Skip to main content

आम्ही तारे हॉलीवूड चे..... आम्ही तारे हॉलीवूड चे.....

लेखक यशोधन वर्तक यांनी मंगळवार, 28/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काल टीव्ही वर ऑस्कर सोहोळ्याचे प्रक्षेपण पहिले. आणि अनपेक्षितपणे मेरील स्ट्रीप ला " द आयर्न लेडी " करता सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले. मेरील स्ट्रीप पुन्हा जिंकली . क्रेमर वर्सेस क्रेमर मध्ये डस्टीन होफ्फ्मान समोर तिने उभी केलेली भूमिका तिला हॉलीवूड च्या समर्थ अभिनेत्रीन मध्ये स्थान देवून गेली. त्या नंतर तिचा रुपेरी पडद्यावरचा प्रवास जोमाने सुरु राहिला . तिचे गेल्या काही वर्षात आलेले सिनेमे असेच लक्षवेधी होते डेथ बिकेम हर , मामामिया , ड डेव्हिल वेअर्स प्रादा असे एका पेक्षा एक सरस चित्रपट तिने दिले. आणि आज द आयर्न लेडी मध्ये माजी इंग्लिश पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थाचर यांची भूमिका तिने रंगवली . मनातल्या मनात स्व. इंदिरा गांधींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण मार्गारेट थाचर यांच्या पेक्षा द आयर्न लेडी हे विशेषण इंदिरा गांधीना अधिक शोभले असते. असो त्या निमित्ताने मला आज माझ्या आवडत्या हॉलीवूड च्या ताऱ्यांची आठवण काढण्याचा योग आला. १. अभिनेत्यांमध्ये सर्वात प्रथम ...अगदी प्रथम तुला वंदितो च्या चालीवर क्रमांकावर आहे तो म्हणजे हॉलीवूड चा सर्वात मोठा आणि सर्वात क्रिएंटिव स्टार एकमेवाद्वितीय स्वर्गीय चार्ली चाप्लीन. विशेष ऑस्कर देवून याचा सन्मान करण्यात आला होता . कमालीची गरिबी आणि कमालीची श्रीमंती आणि मानसन्मान भोगणारा हा स्टार शेवटपणे जमिनीवर घट्ट पाया रोवून उभा होता . हसरे दुक्खं असेच याच्या सिनेमांचे वर्णन करत येईल . मोडर्न टाइम्स , द सर्कस , सिटी लाइट्स , ग्रेट डिकटेटर , गोल्ड रश , द कीड , लाईम लाईट , द ट्रम्प सर्वच सिनेमे अप्रतिम. २. दुसऱ्या क्रमांकावर आहे तो अल पचिनो ...गोडफादर सिरीज मधील सिनेमातील थंड रक्ताच्या डॉन मायकेल ची भूमिका करणारा नट. याच्या स्कारफेस वरून अमिताभचा अग्निपथ बेतला होता असे म्हणतात. सेंट ऑफ अ वूमन , डिपारटेड असे अनेक सुंदर सिनेमे याच्या नावावर आहेत . मेथड अक्टिंग करिता हॉलीवूड मध्ये याला आदर्श मानतात. ३. तिसऱ्या क्रमांकावर आहे तो म्हणजे batman मधला जोकर जाक निकोल्सन . वन फ्लू ओव्हर द काकुज नेस्ट , वोल्फ , समथिंग गोत्ता गिव्ह , आज गुड आज इट गेट्स , फ़ेऊ गुड मेन याच्या सिनेमांची यादी संपता संपत नाही . ४. चवथ्या क्रमांकावर विराजमान आहे तो म्हणजे टोम हन्क्स ...फोरेस्ट गंप , फिल्देल्फिया , काच मी इफ यु कान , लेडी किलर , यु गॉट मेल , द ग्रीन माईल , कास्ट अवे , एंजल अंड डेमन , द विन्ची कोड , सेव्हिंग प्रायव्हेट रायन , यादी संपत नाही आणि मन भरत नाही .. ५. जॉनी डेप हा पाचव्या क्रमांकाचा मानकरी आहे ...चारली अंड चोकलेट फेकटरी , पायरेट्स ऑफ करेबियन सिरीज , द नाईन्थ गेट , ब्लो , एडवर्ड सीझरहान्ड , फायडिंग नेव्हर लांड , सिक्रेट विंडो ,फ्रोम हेल ... या माणसाने इतके सिनेमे केले की लिस्ट करताच येत नाही. ६. मायकेल डग्लस शिवाय ही यादी संपणार नाही वौल स्ट्रीट सिरीज , बासिक इंस्तीक्ट , फेटल अट्रक्षन , जुईल ऑफ नाईल , द ट्राफिक, द गेम , द दिस्क्लोजार , द फालिंग डाउन , द सन्तिनेल , याने मनाला भुरळ घातली नाही असा सिनेरसिक नसेल.. जॉर्ज क्लुनी , हंफ्रे बोगार्त , देन्झ्यल वाशिंग्टन ,गोड फादर मार्लिन ब्रान्डो , आद्य बॉंड सीन कोनेरी , नखशिखांत सैनिक दिसणारा आर्नोल्ड श्वारझानेगर , रेन मान दस्तीन हॉफमन , हे ही माझे आवडते नट आहेत परंतु वर उल्लेखलेले सहा जण जास्त आवडतात. अभिनेत्रींमध्ये मेरील स्ट्रीप सर्वोत्तम पण इतर काही जणी ही आहेत. १. सर्वात आवडती नटी म्हणजे जुलिया रोबर्ट्स प्रीटी वूमन , नोटिंग हिल , रन अवे ब्राईड , एरीन ब्रान्कोविच , द मोनालिसा स्माईल , अमेरिकाज स्वीटहार्ट्स , माया बेस्ट फ्रेंड्स वेडिंग ......हिचा न आवडलेला सिनेमाच आठवत नाही. २. दुसऱ्या क्रमांकावर आहे हॉलीवूडची सौंदर्य देवता आणि साम्राद्नी अगदी मरेपर्यंत राहिलेली ..साक्षात एलिझाबेथ टेलर ....क्लिओपात्रा , हुज आफ्रेस उफ वर्जिनिया वोल्फ सर्वांग सुंदर अभिनय आणि एखाद्या ग्रीक देवते प्रमाणे चेहेरा . हिला दुसरा पर्याय निर्माण झाला नाही. ३. द घोस्त मधील अभिनयाने वूपी गोल्डबर्ग ने मला असेच आकर्षित केले होते. त्याकरिता तिला ऑस्कर ही मिळाले होते . द कलर पर्पल , द असोसिएत , सिस्टर एंक्ट सिरीज बोगस ,बॉयस ऑन द साईड ती नेहमीच अप्रतिम अभिनय करत राहिली नट्या तशा खूप आहेत बऱ्याच जणींनी लक्षवेधी अभिनयही केला आहे " ब्लाक स्वान " मधील नटली पोर्टमन ..या आधी स्टारवोर्स मध्ये बघितलेली आठवत होती , " लेगली ब्लोंड " रीस विदरस्पून , " वूमन ऑन टोप " मधील पिनोलोप क्रुझ. पीस मेकर मधील निकोल किडमन किती तरी ... या सर्व अभिनेते अभिनेत्रीन च्या अभिनयाने खूप आनंद दिला आहे . ऑस्कर सोहोळ्याच्या निमित्ताने त्यांची आठवण एवढेच. तुमच सिनेमा शौकीन मित्र यशोधन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4157
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

