Skip to main content

वल्ली जर " इंडियना जोन्स " तर ........

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 23/02/2012 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई

शि द फडणीस

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी बुधवार, 22/02/2012 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट आहे १९३५-३६ मधली. हत्तीशी झुंज खेळण्यासाठी बनवलेल्या कोल्हापूरच्या साठमारीच्या मैदानात काही शाळकरी मुलं खेळत असतांना त्यातील एकाचा पाय घसरून तो भिंतीवरून थेट मोठाले खिळे असलेल्या दूस-या भिंतीवर जाऊन पडला. मोठाले खिळे मांडित घुसले आणि सरळ दवाखान्यात भरतीच व्हावं लागलं. दवाखान्यात विचारपूस करायला येणा-यांची रिघ लागली. 'असा कसा काय अपघात झाला?' लोकांचा परवलीचा प्रश्न! आणि विचित्र अपघाताबद्दल सांगता सांगता आधीच चिंताग्रस्त वडिलांची उडालेली तारांबळ! मात्र सोबत खेळणा-या दहा वर्षाच्या एका मुलाने शक्कल लढवली. तीन चार चित्रांच्या मालिकेतून अपघात कसा घडला हे त्याने स्पष्ट करून दाखवलं.

सा रे ग म प.... स्वप्न तार्‍यान्चे

लेखक चिम् चिम् मामा यांनी बुधवार, 22/02/2012 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
झी-मराठी वर चालु असलेले सा रे ग म प... या कार्यक्रमाचा या पर्वाचा नेमका हेतु काय हेच कळत नाही... सर्व नावाजलेले कलाकार... पण त्याना गाणे म्हणायला घेतले? क्रान्ती रेडेकरचा आवाज तर.... खरच रेड्या सारखा आहे... नुस्ती किन्चाळत असते... ती आली तर मी चेनल बदलतो किन्वा आवाज बन्द करतो आणि अशा गाण्या नन्तर पण अवधूतला तिच कौतुक कराव लागत...हे पाहून मला हसु येत....आणि आज कल राग पण येतो. सम्पुर्ण कार्यक्रमात मला गाण सोडुन फक्त अवधूतचे बोलणे आवडते... प्रशान्त दामले...मोहन जोशी... अम्रुता सुभाष... अशा काही मोजक्या कलाकाराचे गाणी सोडली तर...

निर्णय

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 22/02/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
घट्ट मिटलेल्या डोळ्यापुढे अस्वस्थ अंधारात रंगीढंगी चित्र-विचित्र विक्षेप करत नाचत राहिल्या आकृत्या लहानाच्या मोठ्या आणि मोठ्याच्या लहान होत ठेंगा दाखवत दात विचकत हसत राहिल्या आकृत्या कान मुद्दाम बंद केले होते हात बांधून कानाशी एका दगडात पाडून टाकले चिवचिवणारे दोन पक्षी तरी राहिले आदळत आवाज भित्र्या भिंतींना भेदून शिरत राहिली नको ती कुजबुज पडदे सगळे छेदून पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप अंधार पिऊन फाकणारी आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी जरबेने पाउल टाकणारी मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी? डोळे उघडून एकदा तरी पाहायलाच हव…
काव्यरस

व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 22/02/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : http://www.misalpav.com/node/20768 भानामती गाण्यावरून कोलावरीची चाल चोरली आहे. तेंव्हा गाणे मूळ चालीत आणी अंगविक्षेप करतच म्ह्टले पाहिजे. चाल नीट समजल्या शिवाय मज्जा नै येणार. आधी ऐकले असेल तरी पुन्हा आइका आणी मगच वाचा: http://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8 यो बॉयझ आय आम सिंग साँग सूपर साँग... फ्लॉप साँग .. व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी र्‍हीदम करेकटा व्हाय धिस भानामती भानामती भानामती दी मेनटेन प्लीज व्हाय धिस भानामती..
काव्यरस

गुन्हेगारीचे राजकीयकरण ....

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आयबीएन लोकमत वाहिनी वर प्रसारित झालेल्या " आजचा सवाल " या कार्यक्रमात ...राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर चर्चा झाली. राजकीय पक्षाचे प्रमुख आणि जबाबदार पदाधिकारी गुन्हेगारांना निवडणुकीची तिकिटे का देतात नेते आणि उमेदवार गुंडांची मदत का घेतात किंवा घेतात की नाही ? असा साधारण चर्चेचा विषय होता . ही चर्चा बघताना आणि ऐकताना ..." सिंघम " सिनेमा बघताना जितकी करमणूक झाली नाही तेवढी करमणूक झाली. अनेक पक्षांचे नेते येवून गुंडांना निवडणूक लढवण्यापासून कसे रोखता येईल त्याची उपाययोजना करण्याच्या गप्पा मारत होते.

मुक्तछंद

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी खूप दिवसांनी "खट्टा मीठ " सिनेमातील " थोडा है थोडे की जरुरत है " गाणे लागले होते......आधी खूप वेळा हे गाणे ऐकले होते पण आज मूड जरा वेगळा होता....जरा विचारात पडलो ...नेमकं काय सांगायचं आहे गीतकाराला या गाण्यातून... हा विचार मनात आला ....... आपल्या रोजच्या जगण्याचे जणू प्रतिबिंब यातून डोकावते आहे ........बघा ना.....

ऑनर किलिंग की मानवी संवेदनांचा खून

लेखक यशोधन वर्तक यांनी बुधवार, 22/02/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रातून " घराण्याची इज्जत वाचवण्याकरिता वडिलांनी आपल्या स्वतःच्या मुलीचा खून केला " अशी बातमी छापून आली होती . यावर कळस म्हणजे ती व्यक्ती स्वतः पोलीस स्टेशन मध्ये आपल्या गुन्ह्याची माहिती द्यायला हजर झाली. वाचूनच अंगावर शहारा आला . हल्ली नव्या जगात याला " ऑनर किलिंग " अशी संज्ञा आहे म्हणजे घराण्याची सो कॉल्ड अब्रू वाचवण्याकरिता आपल्याच जवळच्या व्यक्तीचा बळी देणे. वरील घटनेमध्ये बळी गेलेल्या मुलीने आपल्या जातीतील मुलाशी लग्न न करिता परजातीतील मुलाशी प्रेम विवाह करण्याची इच्छा दर्शवली आणि म्हणून शेवटी तिचा बळी गेला.