Skip to main content

कारल्याचे काप

लेखक जागु
Published on सोमवार, 05/12/2011
साहित्य : १ -२ कारली मसाला हळ्द मिठ लिंबाचा रस (ऑप्शनल) तेल पाककृती : कारली स्वच्छ धुवून घ्यावीत व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. बी नाही काधले तरी चालते. कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या. तव्यात तेल गरम करून चकत्या मंद गॅसवर तळत ठेवा. एक बाजू शिजली म्हणजे थोडी ब्राऊन झाली की पलटा आणि दुसरी बाजू कुरकुरीत करून घ्या. झटपट कारल्याचे कुरकुरीत काप तयार. (कुरकुर आवाज येत नाही कुरकुर्‍यांसारखा :हाहा:)

याद्या 13286
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

क्या बात है जागुताई! काल वांग्याचे काप आज कारल्याचे! दिल खूश हो गया. हे पाहून या महिन्यात मेस बंद करुन गॅस आणावाच लागणारे; गाजरं व मटारच्या शेंगांचा पण सिझन हातचा जातोय..

मस्त.. पण, "मसाला" हा एक घटक आहे की मसाला हे हेडिंग असून त्याखालची हळद, आणि मीठ एवढाच मसाला? पुढे "कारल्याच्या चकत्यांना हळद, मसाला, मिठ, लिंबूरस लावून घ्या. " असं लिहिलंय म्हणजे मसाला ही एक वेगळी चीज असावी. नुसतं मसाला म्हटलं की बाय डिफॉल्ट कोणता मसाला समजला जातो? काळा, गोडा, गरम किंवा अन्य काही? की लाल तिखटाला मसाला म्हणतात?

In reply to by पैसा

अच्छा.. मसाला म्हणजे दळलेले लाल तिखट.. माशांच्या काही पाकृमधेही जागुताईने मसाला हा शब्द वापरला होता. त्यामुळे ही माहिती मला जास्तच आवश्यक होती.. ;) म्हणजे मी सुरमई पापलेटांना जे चोपडतोय ते बरोबर आहे.. ओक्के.. धन्यवाद..

In reply to by गणपा

पदार्थाला फक्त तिखटपणा आणायचा असेल तेव्हा हाच "मसाला" घालतात का? कारण आमच्याकडे मसाला (म्हणजे तू म्हणतोस तसे इतर सगळे मसाल्याचे पदार्थ घालून) जेव्हा तयार करतात तेव्हा त्यात सुक्या मिरच्या कमी असतात, आणि असा मसाला घालताना सोबत लाल तिखट घालावं लागतं. मी सांगतेय तो 'मसाला' मी रत्नागिरीजवळच्या गावात तयार करताना पाहिला आहे. यासाठी सुक्या मिरच्या जेव्हा दळतात तेव्हा त्यात अगदी थोडे धने आणि लवंगा घालतात, म्हणजे २ किलो मिरच्यांना १०० ग्रॅम धने आणि २ चमचे लवंगा. विशेषतः मासे किंवा भाज्या जेव्हा फ्राय करतात, तेव्हा त्याला दुसरा कोणताच मसाला घालत नाहीत, फक्त हाच मसाला (धने आणि लवंगा घातलेलं लाल तिखट) असतो. अर्थात प्रत्येक गावची मसाल्याची पद्धत वेगवेगळी.

In reply to by पैसा

माझी आई मसाला करताना ३ प्रकारच्या मिरच्या वापाते. यात काही तिखटपणासाठी तर काही रंग यावा म्हणुन. जेव्हा ३ किलो मिरच्या असतात तेव्हा बाकीचे घटक मिळुन अजुन ३ किलो, असा टोटल ६ किलोचा मसाला तयार होतो. हा मसाला आमच्याकडे शक्यतो मांसाहारी पदार्थ बनवताना वापरतात. (काही शाकाहाराही भाज्यांतही वापरतात.) पण हा मसाला असताना मग एक हळद सोडली तर दुसर काही घालायची गरज रहात नाही. (मासे असताना हिरवं वाटण आणि चिकन मटण असताना आलं-लसुण वाटण हे असतच.)

In reply to by आनंदी गोपाळ

लाल मिरच्या या लाल तिखटाच्या स्वरूपात, रंग न बदलता, मंद आचेवर भाजून गोड्या मसाल्यात घातल्या जातात. धणे आणि सुके खोबरे हे इतर मसाल्याच्या (दालचिनी, लवंग, मिरी, चक्रीफूल, इ.)मानाने जास्त असते. परिणामी मसाला तिखट नसतो पण मसालेदार असतो म्हणून तो गोडा मसाला. मला वाटतं त्यालाच काळा मसाला म्हणतात. गोड्या मसाल्यात जिन्नस तेलात भाजून घेतले जातात. कच्च्या मसाल्यात जिन्नस कोरडे भाजून दळतात. तो कमी, अगदी छोटी बरणीभर मसाला भरपूर होतो. मुगाच्या खिचडीत गोड्याच्या बरोबर कच्चा मसाला घालून खिचडी चांगली लागते.

मेसमधला एक टेस्टी प्रकार. याचसोबत बटाट्याचेही काप केल्यास जास्त चांगले काँबिनेशन होते (हा मेसचा अनुभव) पाकृ दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे जागुतै. (घरी गेल्यावर करुन बघणेचा इरादा आहे.)

लै भारी ग जागुतै ! ह्या रविवारी चकण्यालाच कारल्याचे काप फिक्स. ह्याच्यावर थोडे बेसन भुरभुरले तर मग अजूनच खमंग मजा येते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पण कडवटपणा कमी करण्यासाठी (बहुधा) मिठाच्या पाण्यात थोडावेळ बुडवून घेण्याची स्टेप इथे दिसत नाहीये. मला वाटतं सर्वच्या सर्व कडवटपणा टिकून राहिला तर काहीवेळा मजा येत नाही. कदाचित या प्रकारात हे जवळजवळ तळले जात असल्याने त्या प्रोसेसमधे कडूपणा कमी होत असेल.

In reply to by गवि

मस्तच माझी आईसुध्दा या पध्दतीने करते गवि मला वाटत लिँबूरस लावल्याने कडवटपणा कमी होतो

आमच्या कडे हे काप काही वेळ मिठाच्या पाण्यात बुडवुन ठेवतात. तसेच करताना त्यात मसाल्या बरोबर थोडी साखर्/गुळ देखील टाकतात. कडवट गोड अशी झकास चव येते.

छान पाकृ. मध्यंतरी एका सौधिंडियन मैत्रिणीने कांदा मोठा चिरून, कारल्याचे काप (बिया काढून) आणि चिंचेचा कोळ अशी भाजी केली होती. चांगली लागत होती.