Skip to main content

(जीव गुंतला)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 19/01/2012 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ गीत : खेळ मांडला (नटरंग) प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...
काव्यरस

माझा निबंध.....

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 19/01/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझा निबंध..... एकदा वर्गात ऑफ पिरिअड होता. मस्त पुस्तक वाचत होतो....मार्क ट्वेन चे....टोम सायर....बाईनी निबंध दिला.... "मला पंख असते तर" कोण मुंबईला गेला.....कोण हिमालयात गेला...(एक तर पार अमेरिकेत गेला....त्यावेळी अमेरिका दूर होती आणि इंग्लंड जवळ होते..)...तर कोण पक्ष्यान बरोबर गप्पा मारत बसला.... आता पुस्तक वाचावे की, निबंध लिहावा....मग काय पटकन निबंध लिहिला आणि पुस्तक वाचायला लागलो..... बाईनी बघितले कि हे काय...हा मुलगा लिहित का नाही?

ठ्या... ड्वाले पाणावले...esakal.com

लेखक मन यांनी गुरुवार, 19/01/2012 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. (नेहमीप्रमाणेच) हापिसात रिकामपणीचे उद्योग करण्यात आम्ही व्यस्त होतो. जरा जालावर पेपर वगैरे वाचावेल म्हटले म्हणून esakal उघडला. तिथे चक्क http://www.esakal.com/eSakal/20120119/4672807682597002147.htm ही बातमी दिसली. त्यातील एकदम भारी वाटलेला मजकूर देतोयः- इराणवर हल्ल्याचा विचारही करू नका (युएनआय) Thursday, January 19, 2012 AT 03:00 AM (IST) Tags: jerusalem, iran, international जेरुसलेम - इराणवर हल्ला करण्याचा कोणताही विचार इस्राईल करत असेल, तर त्यांनी त्यापासून लांब राहावे.

आपण आधुनिक आहोत का (अधु) निक?

लेखक वाटी यांनी गुरुवार, 19/01/2012 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सध्या समाजाचा कल हा आधुनिकतेकडे झुकलेला दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक ठीकाणी आपण आधुनिकतेचाच जास्त अवलंब करतांना दिसत आहोत. असो पण या आधुनिकतेमुळे खरंच आपण (अधु) निक तर नाही ना होत चाललोय? असा विचार मनात आला. असो तरीही यावर निव्वळ चर्चा व्हावी हाच हेतु. उदाहरणार्थः १) आज आपण घर बसल्या भ्रमणध्वनीवरून आपल्याला काय जिन्नस हवे आहेत याची यादी देऊन मोकळे होतो त्यामुळे आपल्याला सहजच घर बसल्या हव्या त्या गोष्टी उपलब्ध होतांना दिसतात.

काय हा अफाट दर ???

लेखक मनिमौ यांनी गुरुवार, 19/01/2012 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिन्ट आउट चे (भलतेच।) दर ! सध्या मी मुम्बै मधे राहात आहे.

थंडी माघाची

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/01/2012 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी माघाची थंडी पडलीया माघाची राया माघाची घाई करा तुमी येण्याची ||धृ|| लवकर या हो जवळ घ्या हो जरातरी फिकीर करा वेळेची || नका नका आसं करू नका जिव माझा फुका जाळू नका एकटेच का दुर र्‍हाता तिथं पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || थंडीनं जिव केला येडापिसा उन उन उबेला जवळी बसा हातावर हात आन पायावर पाय पहा चोळून राहिलेय मी केव्हाची || कालचा दिस आठवा ना रुसवा गोडीनं मिटवा ना आणलय काय दावून जरा मुठ उघडा हाताची || - पाभे
काव्यरस

स्फुट: रचना!

लेखक राघव यांनी गुरुवार, 19/01/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही सुंदर रचना कशी घडत असेल? बर्‍याच दिवसांपासून उगाच हा प्रश्न मला पिडतोय. :) तसं तर रचना = पदार्थ, शिल्प, रेखाचित्र, छायाचित्र, गद्य-पद्य लेखन, संगीत.. पण सोबतच एखादे सुंदर घर, एखादी आठवण, एखादं मैत्रीचं अतूट नातं, एखादी अप्रतीम - संपूच नये असं वाटणारी संध्याकाळ.. असंही बरंच काही म्हणता येईल.. नाही? मग विचार केला, कोणतीही रचना सुंदर केव्हा नसते? सहज उत्तर येतं.. जेव्हा ती आवडत नाही! का आवडत नाही? हृदयाला भिडत नाही म्हणून. म्हणजे कोणतीही रचना सुंदर तेव्हा होते जेव्हा ती हृदयाला भिडते.

जीवन

लेखक विदेश यांनी बुधवार, 18/01/2012 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या ह्या ऋतूत तुम्हाला हवे म्हणून- माझ्याजवळचे पाने फुले फळे आणि फांद्याचे सर्वस्व देण्यासाठी- मला जगावेच लागेल ! दु:खाच्या त्या ऋतूत तुम्हाला हवे म्हणून- कुणाच्या तरी जगण्यासाठी चुलीत जळण्यासाठी- कुणाच्या तरी मरणानंतर चिता जाळण्यासाठी- माझे अचेतन खोड मला जपावेच लागेल !

We The People of India....१

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 18/01/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली. ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि