमारीने, भुकेने ग्रासलेली होती. सगळ्यांच्या हातात चमचे होते पण त्या चमच्यांचे दांडे खुप लांब होते , हातापेक्ष पण खुप लांब,. ओघानेच त्या भांड्यातले अन्न त्या चमच्यांने त्यांना घेता येत नव्हते.तोंडात घालता येत नव्हत. फार हालाची परिस्थिती होती.
देव नंतर म्हणाला "चल तुला आता स्वर्ग दाखवतो ". अशाच दुसर्या मोठ्या खोलीच्या दारापाशी देवाने त्या माणसाला नेले. तिथही असच दृश्य होते. भांड्याभोवती बरीच मंडळी बसली होती. मोठ्या भांड्यात चुलीवर काहीतरी शिजत होते. असेच सगळ्यांच्या हातात लांब दांड्याचे चमचे होते. परंतु सगळे जण विलक्षण आनंदात हसत खेळत होते. या माणसान आश्चर्याने देवाला विचारले "हे कस काय? दोन्हीकडे सगळ्या गोष्टी सारख्याच असताना ते लोक इतके दुःखात आणि हे लोक इतके आनंदात कसे?"
देवान उत्तर दिल, " सोपी गोष्ट आहे, इथले लोक एकमेकांना अन्न भरवायला शिकले आहेत.
Ann landers
याद्या
4246
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
सुंदर
मस्तच कथा
व्ह्य का?
खरंतर हे उलटं असायला हवं,
खरंतर हे उलटं असायला हवं,
In reply to खरंतर हे उलटं असायला हवं, by ५० फक्त
स्वर्ग मिळालेल्यांचा But
In reply to खरंतर हे उलटं असायला हवं, by ५० फक्त
एगजॅक्टली !!!!
In reply to स्वर्ग मिळालेल्यांचा But by नगरीनिरंजन
स्वर्ग मिळालेल्यांचा इगो एवढा
In reply to खरंतर हे उलटं असायला हवं, by ५० फक्त
च्यायला !
:)
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार