मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वल्ली जर " इंडियना जोन्स " तर ........

चौकटराजा · · काथ्याकूट
मिपा वरील बातमीपत्रात श्री रा. रा. वल्ली साहेब यांचा उल्ल्लेख " इंडियाना जोन्स" असा वाचला. यावरून एक वात्रट पण गमतीशीर धागा सुचला.इथे एक का अनेक पात्रे आहेत. ती कोणा कोणाशी साधर्म्य दाखवितात ? कोण जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, पँथर, शेरलॉक पेरी मेसन, काळापहाड, समर्थ, काउंट ड्राक्युला , किंग कॉंग , गॉड झिला, स्कारामांगा, एक्झॉर्सिस्ट, जॉ, पिरान्हा, डर्टी हॅरी, झुंजार, राजाराम राजे.........ई...ई

वाचने 11369 वाचनखूण प्रतिक्रिया 62

In reply to by आत्मशून्य

मोदक 23/02/2012 - 14:12
मला तरी तो कॅप्टन जॅक स्पॅरो सारखा भासायचा. तू स्पा ला (त्याच्या) लहानपणापासून बघतो आहेस का..? ;-)

पैसा 23/02/2012 - 14:11
बाकी आयडींची तुलना करायला बरेच जण घाबरतायत बहुतेक.

विजुभाऊ 23/02/2012 - 14:26
डान्या = कॅप्टन दीप परा= बॅ अमर विश्वास धम्या = ऑलोव्हर हर्डी प्रीमो= रजनी काटकर गवी = स्टॅन्ली लॉरेल प्रभु मास्तर = मि. बीन रामदास = मोगँबो मदनबाण = डॉ वॉटसन यक्कु = बाँड जेम्स बाँड ( हो याची वळख अशीच द्यायची असते) पैसा = श्यामची आई सोत्रि = किशोर प्रधान बिका = ( सुपर म्यान ठरु शकला असता पण तो कपडे योग्य क्रमाने घालतो ही अडचण आहे) श्रावण मोडक = पेरी मेसन. प्राजू = एलीझा डूलिटल सध्यातरी हीच आठवताहेत.

In reply to by गवि

विजुभाऊ 23/02/2012 - 14:33
धमु आणि माझी उलटापालट झाली काय हो विजुभौ..?? मुद्दामच.... निदान आम्हाला तसे स्वप्नात तरी पाहू द्या की .

In reply to by विजुभाऊ

आत्मशून्य 23/02/2012 - 15:03
बाँड ? यक्कुला "टॉम क्रुज" म्हणतात अशी कुजबुज ऐकली आहे, रेफरन्स आठवत नाही, जाणाकारांनी प्रकाश टाकावा.

In reply to by आत्मशून्य

यकु 23/02/2012 - 15:06
अरे ए बाबा हो.. कशाला उगाच माझी बदनामी लावलीय.. मी आपला यक्कुच बरा आहे.. यक्कु: जो कभी न था, न होगा ;-) सब माया है भैया.. वो इंदुर के रास्ते पर खडा पुलिस इन्स्पेक्टर क्या कह रहा था सुना नहीं क्या..

कपिलमुनी 23/02/2012 - 14:34
आम्हास लै कोणी ओळखत नसल्याने स्वतःला "कुंग फु पांडा" म्हणवून घेत आहे .. सौरभ आणि मोहनच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत ...

५०फक्त= चाचा चौधरी वपाडाव= डिंकू गवि= ब्याटम्यान मधले पेंग्विन ओक आणी पका काका= साबु और राका वल्ली= (हल्ली इंडियाना जोन्स असले तरी) ... ही म्यान...बाय दी पॉवर ऑफ दी ग्रेस्कल, आय हॅव दी पॉवर.. पिवशा=क्याट वुमन... >>> ब्बाबौ...आता पळा पळा पळा

In reply to by मोहनराव

@अत्रुप्त आत्मा = शकुनी मामा!!>>> @आता स्माइलींचा डोंगर पाठीमागे लागणार!>>> भांजे..तुझे छोडुंगा नही मै.. अब जब मिलोगे तब यही होगा तेरा हाल

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिमी 23/02/2012 - 18:53
आज सकाळी हा धागा पाहिल्याबरोबर माझ्यापन डोक्यात अगदी हेच कोम्बिनेशन आल होत. ५०फक्त= चाचा चौधरी परा = राका पियुशाचा फोटो अजून पाहिला नाही पन तिला मी 'स्माओल वन्डर' मधील व्हिक्टोरिआ/विकी म्हणेल. प्रीत मोहोर - पोवर पफ गर्ल्स मधील ब्लोसम आणि अत्रुप्त आत्मा = तेनालीरामा.

