Skip to main content

पनीर बटर मसाला

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 06/12/2011 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
पियुशाची फर्माईश होती पनीर बटर मसाला ची पाकृ द्यायला....तीच देत आहे :) . साहित्यः १०० ग्राम पनीर चे तुकडे हलक्या सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेणे.

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

लेखक दशानन यांनी मंगळवार, 06/12/2011 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
इतरत्र पूर्वप्रकाशित मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम. चेहर्‍यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे.

येळकोट येळकोट जय मल्हार!!

लेखक यकु यांनी मंगळवार, 06/12/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडच्या बाजारात कांदे वांगे दिसायला सुरुवात होऊन दोन-चार आठवडे झाले तरी घरात मात्र ते आणले जात नसत. कारण सट (चंपाशष्‍ठी) अजून झालेली नसे ना. खंडोबा ज्यांचं कुलदैवत आहे किंवा ज्यांच्या देवघरात खंडोबाचे टाक आहेत त्या सगळ्यांच्याच घरात हा रिवाज पाळला जात असावा. आमच्या घरात आजी लग्न होऊन येत असताना तिच्यासोबत तिचं कुलदैवत असलेला खंडोबाही (टाक) आला होता. तेव्हापासून आमच्याकडेही सट पाळली जाऊ लागली असावी; निश्चित माहिती नाही कारण विचारायला सध्‍या जवळ वडीलधारं कुणीच नाहीय. खंडोबा हे तसं धनगरांचं कुलदैवत. पण श्रद्धेला बंधन नसतं.

A Bittersweet Life (Dalkomhan insaeng)

लेखक ssutar यांनी सोमवार, 05/12/2011 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
One fine spring day... a disciple looked at some branches blowing in the wind. He asked his master... "Master, are the branches moving or is it the wind?" Not even glancing to where his pupil was pointing... the master smiled and said... "That which moves is neither the branches nor the wind... ....It's your heart and mind!!" या डायलॉगने सुरु होऊन सुरुवातीलाच पकड घेणारा हा जबरदस्त कोरियन अॅक्शनपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो! ही कथा आहे एका कोरियन गँगमधील एका hitman ची. तो त्याचा बॉस जे सांगेल ते काम करतो मग ते काहीही असो. त्याचा बॉस त्याला एक 'खाजगी' काम सांगतो.

कारल्याचे काप

लेखक जागु यांनी सोमवार, 05/12/2011 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ -२ कारली मसाला हळ्द मिठ लिंबाचा रस (ऑप्शनल) तेल पाककृती : कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बी नाही काधले तरी चालते. कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या.

पनीर चिली

लेखक कपिलमुनी यांनी सोमवार, 05/12/2011 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी .. गुरुवर्य गणपा यांसी प्रणाम करुन माझिइ पहिली पाकृ देत आहे .. मि पा वर आणि पाक कले मधे नवीन प्रवेश असल्याने नवा प्रयोग न करता साधीच रेसीपी पुन्हा देत आहे पूर्वी स्वाती आणि सानिकास्वप्निल यांनी दिली होती http://www.misalpav.com/node/8373 http://www.misalpav.com/node/17037 तरी पण हाता हाताची चव वेगळी .. पूर्व तयारी २५० ग्राम पनीर लांब तुकडे karun १ कांद्याच्या पातीची जुडी ४ सिमला मिरची ७-८ हिरव्या मिरच्या लांब चिरून ६-७ हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून १०-१२ लसून पाकळ्या बरीई

पु. ल. (भाई) ना आदरा॑जली

लेखक मिश्रेया यांनी सोमवार, 05/12/2011 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
काल च 'तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी' हे परचुरे प्रकाशन चे पु.ल्.देशपा॑डे॑ च्या स्मरणार्थ प्रकाशित अप्रतिम पुस्तक वाचले. ह्यात पु. ल॑. विषयी कधी काळी लिहिलेल्या लेखाचे आणि भाषणाचे स॑कलन केलेले आहे. अरुण टिकेकर ह्याच्या प्रस्तावने नी सुरुवात आहे. त्या॑च्या प्रस्तावनेत शेवटी लिहीलेले 'महनीया॑नी महनीया॑ बद्द्ल व्यक्त केलेले भावना /विचार अगदी ख॑र आहे. अत्रे, कुसुमाग्रज , श्री.पु. भागवत, जयवन्त दळवी, कानेटकर, राम गबाले , भक्ति बर्वे, मोहन वाघ, म॑गेश पाडगावकर शान्ताबाई शेळके ,बाळ ठाकरे ई.ई दिग्गजा॑चे लेख ह्यात आहेत. पु.ल. हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व.

सदाबहार देवानंद ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 05/12/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
देवानंद म्हटले की मला माझे बालपन आठवून जाते. अगदी लहानपणी होतो तेव्हा कालापाणी बघितला. होता. खोया खोया चाँद गाने म्हणत सायकल शिकलो होतो . देवानंद सारखे दिसायचे देवानंद सारखे बोलायचे त्याच्या स्टाईलने चालायचे असा हा माझा ,तुमचा आवडता हीरो. गाईड बघितला. फली मिस्त्रिची अप्रतिम फोटोग्राफी नि देवानंदचा अभिनय सिनेमाची स्टोरी काळजात कायमची घर करून गेली देवानंद म्हटले की मला माझे बालपन ,तारुण्य आठवू लागते. आणि माझ्या शरीरात तारुण्याचा झरा अवखळपणे वाहू लागतो. देवानंद म्हणजे मला अगदी घरातला जिवाभावाचा मित्र वाटत होता. हल्ली हल्ली मी देवानंद बघतच नव्हतो.

गरीब बिचार्‍या, दम खा

लेखक धनंजय यांनी सोमवार, 05/12/2011 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
गरीब बिचार्‍या, दम खा
गरीब बिचारा शोधतोय तो सायबिणीचे पडके घर - मी म्हणतो, "विचार, जवळ चांगला बार असला तर..." . बुरसट चिरे न्हाते-धूते अश्रू भले सुकवू नको कुळाचारांस आसूसले भाव भले आटवू नको . म्हटले कोणी : "रिबेलो मूळचे अहो, त्या वाडीचे" पात्रांव, छ्या!
काव्यरस