छान ! चांगली यादी दिली आहे.. यातले किती पाहून झालेत आणि किती राहिलेत ते पाहुन राहिलेले पहाण्‍यात येतील. अशा विषयावरच तुम्ही असं थोडंस लिहावं ना! तूर्तास तरी आम्ही इटॅलियन-अमेरिकन जो पेस्की, राल्फ मॅचीओ आणि Fred Gwynne (उच्चार मदत आवश्यक) आणि क्यूटेस्ट ऑफ दि क्यूट मरिसा तोमेईच्या प्रेमात पडलेलो आहोत... फिदाच म्हणा की.. च्यायला नंतरच्या लाटेत कुठं वहात गेले हे सगळे काही कळलं नाही. एक लेख पण पाडला होता पण गेला तोही वाहून.

मालक, आपल्याला काळे कलाकार आवडत नाहीत काय... कारण डेन्झेल वॉशिंग्टन, विल स्मिथ, हॅले बेरी यांची नावे विसरलात म्हणुन वाटले... तसेच आपण लिओनार्डो डिकॅप्रिओ, सलमा हायेक, जेसिका अल्बाचेही नाव नाही घेतले... असो, प्रत्येकाच्या चॉइसचा प्रश्न आहे... टॉम हँक्सचा 'द टर्मिनल' पण पाहुन घ्या... सुरेख आहे... अल पचिनोचा 'हीट' अन 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बघा... पेनेलोप क्रुझचा 'बांदिदास' पण मस्त आहे... पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे तुम्ही 'क्लिंट ईस्टवुड' चे नाव विसरलात... हा अक्षम्य गुन्हा आहे...

In reply to by वपाडाव

लेका, वर लिहीलेले कलाकार सदर लेखकाच्या आवडीचे आहेत. त्याच्यात हे राहीलं ते राहिलं असं करु नये. तू टाक की तुला आवड्णार्‍या नट नटींची यादी आणि ईतर माहिती...

