Skip to main content

प्रचंड गारठा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी सोमवार, 23/01/2012 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
------ भाग १: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! बर्फ़च घेऊन जणु बाहेर वाहतोय सुसाट वारा ! सूर्यकिरणांनी चकाकतोय दवबिंदू... की पारा? निसर्गाने उघडलाय बघ! सौंदर्याचा गाभारा.... माझ्या हातात तुझा हात उबदार जरा... तुझ्यासवे चालत चालत सरावा जन्म सारा.... प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! तुझ्यासह घालवलेला क्षण क्षण न्यारा....! ------ भाग २: ------ प्रचंड गारठा...... चक्क शून्यावर घसरलाय पारा......! झोपावे जरा, अजून कामाचा शीण नाही गेला सारा.... पहाटे पहाटे पेपरवाल्याने बेल वाजवली कराकरा.. सकाळी सकाळी "ही" का आवरतेय आज घरातला पसारा? आज रविवार!

रेखीव

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 23/01/2012 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
घडे काय हे; ना कळे योजना ही उभा ज्येष्ठ रावा; कुणी हाक मारी मिळे कोपर्‍याला नव्याने उभारी उधाणून ऊर्मी उमलली दुपारी गाभ्या तळाशी किती रत्नराशी लयधुंद वलये तरीही उराशी अंगी दुरावा कसा हा म्हणावा रेखे कुणी पापणी-आत नक्षी स्मिताची कळी अंगणी अंग जाळी नयनी खुळी ओढ नवती निराळी अव्हेरू कसे आवरू वा कसे गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी .....................अज्ञात
काव्यरस

ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : फूटबॉल क्लब मॅनेजर्स

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 23/01/2012 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीवर काढलेला 'चक दे' पिक्चर तुम्ही पाहिला आहे का ? त्यात शाहरुख खानचा १ डायलॉक आहे ' हर एक टीम में बस एक ही गुंडा हो सकता है, और इस टीम का गुंडा मै हुं'. पाहिला असेल तर लक्षात ठेवा, पाहिला नसेल तर पाहुन घ्या आणि मग लक्षात ठेवा, कशासाठी ते आपण पुढे कुठेतरी नक्की पाहुयात. चवीने खाणे कुणाला आवडत नाही ? पण एखादा पदार्थ 'चांगला' होण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही 'तृप्ती'ची अनुभुती होते ती साधण्यासाठी नक्की काय काय लागते हो ? 'बेस्ट इन क्लास' उपकरणे असलेले अद्ययावत स्वयंपाकघर ?

जागेपणी मिटून जायचे ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 23/01/2012 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांच्या बाजारात मी काही शोधीत बसायचो तिच्यावर प्रेम करण्यासाठी काही शब्द शोधीत असायचो मला हवे ते शब्द मिळत नव्हते काय करावे कळत नव्हते..?
काव्यरस

गाजर हलवा पाय (Pie)

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 23/01/2012 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपण गाजर हलवा नेहमीच आवडीने खातो आणी हिवाळ्यात तर घरोघरी हमखास बनवला जातो :) मी विचार केला नेहमीचा हलवा बनवून सर्व्ह करण्यापेक्षा त्यात काहीतरी वेगळेपण असले पाहिजे म्हणून हा छोटासा बदल :) चला तर मग सुरुवातीपासून सुरु करुयात ;) साहित्य: १ किलो गाजरे सालं काढून किसून घेणे १ मग भरून गरम दूध ३/४ -१ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त) ३-४ टेस्पून खवा (घरी केलेला ताजा खवा वापरावा किंवा साय, मिल्क पावडर वापरली तरी चालेल ) ४ टेस्पून साजुक तुप सू़का-मेवा १ टीस्पून वेलचीपूड ९-१० मॅकविटीज (मारी) बिस्कीटे ५० मिली फ्रेश क्रीम

काय सैपाक काय करू मी बाई

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/01/2012 06:13 या दिवशी प्रकाशित केले.
काय सैपाक काय करू मी बाई घरधनी उठलं सकाळी रामपारी उसतोडीची आमी केली तैयारी न्यारी डब्यासाठी आंग खंगाळूनी चुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी हाताशी पोळपाट परात घेवूनी जाळ केला चुलीवर तवाठेवूनी धुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी पाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी भाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी ठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी "घाई कर" म्हनं पोराला उठवूनी रडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी सारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी चला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी पिठाचा डबा घेई हाती करूनी घाई पाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही ऐन वक्ताला काय करावं सुधरंना ब

नको रे कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 23/01/2012 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
नको रे कान्हा नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी नको लगट दावू उगीचच खेटूनी || नार मी भोळी साधी सरळ हरणी रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी || गोरी माझी काया तू रे सावळा मनात दुजे काही चेहेरा भोळा नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी || श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा केशव मुरलीधर माधवा गोविंदा अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी || तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण तुझ्याविण जग सारे होई वैराण यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले तुझ्यासवे