Skip to main content

अखेर

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 22/11/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात
काव्यरस

दिलीप प्रभावळकरांचा !

लेखक दिपोटी यांनी मंगळवार, 22/11/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते-लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांना आता त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी गेल्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या अभिनयकारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा ...

'पत्रिका'

लेखक किचेन यांनी मंगळवार, 22/11/2011 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
'पत्रिका' या विषयाने जेवढ माझ डोक खालालय तेवढ कोणाच खाल्लं नसणार. खर तर पत्रिका, गुणमिलन, शांती वगैरे गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. या सर्व विषयाबद्दल माझ न्यान्ही तोकड्च आहे.पण माझ क्षेत्र अस आहे कि मला ह्याबाबत माहिती करून घ्यावी लागतीये. यात सगळ्यात जास्त वैताग आणतो तो मंगळ मंगळ,मंगळाचा प्रभाव, सौम्य मंगळ, मंगळाची शांती, आणि नागबली बद्दल मला माहिती हवी आहे. शांती केली किवा नागबळी दिला कि मंगळ जातो का? वैवाहिक जीवनात मंगळाचे दुष्परिणाम काय? मंगळ फक्त वैवाहिक बाबतीत त्रास देतो कि आणखीनही काही दुष्परिणाम आहेत? आपणास काही मंगळाचे चांगले -वाईट अनुभव आलेत काय?

धुडकी, धुडकी, धुडकी लागे...

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 22/11/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
धडकी भरली ना शीर्षक वाचून? हे गाणं आहे 'मेरे ब्रदर की दुल्हन' या अविस्मरणीय चित्रपटातलं. परवा टीव्हीवर हा चित्रपट बघण्याचा योग आला. करण्यासारखे इतर काहीच नव्हते. ते तसेही कधीच नसते. म्हणजे वाटतं खूप, हे करावं, ते करावं, असं केलं तर खूप मजा येईल, तसं केलं तर जिंदगी बदल जायेगी वगैरे वगैरे पण ऐनवेळेस अस्मादिकांचा अवसानघातकी आळस आमच्या आवेशावर अगदी अलगदपणे ओकतो आणि मग आमचा अमूल्य वेळ आम्ही सोफ्यावर लोळत घालवतो. असाच मी आळसावत पडलो होतो आणि टीव्हीवर 'मेरे ब्रदर की दुल्हन' नुकताच सुरु होत असलेला पाहिला. हिट चित्रपट म्हणून बघायला सुरुवात केली.

बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 22/11/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
बचत व चालू खात्याला सुरक्षीत व फायदेशीर पर्याय नुकतेच रिझर्व्ह बँकेने बचत खात्यावरील व्याजाचा दर नियंत्रणमुक्त केलेला आहे, त्यानंतर यस बँकेसारख्या काही खाजगी बँकानी बचत खात्यावरील व्याज ६% पर्यंत वाढवले आहे मात्र राष्ट्रीयकृत व प्रमुख खाजगी बँकानी याबाबत काहीही धोरण जाहीर केलेले नाही. या बदलामुळे बँकांची नफाक्षमता कमी होणार असल्यामुळे या बँकानी कदाचीत वेट अँण्ड वॉच हे धोरण अवलंबलेले असावे. या बाबत या बँका निर्णय घेतील तेव्हा घेतील.

प्राचीन भारतः शेलारवाडी लेणी(घोरावडेश्वर)

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 21/11/2011 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
शेलारवाडीची लेणी-बौद्धधर्मातील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या गेलेल्या ९/१० लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. भाऊबीजेनंतर लगेचच दुसर्‍या दिवशी इथे सकाळी ७ वाजताच पोहोचलो ते भावंडांसह. शेलारवाडी तशी घरापासून-चिंचवडपासून अगदीच जवळ, जेमतेम १० किमी. इथे बरेचवेळा येणे झालेलेच होते. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून. समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत.

प्रकाशाचा वेग - नवसिद्धांत.

लेखक हैयो हैयैयो यांनी सोमवार, 21/11/2011 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाशाचा वेग - नवसिद्धांत. अन्वयार्थ : विनम्र शंका की सनातनपणा? संदर्भ:- लोकसत्ता, सोमवार, २१ नोव्हेंबर २०११.
भौतिकशास्त्रात दृढमूल असलेल्या गृहीतकाला धक्का देणारा निष्कर्ष सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला. न्यूट्रिनो हे अतिसूक्ष्म कण प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करतात असे आढळून आले. गेल्या आठवडय़ात पुन्हा केलेल्या प्रयोगातही हाच निष्कर्ष निघाला.