वेलेंटाईन डे ( लग्नानंतर चा)
लेखनविषय:
काव्यरस
तारुण्य....
नव तारुण्य नव दांम्पत्य
सोबतीला दोन गुबगुबीत अपत्य
कामाच्या धकाधकित वेळ
जातो कसा कळतच नाही
सांय समयी थकुन येता
लगेच चहा नि बिस्किट
खोल्या लहान गर्दी महान
सखे तरि राहतेस प्र शांत
रात्र प्रहरी धुंद प्रणय
जिवाणु विषाणुंचा कहर
सारं काही पचवतेस
सुख हि नि दु:ख
तुझा एंटी वायरस खरंच
भारदस्त.....
अपडेट होतो आपोआपच
सकाळ ची लगबग.....
डबा नास्ता मुलांची घाई
सारं सारं आवरतेस झ्टपट
वारध्क्य.....
आता मी सेवा निवॄत्त
नि तु पण रजोनिवॄत्त
दंतकांति गमावलेले ओठ
रोजच बघतात वाट...
मी हि तोच तुहि तिच
मन अजुनही ताजतवानं
तुझा एंटी वायरस आता
अपडेटच होत नाही..
आज चिंट्या,मिंटि मित्रांसवे
असतील एलिफंटा गेट वे ला
सखे चल आजचा दिवस तरि करु साजरा
जाऊ या भायखळ्या ला
नि त्या थोर वेलेंटाईन संताला
आदरांजली नाही पण कमीत कमी
श्रधांजलि तरि वाहु या...
वाचने
3499
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
सगळ्या आयुष्याची कथा सांगितलीत की थोडक्यात!
प्रत्येकाच्या आयुशात असचं घडत असत का . मग वारध्क्य. येण्या आधी तिच्या सोबत परलोकात जाणे पसंत करिन .
@ रघु सावंत
प्रत्येकाच्या आयुशात असचं घडत असत का . मग वारध्क्य. येण्या आधी तिच्या सोबत परलोकात जाणे पसंत करिन .
हाताची पाचही बोट सारखी असतात का ?
सगळ्याचे अनुभव वेगवेगळे असतात :)
मग वारध्क्य. येण्या आधी तिच्या सोबत परलोकात जाणे पसंत करिन .
च्यायला वार्धक्य इतक वाइट असत का ?
असो.... कविता बर्यापैकी बरिये :)
पूर्ण वाचली ..
पण बरेच पल्ले गाठायचे बाकी असल्या ने
सगळ चित्र जिवंत नाही होवु शकल .
लिहित रहा ....
In reply to पूर्ण वाचली .. पण बरेच पल्ले by जेनी...
पण बरेच पल्ले गाठायचे बाकी असल्या ने
सगळ चित्र जिवंत नाही होवु शकल .
लवकर मनावर घ्या... बाकी सुब्बु काय म्हण्तोय..? ;)
In reply to पण बरेच पल्ले गाठायचे बाकी by पक पक पक
सुब्बु मजेत एकदम ;)
In reply to पण बरेच पल्ले गाठायचे बाकी by पक पक पक
अजय'जी... छान प्रगल्भ कविता!!
मागच्या कवितेपेक्षा ही कविता जास्त मॅच्युअर्ड वाटते.... तुम्ही खरंच एक चान्गले कवी आहात, हे हळूहळू पटायला लागलंय... :)
मस्त.
यावरुन एक आठवलं.
लग्नानंतर पहिल्या दहा वर्षांत
It's ..Tri-weekly
त्यानंतरच्या दहा वर्षांत
It's ... Try weekly
त्याहीनंतरच्या दहा वर्षांत
It's ..... Try weakly
In reply to मस्त. यावरुन एक by गवि
आपण महान आहात. ;)
आभार सर्वांचे स्पेषिअलि म्रुनयनी जी आपले
कारण आपण जे स्वपनाळु पणे काव्य रचतो
ते सारं तकलादू असते असं म्हला वाटते....
खरं जीवन हे वेगळेच असते.
माझे, आपले नि सर्वाचेच.....
कुन्हि कितिहि गप्पा मारोत....
सगळेच मास्क घालुन वावरताहेत.
प्रिय अजय,
छान लिहिले आहेस.
हे विशेष आवडले:
"खरं जीवन हे वेगळेच असते.
माझे, आपले नि सर्वाचेच.....
कुन्हि कितिहि गप्पा मारोत....
सगळेच मास्क घालुन वावरताहेत. "
पर.न्तु
"कारण आपण जे स्वपनाळु पणे काव्य रचतो
ते सारं तकलादू असते असं म्हला वाटते...."
काव्य स्वपनाळु असले म्हणून तकलातू झाले ह्यला मी सहमत नाही. कारण, काव्य ही एक भाव-अभिव्यक्ति चे केवळ एक माध्यम आहे. आणिक भाव हे 'स्वपनाळू' ही असू शकतात किन्वा अत्यन्त 'प्रक्टिकल' देखिल. तेन्व्हा कुठ्ल्याही अभिव्यक्ति ला आपण दुय्यम असे सम्बोधित करणे योग्य नव्हे.
कुणाच्याही काव्यास कुचके पणाने प्रतिसाद देणारे हे केवळ शुल्लक हेतु ने येतात अणिक लिहितात. तेन्व्हा पुर्ण पणे दुर्लक्ष करणे.
लिहित रहा! आवर्जुन वाचतो आहे.
शुभेच्छा!
- निनाव.
>>>जिवाणु विषाणुंचा कहर
हम्म..