Skip to main content

समलिंगी संबंध.....

लेखक अमितसांगली यांनी बुधवार, 07/03/2012 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
लैंगिकता हि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचे काही लैंगिक अग्रक्रम असतात. पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारे आकर्षण व स्त्रीला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण(भिन्नलिंगी आकर्षण) हे समाजाच्या सर्व घटकाद्वारे नैसर्गिक मानण्यात आले आहे. समान लिंग असणाऱ्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधाना समलिंगी म्हणतात. पुरुषांचे पुरुषांशी संबंध असतील तर त्यांना गे म्हणतात व स्त्रीचे स्त्रीशी संबंध असतील तर त्यांना लेस्बिअन म्हणतात. समलिंगी संबंधातून मुल जन्माला घालता येत नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानण्यात आले आहेत.

सर्वांना होळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.. :)

लेखक कॉमन मॅन यांनी मंगळवार, 06/03/2012 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा मालक-चालक-व्यवस्थापक आणि सर्व सन्माननीय मिपा सदस्यांना आमच्याकडून होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.. :) धन्यवाद.. -- कॉमॅ.

भांग का रंग जमा हो...

लेखक चिगो यांनी मंगळवार, 06/03/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
होळी येतेय.. सगळ्यांनी मस्त पैकी रंगात रंगून मजा करायचा हा दिवस.. "होळी रे होळी, पुरणाची पोळी.." म्हणत मस्तपैकी पुरणपोळ्या रिचवायचा दिवस.. होळीच्या दिवशी पत्ते खेळणे, लिटल-लिटल घेणे आणि भांग पिणे हेही चालतं. आमच्या लहानपणी आम्ही वार्निश वगैरे पण माखायचो एकमेकांना, आणि मग आई आमच्या अंगाला कपडे धुवायच्या साबणाने घासून, गरम पाण्याने अंघोळ करायला लावायची. (आमच्या "शिशू की कोमल त्वचा"चं कुणाला काय पडलीच नव्हती.. :-)) तर मोठे झाल्यावर आम्हाला भांग (?) पण प्यायला मिळायची होळीच्या वेळी.. त्याचाच हा अनुभव.. मी कॉलेजला फर्स्ट इयरला असतांना दादाचा ग्रुप आमच्या गावी होळी साजरी करायला आला होता.

पालखी

लेखक चैतन्य दीक्षित यांनी मंगळवार, 06/03/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
पालखी काळाची थांबली एकदा, बदलण्या खांदा भोईयांचा | त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | पालखी काळाची गेली निघोनिया, ज्योत ठेवोनिया तेवतीच | आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | -चैतन्य

भोजनालय का ...............

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
भोजनालय का....... हंपीला दोन वर्षापूर्वी गेलो होतो. गाडी थांबवताच मन थक्क झाले. या भेटीदरम्यान बरेच म्हणजे खुपच फोटो काढले ते फोटो आणि इतिहास याची सांगड घालून एक भला मोठ्ठा (नेहमीप्रमाणे :-) ) लेख लिहायचे मनात आहेच पण त्या अगोदर एक लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला सांगायचीय. जे मी लिहीणार आहे ते बरोबर आहे का हे ठरवायचे काम तज्ञांचे आहे. आपले मत मांडायला काय हरकत आहे ? या विचारातून धाडस करून हा उद्योग करत आहे. ( कदाचित हे अगोदरच कोणी सांगितले असल्यास व तसे कळवल्यास हा लेख काढायला हरकत नाही ) आमच्या गाईडने आम्हाला हंपी मधे खूप फिरवले. जवळ जवळ चार दिवस आम्ही त्या भग्न शहरात हिंडत होतो.

‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 06/03/2012 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो. असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते.

होळी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 06/03/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
होळी अंगास रंग लावू दे, अंगास अंग लावू दे, सण होळिचा आहे, प्रेम रंगात न्हाऊ दे.. दिवस आज मस्तीचा प्रेमाचा व जबरदस्तीचा गाली गुलाल फासू दे थोडीशी मस्ती करू दे उघडा खांदा रंगवू दे, गोरे तन चिंब करू दे, ओलेती तुला बघू दे, प्रेम रंगात न्हाऊ दे, तनू रंगात रंगली सखी सचैल न्हाली वस्त्रे तनूंस लिपटली गुन्हे माफ,असे होळी मुठीत रंग,मनात रंग मन तव प्रेमात दंग रंगात श्रीरंग रंगू दे, राधे आज होळी खेळू दे अविनाश

आवडलेले क्लिक्स ..

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 06/03/2012 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही आवडलेले क्लिक्स ,छायाचित्रकाराच्या परवानगीने ,त्यांच्या नावासहित ... छायाचित्रकार : सुधिर क्षीरसागर . स्थळ : युरोप . . .

वसई किल्ला, मिपाकरांसोबत

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 06/03/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
वसई किल्ला- तीन्ही बाजूंनी पाणी व जमिनीवरून चिंचोळा रस्ता अशी याची रचना. मूळ मराठी सरदाराने उभारलेला व पुढे गुजराथच्या सुलतानाच्या ताब्यात आलेला व त्यापुढे पोर्तुगीजांनी बळकावलेला व त्याची भक्कम पुनर्बांधणी केलेला एक अभेद्य दुर्ग. पुढे चिमाजीअप्पांच्या अतुलनीय शौर्याने हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. रविवार करावे लागणारे हापिसचे काम ऐनवेळी पुढे ढकलेले गेल्यामुळे माझा मुंबई प्रवासाचा मार्ग सुकर झाला व मी आणि मोदक पिंपरीला भल्या सकाळी सिंहगड एक्सप्रेस मध्ये चढलो, सूड पुण्याहून बसलेलाच होता. तिघांच्या मस्त गप्पा रंगल्या. सूड बदलापूरला जाऊन ठाण्याला आम्हाला जॉईन होणार होता.