Skip to main content

एक कविता

लेखक राजो यांनी बुधवार, 29/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती.

'सचिन'चे महाशतक : आमचाही धागा

लेखक आशु जोग यांनी बुधवार, 29/02/2012 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताची क्रिकेटमधे श्री लंकेबरोबर गाठ पडली. भारतीय क्रिकेट टीमची सध्याची स्थिती आणि गती पाहता कुठल्याही आशा नव्हत्याच. अपेक्षा नाहीत त्यामुळे अपेक्षाभंगाचे दु:खही नाही. असा सुज्ञ विचार भारतीय क्रिकेटरसिक करू लागलाय.

ईशान्य भारत ...

लेखक अमितसांगली यांनी मंगळवार, 28/02/2012 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी समजून घेता का....कोणी उमजून घेता का.....?? आक्रोक्ष माझ्या जगण्याचा....कोणी जाणून घेता का....?? कुणाचा असेल हा जीवघेणा आकांत..?? चिमुकल्या स्त्री गर्भाचा कि दंगलीत होरपळलेल्या कुटुंबाचा..?? सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा कि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा..?? अपयशी विद्यार्थाचा कि महागाईच्या कचाट्यात अडकलेल्या सामान्याचा....कुणाचा...?? भारतीयच परंतु प्रगत रस्ते, वेगवान मोटारी, हवे तेवढे मॉल्स, सुसज्ज दवाखाने, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व सुख सोयीपासून वंचित असलेल्या ईशान्य राज्यांकडील लोकांचा हा आवाज आहे . मागासलेपणा, दळणवळणाची अपुरी साधने, उच्च शिक्षणाच्या अल्प सोयी, जबरदस्तीने होणारे ख्र

मराठी दिनानिमित्त काही अस्सल मराठी अभिव्यक्ती..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही अस्सल मराठी अभिव्यक्ती ..! फारा दिवसांपासून आम्ही ‘अमृताते जिंकीत पैजा..’वाल्या मराठीच्या अस्सल अभिव्यक्तींचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अलीकडे मराठी भाषेची क्षितिजे मुंबई नगरी प्रमाणेच अस्ताव्यस्तपणे विस्तारल्याने अस्सल काय नि नक्कल कोणती याबाबत आमचा अंमळ गोंधळ व्हायला लागलाय. याबाबत अस्सल मराठी अभिव्यक्तीच्या व्यासपीठावरील विद्वानांचा व विदुषीनचा सुयोग्य व सूज्ञ सल्ला मिळेल या आशेने आम्ही आलो आहोत. इंग्रजी भाषेचा आहे तसा मराठीचा जागतिक स्तरावरचा शब्दकोष अजून का बनवला गेला नाही याची कारणे आम्हाला मराठी अभिव्यक्तींचा अभ्यास करताना समजली.

आम्ही तारे हॉलीवूड चे..... आम्ही तारे हॉलीवूड चे.....

लेखक यशोधन वर्तक यांनी मंगळवार, 28/02/2012 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्ही वर ऑस्कर सोहोळ्याचे प्रक्षेपण पहिले. आणि अनपेक्षितपणे मेरील स्ट्रीप ला " द आयर्न लेडी " करता सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले. मेरील स्ट्रीप पुन्हा जिंकली . क्रेमर वर्सेस क्रेमर मध्ये डस्टीन होफ्फ्मान समोर तिने उभी केलेली भूमिका तिला हॉलीवूड च्या समर्थ अभिनेत्रीन मध्ये स्थान देवून गेली. त्या नंतर तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास जोमाने सुरु राहिला . तिचे गेल्या काही वर्षात आलेले सिनेमे असेच लक्षवेधी होते डेथ बिकेम हर , मामामिया , ड डेव्हिल वेअर्स प्रादा असे एका पेक्षा एक सरस चित्रपट तिने दिले.

मला ईश्वर भेटला ....!

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
मला ईश्वर भेटला ! कोपऱ्यावरचा बनिया नव्हे हो..! खराखुरा ईश्वर ! कसा ते ऐकायचंय ? अगदी अलीकडची आठवण म्हटली तर गेल्या आठवड्यातली गोष्ट. कामवाल्या सरूच्या ३ वर्षाच्या नातवाला बाळदमा आहे. ‘रातसारी खोकतोय हो पोर ताई !’ सरू म्हणत होती ‘औशीदबी लागू पडना.’ घरात एक सितोपलादी चुर्णाची बाटली होती. तिला दिली अन सकाळ संध्याकाळ पाव चमचा गरम पाण्यातून द्यायला सांगितलं. ४ दिवसांनी हसऱ्या चेहऱ्याने सरू सांगत आली ‘ताई, खोकला पार बंद झाला वो नातवाचा ! लई चांगलं औशीद दिलासा बगा .’ तेव्हा तिच्या हसऱ्या डोळ्यात मला ईश्वर भेटला ....! विनू माझ्या मुलाचा शाळूसोबती मित्र. चौथीनंतर शाळा बदललेल्या पण मैत्री कायम.

(कॉमन मॅन यांनी पुन्हा धागा काढला)

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 28/02/2012 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरचे तथाकथित वकील सदस्य कॉमन मॅन यांनी आजच पुन्हा एकदा कथ्याकुट सदरात धागा काढून त्यांची मते मांडली आहेत दोन वाक्यात आपले मत व्यक्त करण्यासाठी नमनालाच घडाभर तेलाची उधळपट्टी केली आहे कॉमन मॅनच्या हाताशी असलेला जिलेबीचा सोऱ्या, इतर सदस्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ आणि आपणच इथले कायद्याचे जाणकार असून, प्रत्येक धाग्यात कलमांचा संदर्भ लावलाच पाहिजे हा त्यांचा आग्रह आता बळावलेला दिसतो असेच म्हणावे लागेल कॉमन मॅन यांनी पाडलेल्या जिलेब्यांच्या विषयांवरून जयंत कुलकर्णी यांनी त्यांच्या पोशाखाला चालेंज करायचे ठरवलेले दिसते.

सध्या वाचत असलेले पुस्तक - बाईकवरचं बिह्राड

लेखक चिम् चिम् मामा यांनी मंगळवार, 28/02/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
"बाईकवरचं बिह्राड" मी सध्या वाचत असलेले पुस्तक... काही तरी वेगळे वाचावे म्हणुन मागच्या आठवड्यात क्रोसवर्ड मध्ये पुस्तके पहायला गेलो होतो... आणि एक पुस्तक नजरेस पडले... सह़ज चाळले.... आणि माझ्या सारख्या बाईक वेड्याला हे पुस्तक वाचायचा मोह झाला. डॉ.अजित हरिसिंघानी यांनी one life to ride लिहिलेले आणि सुजाता देशमुख यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक. पुणे ते लेह प्रवास डॉ.अजित हरिसिंघानींनी बुलेट वर केला... त्याचेच हे प्रवास वर्णन. मी सुद्धा असे काही प्रवास...(पुणे- मुंबई, पुणे-कोल्हापुर, ....