In reply to by मी-सौरभ

आदरणीय वपाडाव साहेब, आपल्याला काय काय "ईतर माहिती" आहे हे ही आम्हा सारख्या गरीबाला कळूद्यात बरे.

In reply to by मोदक

चित्रपट बघणे हा एक जोपासलेला छंद आहे मालक... तो मी यथाशक्ती पार पाडतो ... त्यातुन मिळालेलं न्यान आहे हे...

In reply to by मी-सौरभ

सौरभला मनापासून +१ - ('हे राहीलं ते राहिलं' असं न वाटलेला) सोकाजी

In reply to by वपाडाव

काळे कलाकार आवडत नाहीत असे नाही डेन्झेल वॉशिंग्टन ( बोन कलेक्टर , देजा वू , फीलादेल्फिया,आऊट ऑफ टाईम , ) हा मोठा नट आहे त्याचे नाव मी घेतले आहे , विल स्मिथ पेक्षा मला मोर्गन फ्रीमन किंवा एडी मर्फी जास्त आवडतात , हॅले बेरी ठीक आहे तिचे खूप सिनेमे पहिले पण व्हूपी गोल्स्बार्ग जास्त भावली यांची नावे विसरलो नाही . तसेच आपण लिओनार्डो डिकॅप्रिओ ( ब्लडी डायमंड ,दिपार्तेद , टायटेनिक,द बीच) आवडला , सलमा हायेक ( देस्पराडो , वन्स अपॉन अ टाईम इन मेक्सिको ), जेसिका अल्बा ( स्लीपिंग डीयारेक्तरी, फान्तास्तिक फोर ) बरी आहे चेही नाव नाही घेतले... असो, प्रत्येकाच्या चॉइसचा प्रश्न आहे... टॉम हँक्सचा 'द टर्मिनल' पहिला , लिहायला विसरलो आणि त्याच्या मध्ये कथारीन झेटा जोन्स मस्त दिसलीय. अल पचिनोचा 'हीट' नाही पण अन 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बघितला पण एक गोष्ट खटकली ती म्हणजे तुम्ही 'क्लिंट ईस्टवुड' चे नाव विसरलात... हा अक्षम्य गुन्हा आहे...मला तो फारसा आवडत नाही वेस्टपटा करिता मी जॉन वेन ला जास्त पसंती देईन. मला ग्रेगरी पेक हि आवडतो त्याचे अल्गीअर्स , माकेनाज गोल्ड , गन्स ऑफ नावेरोन , द ओमेन , रोमन हॉलिडे (यात ऑड्री हेपबर्न जास्त लक्षणीय होती ..हिंदी मधील चोरी चोरी चा मुल चित्रपट ) हे सिनेमे मी अनेकदा पारायण करून पहिले आहेत . जीन हकमन देखील मोठा नट आहे त्याने मिसिसिपी बर्निंग , फ्रेंच कनेक्शन ,रनवे जुरी ,एनिमी ऑफ द स्टेट , द हिस्ट , एक्सट्रिम मेजर्स , द मेक्सिकन ,द फर्म , द अन्फार्गीव्हान , बीहाईण्ड एनिमी लाईन असे एक सो एक सिनेमे दिले. दोनदा ऑस्कर हि मिळवले याला विसरलो बुवा !

आज दिवसभर तुमच्याच लेखाची वाट बघत होतो. पण उशिरा का होईना, एकदाचा आला आणि वाट पाहाण्याचे समाधान झाले.

मा. रा.रा. परा कुठे आहेत ? त्यांचा या विषया वरचा अभ्यास चांगला आहे

In reply to by कपिलमुनी

आणि अनपेक्षितपणे मेरील स्ट्रीप ला " द आयर्न लेडी " करता सर्वोत्तम अभिनेत्रीचे ऑस्कर मिळाले.
हे वाक्य वाचले आणि सरळ स्क्रॉल करून प्रतिक्रिया वाचायला सुरुवात केली. त्यामुळे लेखावरती नो कॉमेंटस.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहमत. त आयर्न लेडी पाहिला नाहीये पण इटस् कॉम्प्लीकेटेड पाहिला होता आणि ती बेस्ट अ‍ॅक्ट्रेस म्हणून नॉमिनेटही झाली होती. तिचा अभिनय निदान कॉम्प्लीकेटेडमध्ये तरी अजिबात आवडला नाही. नॉमिनेट होण्याइतका तर नाहीच नाही. ती आणि ऐश्वर्या राय यांच्यात साम्य अश्यासाठी वाटतं की पूर्णपणे भुमिकेत झोकून दिलय असं अजिबात वाटत नाही. डोळे काहीतरी वेगळच बोलतात. हातात अ‍ॅकॅडमी अवॉर्ड धरून तिच्या फोटोत जशी दिसते तसेच भाव सिनेमातही असतात. वेगळं काहीच नाही. (अजून अभ्यास वाढवायला हवा.;)) पण नुकताच के १९ त विडोमेकर पाहिला आणि बरा वाटला.

