हद्दपार झालेली चिमणी
परवा माझ्या ३ वर्षाच्या भाचीला सियाला गोष्ट सांगत होते 'एक होती चिमणी अन एक होता कावळा..'
सिया म्हणाली 'आत्या मला चिमणी दाखव ना कशी असते ?'
पाहिलं तर खरच कि एकाही झाडावर चिमणी दिसेना. आमच्या लहानपणी चिमण्या अन कावळे भरपूर असत झाडांवरून. त्यांची भांडणे पाहणे हा मस्त टाइम पास असायचा. बागेत पाणी सोडले असताना त्या फवाऱ्यात चिवचिव करत अंघोळ करण्याऱ्या चिमण्या पहायला खूप मजा येई. त्यांचे थवे या झाडावरून त्या झाडावर भुर्रकन उडताना माना वळवून वळवून दुखेपर्यंत पाहत राहायचो. मुठभर तांदूळ टाकले कि सगळा थवा भुर्रकन खाली येताना पाहण्यासाठी आईआजीच्या पाठी लागून सारखे तांदूळ आणत असू.
मिसळपाव