आज सकाळी खूप दिवसांनी "खट्टा मीठ " सिनेमातील " थोडा है थोडे की जरुरत है " गाणे लागले होते......आधी खूप वेळा हे गाणे ऐकले होते पण आज मूड जरा वेगळा होता....जरा विचारात पडलो ...नेमकं काय सांगायचं आहे गीतकाराला या गाण्यातून... हा विचार मनात आला .......
आपल्या रोजच्या जगण्याचे जणू प्रतिबिंब यातून डोकावते आहे ........बघा ना..... अगदी लहान पण पासून आपण हा रागच आळवत आहोत ......".थोडे की जरुरत है "....शाळेत असतांना मार्कांच्या शर्यतीत .....मोठे झाल्यावर कॉलेज प्रवेशाच्या वेळी ....त्या पुढे नोकरी आणि छोकरी शोधताना .....पगाराच्या दिवशी आणि प्रमोशन च्या वेळी........हा प्रवास पुढे पुढे आपल्या मुलांच्या शाळा प्रवेशा च्या वेळी....एका नव्या वळणावरून पुन्हा एकदा अगदी पहिल्या पासून सुरु होतो ......
पायी चालणारा मोटार सायकल कडे बघत असतो ......मोटार सायकल वाला. मारुती कडे बघतो ......मारुती वाला हुंदाई कडे बघतो .....हुंदाई वाला मर्सिडीज कडे बघतो .....जीवघेणी शर्यत चालू होत. ...वरुन कितीही समाधानाचा आव आणला तरी मनातल्या मनात ही तळमळ सुटत नाही ......जाउ दे हा हा जगण्याचा भाग आहे ......
पण थोडा वेगळा विचार केल्यास "थोडे कि जरुरत है " हा विचार ही ओढ माणसाला जगण्याची संजीवनी पुरवते असे चित्र ही असू शकते .....दररोजच्या चक्रात पीळून निघणारा सामान्य माणूस याच स्वप्नाच्या सहारे आपापले जीवन लज्जतदार बनवायचा प्रयत्न करत असेल कदाचीत .......शेवटी जगण्याकरिता काहीतरी निमित्त असायला हवेच..अन्यथा दररोज तेच तेच विचार आणि कृती करून माणसाचे यंत्र मानव होण्याची प्रक्रिया चालू झाली असती ...आणि एकदा यंत्र मानवात रुपांतर झाल्या वर मग ....भावना...प्रेम ....आपुलकी यांचा संबंध आपोआप तुटत जातो .....स्वप्नपूर्ती साठी सतत धडपडत असणे यालाच कदाचीत जगणे म्हणत असतील
कधी कधी स्वप्न आणि धेय्य यात कधी कधी गफलत होवू शकते. .........स्वप्ने म्हणजे तरी काय शेवटी ..ज्या गोष्टीन ची पूर्तता होवू शकत नाही अशी धेय्ये....आणि धेय्ये म्हणजे ज्यांची पूर्तता थोड्या फार प्रमाणात होवू शकते अशी स्वप्ने . यामुळे स्वप्नं आणि धेय्य यातील फरक न करता आल्याने अनेक सुंदर आयुष्ये पराकोटीची दुखी होतांना आपण दररोज पाहतो. पण एकदा स्वप्नं आणि धेय्य यातील फरक कळला की मग पहा जगण्याला किती नवीन अर्थ प्राप्त होतो ते.....
आपल्या धेय्याकडे वाटचाल करत असतांना होणाऱ्या परिश्रमांमुळे जाणवणारा शारिरीक आणि मानसिक ताण दूर करायची गुरुकिल्ली म्हणजे स्वप्नांची दुनिया .
सनी देओल च्या तोंडी " अर्जुन " सिनेमात एक डायलॉग आहे " सपने देखनेसे नाही तुटनेसे डरता हु " हे वाक्यच सर्वकाही सांगून जाते .......अपेक्षाभंगाच्या भीतीने स्वप्ने बघण्यापासून वंचित राहणारे या जगात सर्वात मोठे करंटे असतील ......कारण फक्त स्वप्नं बघतानाच ती जगायची असतात...खऱ्या दुनियेत त्याचे प्रतिबिंब शोधण्याचा प्रयास दु:खा कडेच घेउन जातो. पण स्वप्नं ही गोष्टच मजेदार आहे त्यांना स्थळा काळाची मर्यादा नाही .... कोणते ही नियम लागू होत नाहीत काही ठराविकच डायमेनशन्स नाहीत अगदी " कलीडोस्कोप ".प्रमाणे .बस फक्त एक मुक्तछंद .......पण " कलीडोस्कोप " सारखी या कल्पनांना आपल्या मनाच्या उत्कटतेच्या आराश्यांची जोड लाभ ली तर या मुक्तछंदातून देखील काही चांगली धेय्या निर्मिती होवू शकेल .
तात्पर्य काय ...शेवटी स्वप्ने असू दे नाही तर धेय्ये ..आपल्या अंतरमनातील जाणीव जागतृ असल्याशी कारण .......शेवटी म्हणतात ना पावलांची ओढ असल्याखेरिस पंखांच्या उडण्याला अर्थ प्राप्त होत नसतो....
सुन ..सुन.... सुन..... हवा चली .......तेरे आंचल से उडके घटा चली .........बादल पे उडना होगा ...
थोडा है थोडे की जरुरत है .....जिंदगी फिरभी यहा खुबसुरत है ...
यशोधन वर्तक
९३२३९३८२९० .
वाचने
1344
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है....
वा वा!!