Skip to main content

पुणे वाइन फेस्टीव्हल - 2011आणि दर्दी मिपाकर

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 26/12/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
Pune Gourmet Club पुण्यात 2007 पासून पुणे वाइन फेस्टीव्हल आयोजीत करते. पुण्याबरोबर मुंबईला बांद्र्यालाही हा वाइन फेस्टीव्हल ते आयोजीत करतात. अस्सल वाइनप्रेमींसाठी वेगवेगळ्या वाइनरीजच्या वाइन्स चाखण्याची आणि विकत घेण्याची, एकाच ठिकाणी, एक मस्त संधी ह्या निमीत्ताने प्राप्त होते. ह्या शनिवारी काही मिपांकरांसोबत पुणे वाइन फस्टीव्हल 2011 ला हजेरी लावण्याचा योग आला (सहकुटुंब). खरचं खूप धमाल आली. जवळजवळ 16 वाइनरीजचे स्टॉल्स ह्या वेळी होते. तसेच खाण्याचेही बरेच स्टॉल्स असल्यामुळे वाइन चाखण्याबरोबरच खादाडीची सोय उपलब्ध होती. ह्या इथे स्वागतकक्षात प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून आत गेलो.

मगधीरा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 26/12/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे.

आठवणीने दे !!

लेखक फिझा यांनी सोमवार, 26/12/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीने दे !! चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे , क्षितिजावर लुकलुकणारा एक तर मात्र आठवणीने दे !! ढगांनी भरलेले आभाळ नाही मागत तुझ्याकडे , थेंबा थेंबा ने बरसणारा एक ढग मात्र आठवणीने दे !! बेभान कोसळणारा मुक्त पाऊस नाही मागत तुझ्याकडे , श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवणीने दे !! बेधुंद करणाऱ्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे , जाताना एक मोगऱ्याची कळी मात्र आठवणीने दे !!

विधिलेशा

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 26/12/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
जळली तृणके गिरी बोडके वणवा बिन बोभाटा कशाच उरल्या तशाच अजुनी पायखुणांच्या वाटा काजळ तनभर माळशिरावर त्यात विखुरलेल्या लाटा पोत धुळीचे अधिक उजळले शेष न एकहि काटा या वळणावर उभा एक मी निरखित लामण रेषा काळावरती उठून दिसल्या विरलेल्या विधिलेशा .......................अज्ञात
काव्यरस

"टिम अण्णा"ने दिले दिग्वीजयसींगना सडेतोड उत्तर

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 25/12/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
दिग्वीजयसींगनी Twitterवर अण्णांबद्दल म्हणले होते की "अण्णा मा. नानाजी देशमुख यांचे सचीव होते". त्याचवेळी २७ डिसेंबरपासुन होणा-या उपोषणाची खिल्लीसुद्धा उडवली. याला किरण बेदी यांनी Twitterवर दिग्विजय सिंह आणि नानाजी देशमुख यांचे एकत्रित छायाचित्र प्रकाशित करून कॉंग्रेसला चांगलेच प्रत्युत्तर दिले. नानाजी देशमुख यांची भेट घेतल्याने जर का एखादी व्यक्ती संघाचा एजंट ठरत असेल तर मग माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी सुद्धा नानाजींची भेट घेतली होती. कॉंग्रेस पक्ष कलामांनाही संघाचे एजंट ठरवणार का? असा सवाल बेदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

शांतिनिकेतन

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 25/12/2011 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एवीतेवी बंगालमध्ये आलोच आहोत तर इथली काही ठिकाणे चुकवायची नाहीतच असे ठरवले होते (वर्ग सोडून ;) ) त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे गुरुदेवांचे शांतिनिकेतन (गुरुदेव म्हणजे फक्त रबिन्द्रनाथ ठाकूर). जरा माहिती काढली तर असे कळले की २३ डिसेंबरपासून पौष मेला चालू होतोय. हा चान्स सोडायचा नाहीच असे ठरवलेच होते. कसे जायचे वगैरेची माहिती मित्राकडून व जालावरुन घेतली. खडगपूर-बोलपुर (शांतिनिकेतन) हा निदान ५ तासाचा रेल्वे प्रवास आहे. हावडावरुन काही ट्रेन्स आहेत. पण खडगपूरहुन फक्त बेंगलोर-गुवाहाटी एक्सप्रेस जाते. लवकर पोहचावे म्हणून मी हावडा-बोलपुर असे एका ट्रेनचे तत्काल आरक्षण केले होते.

वोडार

लेखक ajay wankhede यांनी रविवार, 25/12/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओडार, नाही हो नागरिक या देसाचा जागा दिसली खुली का ताण डेरा न.. मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव काळ्या ठीक्कार दगडावर... घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक..

भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र

लेखक ए.चंद्रशेखर यांनी रविवार, 25/12/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
(Original Alms-Bowl of Buddha) इ.स.1880-81 मध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे तत्कालीन मुख्य, मेजर जनरल ए. बकिंगहॅम यांनी बिहारच्या उत्तर व दक्षिण भागांचा एक दौरा केला होता. या दौर्‍यात बकिंगहॅम यांनी त्या वेळेस बेसार (Besarh) या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका गावाला भेट दिली होती. हे गाव म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध असलेले वैशाली नगर आहे हे बकिंगहॅम यांनी लगेच ओळखले होते. वैशाली येथे जरी बकिंगहॅम यांना फारशा पुराण वस्तू सापडल्या नसल्या तरी त्यांना वैशाली या स्थानी भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र पुरातन कालापासून जतन करून ठेवलेले होते अशी माहिती समजली.

चिऊताई चिऊताई

लेखक विदेश यांनी रविवार, 25/12/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
चिऊताई चिऊताई नकोस फिरकू अंगणात ग - मम्मी-डॅडीचा गुडबॉय कधीच तुला विसरला ग ! बोकेभाऊ बोकेभाऊ टपून बसला ना तुम्ही - मोठ्ठा गोळा लोण्याचा कधीच मटकावला आम्ही ! बोकडदादा बोकडदादा किती अजागळ दिसता हो - तुमची दाढी पाहुन बायको भांडत नाही का हो ? हत्तीराव हत्तीराव ब्रश कसा हो वापरला - दोन दात दोन दिशांना नीट का नाही धरला ? कावळोबा कावळोबा उगाच करता काव काव - संतूर लक्स टाईड रिन वापरून तरी बघा राव !