In reply to by गवि

वपाडाव 23/02/2012 - 19:04
आम्ही अलादिन वेग्रे नाहीत... हां तसं कालीन, माकडं अन पोपटं लै हैत आपल्याकडं पण जास्मिन साला काय भेटत नाय... गविकाका, तुमचं समुपदेशनाचं सदर सुरु झाल्यावर तिथे ही शंका विचारीन म्हणतो...

In reply to by गवि

यकु 23/02/2012 - 17:17
>>>त्यातल्यात्यात साम्य शोधायचंय ना?! >>>ऑलिव्हर हार्डी तरी काय? माझ्यापेक्षा किती बारीक आहे.. --- अहो वरुन त्या विनय येडेकराच्या सगळ्या भूमिका बावळट असतात.. आता असेल माझ्यात थोडासा बावळटपणा... पण थेट त्यासाठी विनय येडेकर म्हणजे.. सूडाण्णा वनफोर्थ, नशीब कानस म्हणालास.. बतई नाही मागवलीस.

मी-सौरभ 23/02/2012 - 18:46
प्रास भाऊ = जीन तर स्पाडू = अल्लदीन ---- = जास्मिन (अधिक माहितीसाठी किसन देव मदत करु शकतील अशी अपेक्षा आहे) धन्याला मोगली असं म्हणावं का? असा प्रश्न सतावत आहे.. जाणकारांनी मत द्यावे.

In reply to by यकु

मेलो...मेलो...यक्कू आणी सौरभ ....हसुन हसुन भंजाळलोय... स्माइलीचे पान नै सापडत आहे...टाकायला...अता या विषयावर स्माइलीच उपलब्ध नैये :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या 25/02/2012 - 19:12
ये च्यामायला... आयला मानुस गायब आसतंय ते काई कामानिमित्त आसतंय. त्येच्या पाटीमगं त्येची बदनामी करायची नाय. माजी आय म्हनती तोंडावर बोलावं पन पाठीवर बोलू नये... जाउ दे च्यामायला आजकाल काय समजवन्याचा आनि समजून घेन्याचा जमाना र्‍हायलेला नाय....

अन्नू 23/02/2012 - 18:58
स्वतःला अशी विशेषणे! बरं झालं आपण यात कुठेच नाही ते Smiley यापासून दूरच राहीलेले बरे Free Smilies courtesy of www.GreenSmilies.com

चौकटराजा 23/02/2012 - 19:11
वेताळ, मॅड्रेक, जय वीरू, साम्भा, गब्बर, फ्रॅन्केस्टाईन, मायकेल, लॉयन, विजय दीनानाथ, तात्या विंचू, लाला केदारनाथ, भुत्या, इन्पे. तुफानराव, सरकारी वकील बाळाजी राव , कॅसानोव्हा, ब्लॅकबीअर्डस घोस्ट ई ई ई लगे रहो !

मन१ 23/02/2012 - 22:55
आम्ही जुन्या "गोलमाल" चित्रपटातले साधे सुधे अमोल पालेकर....

In reply to by यकु

मन१ 25/02/2012 - 09:05
सदर प्रतिक्रियेचा अर्थ आम्ही थोर ऐतिहासिक व्यक्तिचे नाव असा न घेता एक विशेषण म्हणून घेताहोत. तसषष्ठीआपण दिलेली उपाधी (बाल गंगाधर टिळक) षष्ठी बहुव्रीही समास का काय असेल तो त्या अर्थाने घेतल्यास :- " बाल बुद्धी असून ज्याच्या नाकातून सदैवे गंगेच्या धारा लागलेल्या आहेत असा कपाळास कंटाळ्वाणेपणाचा टिळा घेउन फिरतो असा तो" हा अर्थ प्रतीत होतो.

रघु सावंत 23/02/2012 - 23:37
आम्हांला सध्या काहीच सुचत नाही. कारण मी फक्त हल्ली रामदास सरांच्या जास्त सहवासात असतो. सरं म्हणजे उस्ताद. जेम्स बाँड, सुपरमॅन, फॅन्ट्म, शेरलॉक पेरी मेसन, समर्थ , झुंजार व्यक्तीमत्व , राजे,पेशवे ,रिअल डेव्हलपमेट ऑफिसर, "ग्रुहस्ते रोकडी करावी" म्हणणारे तेच, झापणारे तेच फुंकर घालणारे तेच. माझं नशीब बघा गेली ६ वर्श ओळखतो पण गेले ३ महीने झाले एकत्र आलो.