Skip to main content

माझा नवा छंद ....क्रोशे

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 27/02/2012 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीत शिरलं की आपल्या आयुष्याचा डाव परत मांडावासा वाटतो (अर्थात, काही सोंगट्या न हलवता.) मग आपल्या आयुष्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींचा आपण शोध घ्यायला लागतो. माझे पण असेच झाले. आणि शोध घेता घेता अचानक एके दिवशी मला माझा आवडणारा पण राहून गेलेला एक छंद अगदी कडकडून भेटला. क्रोशे. शाळेत निर्माण झालेली माझी लोकरीचे विणकाम करण्याची आवड बरीच टिकून राहिली, पण क्रोशे मात्र कुठल्यातरी वळणावर माझे बोट सोडून निघून गेले. शाळेत असताना मी क्रोशे शिकले होते पण नंतर का कुणास ठाऊक, मी परत त्या वाटेला गेले नही. आता इतक्या वर्षानंतर मला क्रोशेकाम अजिबात आठवत नव्हते. खांब ...

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/02/2012 05:14 या दिवशी प्रकाशित केले.
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा! वाघ्या मी मुरळी देवाची ग तू मिळून जागरण करू...

घनगड-शिवाजी ट्रेल(दुर्गपुजा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 27/02/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी(२५ फेब्रुवारी) बरोब्बर चारला किल्यावर निघायचं असं म्हणता म्हणता,सहा कधी वाजले कळलं नाही.बरोबर येणारा आमचा एक मैतर अयत्यावेळी इचकला.पण माझ्यासाठी शिवाजी ट्रेलचा हा वार्षिक कार्यक्रम म्हणजे पंढरीच्या वारी सारखा खरोखर पुण्याचं संचित करवुन देणारा,म्हणुन ''वन मॅन आर्मी झिंदाबाद,शिवाजी महाराज की जय'' अशी घोषणा करुन मी एकदाचा निघालो...घनगड म्हणजेच येकोल्याच्या किल्यावर...हा किल्ला पुणे- ताम्हाणी घाटातुन ६९कि.मि.वर लोणावळ्याकडे जायला जो फाटा फुटतो,तिकडनं आत १८ कि.मि.वर आहे.अता ताम्हाणीघाट अगदी आमचाच सवईचा नित्याचा ओळखिचा झालेला असल्यामुळे कित्तीही अंधार असला,तरी तोच सोबतीला असल्यासारखा असत

निराश तरुणाईचे मनोगत......

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 26/02/2012 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम, स्पर्धा नि व्यसनान, झालाय आयुष्याचा बेरंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रेमभंगात होऊनी निराश विचलित झाल अभ्यासातील लक्ष सावरण्यासाठी नाही अजूनही दक्ष जगण्याची आस मारुनी, टाकितो हा प्रेमभंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे धाव जलद यशाची लागली हाव कष्ट करण्याचा न राहिला ठाव अपयशाच्या भीतीने, जाहलो मी निसंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... करिअरची वाट खूप अवघड जीवघेण्या स्पर्धेत चालू धडपड प्रत्येक वेळी नवीन गडबड जिद्द अन चिकाटी विकुनी, लावितो आयुष्याला सुरुंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दं
काव्यरस

व्यसनाधीनता व उपचार........

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 26/02/2012 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनिकेत, २७ वर्षाचा इंजिनिअर...तीन वर्षापूर्वी एका चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला होता. छोटस स्वतःच घर घेतलं, लग्नही झाल. पण अचानक आर्थिक मंदीमुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. अनिकेतला हा धक्का सहन झाला नाही व तो व्यसनाच्या आहारी गेला. कुटुंबीयांनी खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पालक वैतागून गावाकडे निघून आले नि बायकोही माहेरी निघून गेली. निखील, वय वर्ष २०.एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी. बारावीत चांगले गुण मिळवून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घरापासून दूर राहिला होता. चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच तो पहिल्या वर्षी नापास झाला.

कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही .

दापोली इथे अमृते यांचे निसर्ग सहवास एग्रो टुरिस्म रिसोर्ट...

लेखक पुश्कर यांनी रविवार, 26/02/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
दापोली पासून 5km अंतरावर गव्हे या निसर्गरम्य गावात हे ठिकाण आहे.... लाल मातीचे रस्ते , वळणदार घाट व नारळ आणि सुपारी च्या बागा यांनी नटलेले सृष्टीसौंदर्य बघत कोकणात कसे पोहोचलो हे कळलंच नाही.