दुसऱ्या क्रमांकावर आहे तो अल पचिनो ...गोडफादर सिरीज मधील सिनेमातील थंड रक्ताच्या डॉन मायकेल ची भूमिका करणारा नट. याच्या स्कारफेस वरून अमिताभचा अग्निपथ बेतला होता असे म्हणतात. सेंट ऑफ अ वूमन , डिपारटेड असे अनेक सुंदर सिनेमे याच्या नावावर आहेत
डिपारटेड मध्ये अल पचिनो नव्हता तर जाक निकोल्सन होता! असो अल पचिनो माझा पण फेव्हरेट आहे. त्याचे ओशन्स १३ , द रिक्रूट,डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट पण जबराच ! - मालोजीराव

मेरिल स्ट्रीपला एयरपोर्टवर पाहिले होते. खूपच साधी वाटली. तिचा बोर्डींग पास सापडत नव्हता म्हणून शोधत होती.

अँथनी हॉपकिन्स ? -- सायलेन्स ऑफ द लँब्स, द एज, आणि बरेच. क्लिंट ईस्टवूड, विल स्मिथ, मॉर्गन फ्रीमन इ. चा उल्लेख वर आलेला आहेच. याशिवाय हॅरिसन फोर्ड, रिचर्ड गिअर (की गेरे), टॉम क्रूज ( एक लास्ट समुराई पुरेसा आहे) मेरिल स्ट्रीपचा द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी हा एक सिनेमा अतिशय सुंदर होता.

छ्या एकपन फटू नाय. लई आशंनं आलो व्हतो. पन त्ये नाव वाचून दुसर्‍या खिडकीत त्येच नावं टाकून शोधायाचा कट्टाळा आला बघा. कुनीतरी करा ही सम्द आन फटू बी टाका की.

अभिनेते १. टॉम हँक्स २. रसेल क्रो ३. डेन्झेल ४. जॉर्ज क्लूनी ५. लिओनार्डो अभिनेत्री १. मेरील स्ट्रीप २. ज्युलिया ३. अ‍ॅन हॅथवे ४. सुझन सॅरॅन्डन ५. कॅरी मलिगन

यशीधनभौ , मी ही १९३९ च्या गॉन विथ द विड पासून अनेक चित्रपट पाहिले आहेत. आपली यादी मला अभिनेत्यांच्या बाबतीत आवडली. मी त्यात टोपोल व उमार शेरीफ यांचे नाव यावे म्हणतो. अभिनेत्री बाबत - ज्यूली अ‍ॅड्रूज , ऑड्रे हेपबर्न यायला काहीच हरकत नसावी. मेरील स्ट्रीप ही अभिनयासाठी काहीही करायला तयार असलेली ( आपल्याकडे शबाना आजमी ) नटी आहे ! महान आहे !

In reply to by चौकटराजा

चौकट राजाजी , ओहो ! गॉन विथ द विंड मधला क्लार्क गाबेल मस्तच होता. ओमार शेरीफ माल डॉक्टर झिवागो मध्ये बघितल्याचे आठवतो ,माकेनाज गोल्ड मध्ये तर अप्रतिमच. बेकेट मधला रिचर्ड बर्टन आणि लोंरेंस ऑफ अरेबिया मधला पीटर ओटूल. झोर्बा द ग्रीक मधला अन्थोनी क्वीन. द हंटर आणि द हनिमून मशीन मधला स्टीव माक्विन , बेनहर , टेन कॅमांडमेनट्स आणि एअर पोर्ट सिरीज मधला चार्ल्ट हेस्टन . घेवू तितकी नावे कमी आहेत. यशोधन वर्तक

गेल्या आठवड्यात मेरील स्ट्रीपचा ‘जूली अँड जुलिया’ चित्रपट H. B. O. वर लागला होता, फार विशेष कथानक नसतानाही मेरील स्ट्रीपच्या अभिनयाची चुणूक जागोजागी दिसत होती.

आणि केट विन्स्लेट ? टायटॅनिक, द रिडर, फाइंडिंग नेवरलँड, ऑल द किंग्ज मेन, आणि बैल बाई ? सँड्रा बुल्लक ? क्रॅश, द प्रपोजल, द ब्लाइंड साईड, टु वीक्स नोटिस, वाईल यु वेर स्लिपिंग, द लेक हाउस, आणि अजुन आवडणारे काही लोकं : लिसा कुड्रो, व्हायोला डेविस, ज्युलिएन मुर, उमा थर्मन, मिशेल योह (मेमरीज ऑफ गेशा), हिल्लरी स्वँक, केथी बेटस, हग (?) जॅकमन, कियानु रिव्हज, गेरार्ड बटलर, जॅक निकोल्सन.....