Skip to main content

केल्याने देशाटन, पंडित-मैत्री, 'सभेत संचार'............

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 07/12/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल स्पर्धा कोण वाढली आहे. वर जाण्यासाठी जो तो धडपडतोय. आता जे हुषार आहेत त्यांच ठिक आहे पण आमच्या सारख्यांच काय? आणि आजकाल वर चढायला हुषारी पुरतेच असही नाही. मग मोठ्ठ व्हायचं असेल तर काय करावं बर? आहेत, त्यालाही उपाय आहेत. एक उपाय मागे मी इथे सांगितला होता. आता दुसरा सांगतो. चारचौघात आपल वजन वाढवायच असलं, महत्व प्रस्थापित करायच असल तर मग काहीतरी वेगळं कराव लागतं. थोडक्यात आपणच आपल्याला मोठ कराव लागतं. ते कस? अहो हे कलियुग आहे, बोलणाऱ्याचे दगड खपतात आणि न बोलणाऱ्याच सोनही खपत नाही म्हणे. कस खपणार?

जगण

लेखक मयुरपिंपळे यांनी मंगळवार, 06/12/2011 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
फास्टफुड च्या लाईफ मधे काय हे जगण बेचव काही तरी खाऊन मन मारुन ठेवण | लोकांच्या ह्या गर्दी मधे ही मनाला पण नाही जागा विसावासाठी पुरे फक्त १ झाड आणी १ प्रेमचा धागा | प्रेमाच्या पंखाला आता तरी एखादी वाट हवे ईमेल व एस.एम.एस ह्याची अनमोल १ साथ हवे | -- मयुर

चान्दरात

लेखक शिल्पा१९७३ यांनी मंगळवार, 06/12/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या आठवणीनी मन झाले धुन्द, दरवळतो अजुनही रोमारोमात निशिगन्ध, स्पर्शाने तुझ्या फुलला अन्गात पारिजात, श्वासात मारवा अन नजरेत चान्दरात, ओठानी खोलशी तू कितीएक अबोल बन्ध, चेतवी स्वप्नाचे दिवे, मनात मन्द मन्द, घेतले कवेत तु, कोसळते बाहुपाशात मी, ओल्या वणव्यात जळाया, पतन्गापरी आतुर मी, पेचाडावपेचात रन्गत गेली रात्र, उमलत गेले हळूहळू एकएक गात्र, वाटतेय चालु रहावे, असेच हे सत्र, उलगडेल ना मग, जीवनाचे ते सूत्र, मुक्त होण्यासाठि सुद्धा हवेच असते ना एक बन्ध, निश्शब्द, निस्तब्ध, निसन्दिग्ध, अनन्त अनन्त...
काव्यरस

हि तर सुंदर कविता झाली !

लेखक अविनाश खेडकर यांनी मंगळवार, 06/12/2011 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
जन्म घेतला का मी येथे कधी कधी मज उगा वाटते कमावण्याच्या अरूंद वाटेवर बेकारांची गर्दी दाटते किती भिकारी बनले येथे एक टिचेच्या पोटासाठी धान्य दडविती गोदामी ते केवल आपुल्या स्वार्थासाठी समानतेची शिकवण आमुची एकात्मतेची आस वाटते शाळेमधल्या दाखल्यात मग धर्म-जात ती कशी नाचते? घोटाळ्यांची भरवून स्पर्धा इथला सेवक छळतो आहे आर्त हुंदका महागाईचा कुणा कधी का कळतो आहे? शहिदांच्या बलीदानांवरही शब्दच नव्हता स्मरला ज्यांना अफजल गुरूच्या माफीसाठी कोण पुरवितो भाषण त्यांना? खून दरोडे, धोकादाडी बलात्कारही रोज पाहिले अराजक्तेच्या वादळात या सदाचारी का कुणी न राहिले? कुणा मागावी दाद आता ती न्यायच पोषी अन्यायाला

स्वातंत्र्य संपले????????

लेखक चिंतामणी यांनी मंगळवार, 06/12/2011 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
मगाशी विविध वाहीन्यांवर मा. कपील सिब्बल (मा. चा योग्य अर्थ घेणे) यांचे आकांडतांडव चालु होते. केंद्र सरकारने गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या इंटरनेट कंपन्या, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरून मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित सर्व आक्षेपार्ह गोष्टी हटविण्यास सांगितले आहे. तसेच सरकारने या सर्व साईट्सवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी एखादी यंत्रणा विकसित करण्यास सांगितले आहे. थोडक्यात सेन्सॉरशीप येणार आहे.

एवरु लेरनी

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल. असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो.

मसाला (रोजाच्या वापरातला)

लेखक जागु यांनी मंगळवार, 06/12/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ पाव वर बर्‍याच जणांना माझ्या रेसिपीतील मसाला हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायचे आहे. म्हणून ह्या वर्षी वर्षी केलेला हा मसाला इथे देत आहे. मसाल्याच्या रंगावर जाऊ नका. ह्या मसाल्याच्या पदार्थातही अनेक औषधी गुणधर्म आहेत. ह्यात असलेले जिरे, धणे थंड गुणाचे असतात.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

डाव

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 06/12/2011 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचं कोवळं सोनसरी ऊन चहूकडे पसरले होते. निंबाळकरांच्या वाड्यासमोरच्या हौदात त्या उन्हाचे कवडसे पडुन उन उन हिरे चमकत होते. कधी काळी ज्या वाड्यात हिर्‍यांचा लखलखाट असायचा तिथे आता या हिर्‍यातच समाधान मानून घ्यायला लागत होते. वाड्यासमोरच्या सैलसर मो़कळ्या पटांगणात निंबाळकरांचे दोन चार बैल चरत होते. पलीकडेच नुकतीच पाडसाला जन्म दिलेली गौरा गाय पाडसाला दूध पाजत होती. निंबाळकर तसे जुन्या वळणाचे त्यामुळे पाडसाचे दूध त्यांनी हिरावून घेतले नव्हते. बाकी पटांगणात गावातल्या कुठल्याही घरात असतो तसा आणि तितकाच पसारा पडला होता.